Jump to content

"मोडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
* कृपया या लेखाचे मराठीत भाषांतर करा
* कृपया या लेखाचे मराठीत भाषांतर करा
* या विषयास तज्ञांचे सहकार्य हवे आहे. तज्‍ज्ञ व्यक्तींनी चर्चापानावर आपले मत मांडावे व योग्य ते बदल करावेत.
* या विषयास तज्‍ज्ञांचे सहकार्य हवे आहे. अशा व्यक्तींनी चर्चापानावर आपले मत मांडावे व योग्य ते बदल करावेत.
== मोडी लिपी काय आहे? ==
== मोडी लिपी काय आहे? ==
[[चित्र:Verse in Modi script.svg|thumb|200px|right|मोडी]]
[[चित्र:Verse in Modi script.svg|thumb|200px|right|मोडी]]
ओळ ३३: ओळ ३३:
* [[ए.के. प्रियोळकर]] यांनी मोडी [[छपाई]]चा [[इतिहास]] लिहिला.
* [[ए.के. प्रियोळकर]] यांनी मोडी [[छपाई]]चा [[इतिहास]] लिहिला.


मोडी लिपीचे चार कालखंडात वर्गीकरण केले गेले आहे - यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन. यादवकालीन मोडी लिपी लिखानात अक्षरे एकमेकांच्या अगदीच जवळ आणि उभी काढली गेली. तिच, शिवकालीन शैली किंचीत उजवीकडे वाकलेली दिसतात. मोडी लिपीला तिरकस वळण, अधीक वर्तुळाकार आणि सुटसूटीत अक्षरे लिहीण्याचा उपक्रम [[छत्रपती शिवाजी]] महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांजकडून सुरु झाला. इथ पर्यंत मोडी लिपी ही टाक ने लिहीली जात. याच प्रयत्नांना पुढे चालू ठेवून पेशवेकालीन शैलीत ती अगदीच सुंदर, रेखीव, गोलाकार, तिरकस आणि सुटसूटीत लिहीली गेली. पेशवेकाळात लिखाण बोरूने होत असे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज राजवटी फाऊंटन पेनाचा वापर सुरू झाला. बोरूने जी प्रत्येक अक्षराला जाडी-रूंदी आणि टोक येत ती या फाऊंटन पेनाच्या वापरात शक्य नसल्याने मोडी लिपी अगदीच गुंतागूंतीची, किचकट आणि कुरूप दिसून लागली. फाऊंटन पेनाचा एकच फायदा होता तो म्हणजे त्यात शाई बराच वेळ टिकून रहात. म्हणून साध्याचे मोडी लिखक फाऊंटन पेनाच्या कॅलग्राफीच्या निब्सचा वापर करतात आणि काही प्रमाणात पेशवेकालीन मोडी लिपीचे सौंदर्य आणण्याचा प्रयत्न करतात.
मोडी लिपीचे चार कालखंडात वर्गीकरण केले गेले आहे - यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन. यादवकालीन मोडी लिपी लिखाणात अक्षरे एकमेकांच्या अगदीच जवळ आणि उभी काढली गेली. तीच, शिवकालीन शैलीय किं्चित उजवीकडे झुकलेली दिसतात. मोडी लिपीला तिरकस वळण, अधिक वर्तुळाकार आणि सुटसुटीत अक्षरे लिहिण्याचा उपक्रम [[छत्रपती शिवाजी]] महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांनी सुरू केला. तोपर्यंत मोडी लिपी ही टाकाने लिहिली जात असे. असाच प्रयत्न पुढे चालू ठेवून पेशवेकालीन शैलीत मोडी अगदीच सुंदर, रेखीव, गोलाकार, तिरकस आणि सुटसुटीत लिहिली जाऊ लागली. पेशवेकाळातील लिखाण बोरूने होत असे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज राजवटीत फाऊंटन पे्नचा वापर सुरू झाला. बोरूने जी प्रत्येक अक्षराला जाडी-रूंदी आणि टोक येत असे ते या फाऊंटन पेनच्या वापरात शक्य नसल्याने मोडी लिपी अगदीच गुंतागुंतीची, किचकट आणि कुरूप दिसून लागली. फाऊंटन पेनचा एकच फायदा होता तो म्हणजे त्यात शाई बराच वेळ टिकून राही. म्हणून सध्याचे मोडी लेखक फाऊंटन पेनच्या कॅलग्राफीच्या निब्सचा वापर करतात आणि काही प्रमाणात पेशवेकालीन मोडी लिपीचे सौंदर्य आणण्याचा प्रयत्न करतात.


