Jump to content

शिंगवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?शिंगवे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१९° ४७′ ५६″ N, ७४° ३३′ २३″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर शिर्डी
विभाग नाशिक
जिल्हा अहमदनगर
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
४,२५८ (२०११)
१.०६ /
६७.५४ %
• ७४.३३ %
• ६०.३१ %
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ शिर्डी लोकसभा
विधानसभा मतदारसंघ कोपरगाव विधानसभा
ग्रामपंचायत स्थापना - १९५२
सदस्य - ११
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 413708
• +०२४२३
• MH-१७ (श्रीरामपूर)
संकेतस्थळ: शिंगवे ग्रामपंचायत

शिंगवे हे गाव महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता या तालुक्यातील असून, तालुक्यातील क्षेत्रफळाने मोठया असलेल्या गावांपैकी एक आहे.

स्थान

[संपादन]

शिंगवे गाव अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस गोदावरी नदीकाठी वसलेले आहे.

मारुती मंदिराजवळुन दिसणारी गोदावरी नदी.
आकाशीय दृश्य - शिंगवे

पुणतांबा, पिंपळवाडी, सडे, रुई आणि वारी ही जवळील गावे आहेत. शिर्डी, राहाताकोपरगाव ही नजीकची शहरे आहेत.

लोकसंख्या

[संपादन]

२०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ४२५८ आहे. त्यापैकी २१९४ पुरुष व २०६४ स्त्रिया आहेत.

अर्थव्यवस्था

[संपादन]

शेती हा येथील मुख्य व्यवसाय असुन बहुतेक लोक शेती व दुग्ध व्यवसाय करतात. खालील तक्ता गावात घेतल्या जाणाऱ्या पिकांसंबंधी आहे.

प्रकार पिके
खरीप बाजरी,मका, सोयाबीन
रब्बी गहू, हरभरा
नगदी ऊस, कांदा

शिक्षण

[संपादन]

शिंगवे गावात जिल्हा परिषदेच्या तीन प्राथमिक शाळा व एक माध्यमिक विदयालय आहे.

  • प्राथमिक शाळा
    • जि. प. शाळा (मध्यवर्ती)
    • जि. प. शाळा (पश्चिम)
    • जि. प. शाळा (पुर्व)
  • माध्यमिक विदयालय
    • शृंगेश्वर माध्यमिक विदयालय

परिवहन

[संपादन]

रस्ते

[संपादन]

शिंगवे गाव कोपरगावश्रीरामपूर या शहरांना राज्य मार्गने (रा.मा. ३६) जोडलेले आहे. इतर ग्रामीण रस्ते पिंपळवाडी, शिर्डी, रुई आणि वारी यांना जोडतात.

रेल्वे

[संपादन]

साईनगर शिर्डी, पुणतांबा आणि कान्हेगाव हे जवळील रेल्वे स्थानक आहेत.

हवाई

[संपादन]

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे गावापासून २५ किमी अंतरावर स्थित विमानतळ आहे.