अलिकडे, कर्नाटकात ९व्या शतकातील काही आढलेले शिलालेख हे मोडी लिपीत असून मोडी लिपी ही शिकस्ता मधून निर्माण झाली या मताचे खंडण करते. १०व्या शतकात “नस्तलीक” मधून “शिकस्ते” लिपी जन्मास आली. “शिकस्ता” म्हणजे “मोडकी नस्तलीक”. यावरून स्पष्ट होते की मोडी लिपीची संकल्पना ही शिकस्ता मधून आली नव्हती. तसेच, महादेवराव, रामदेवराव किंवा हरपालदेवराव यादवांच्या कारकिर्दीत श्रीलंकेशी संपर्क आला नव्हता. परंतु, नागरी, गुर्जर आणि बांग्ला लिप्यांशी मोडी साधारम्य आहे.
अलीकडे, कर्नाटकात ९व्या शतकातील काही आढलेले शिलालेख हे मोडी लिपीत असून ते मोडी लिपी ही शिकस्तामधून निर्माण झाली या मताचे खंडण करतात. १०व्या शतकात “नस्तलीक” मधून “शिकस्ते” लिपी जन्मास आली. “शिकस्ता” म्हणजे “मोडकी नस्तलीक”. यावरून स्पष्ट होते की मोडी लिपीची संकल्पना ही शिकस्तामधून आली नव्हती. कारण, महादेवराव, रामदेवराव किंवा हरपालदेवराव यादवांच्या कारकिर्दीत मराठी लोकांचा श्रीलंकेशी संपर्क आला नव्हता. मात्र मोडी लिपीचे परंतु, नागरी, गुर्जरी आणि बंगाली लिप्यांशी साधर्म्य आहे.


== मोडी वळणे ==
== मोडी वळणे ==
ओळ ५३: ओळ ५३:
* [[मराठी इतिहास संशोधन मंडळ]]
* [[मराठी इतिहास संशोधन मंडळ]]


==मोडी प्रशिक्षण==
==मोडीचे प्रशिक्षण==


* मोडी लिपी शिकण्यासाठी केशव भिकाजी ढवळे, [[ढवळे प्रकाशन]] यांची १ ते ५ भाग असलेली पुस्तकं उपलब्ध आहेत.
* मोडी लिपी शिकण्यासाठी केशव भिकाजी ढवळे [[ढवळे प्रकाशन]] यांची १ ते ५ भाग असलेली पुस्तके उपलब्ध आहेत.
* तुम्हीच मोडी शिका नावाचे [[डायमंड पब्लिकेशन]] पुस्तक - ह्या पुस्तकात निरनिराळे मोडी दस्ताऐवज छापलेले आहेत.
* तुम्हीच मोडी शिका या नावाचे [[डायमंड पब्लिकेशन]]चे पुस्तक - ह्या पुस्तकात निरनिराळे मोडी दस्ताऐवज छापलेले आहेत.
* [[भारत इतिहास संशोधक मंडळ]] [[पुणे]] येथे मोडी वर्ग घेत असते.
* [[भारत इतिहास संशोधक मंडळ]] [[पुणे]] येथे मोडी वर्ग घेतले जातात.
* [[महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग|महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाद्वारे]] मोडीलिपी प्रशिक्षणाच्या ८ ते १५ दिवसीय कार्यशाळा दरवर्षी उन्हाळ्यात राबवण्यात येतात. या कार्यशाळांमध्ये मोडीलिपी लेखन-वाचन तसेच शिवकालीन आणि पेशवेकालीन व्यवहार पदधतीची माहिती (कागदपत्रांचे वाचन करण्यासाठी आवश्यक संदर्भ) देण्यात येतात. तसेच प्रशिक्षणाच्या शेवटी परीक्षा असून उत्तीर्ण झाल्यास प्रमाणपत्र देण्यात येते.
* [[महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभाग|महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाद्वारे]] दरवर्षी उन्हाळ्यात, मोडी लिपीच्या प्रशिक्षणाची ८ ते १५ दिवसांची कार्यशाळा घेतली जाते. या कार्यशाळेत मोडी लिपीच्या लेखन-वाचनाची तसेच शिवकालीन आणि पेशवेकालीन व्यवहार पद्धतीची माहिती (कागदपत्रांचे वाचन करण्यासाठी आवश्यक अशा संदर्भांसकट) करून देण्यात येते. प्रशिक्षणाच्या शेवटी परीक्षा असून ती उत्तीर्ण झाल्यावर प्रमाणपत्र मिळते..





२२:००, ६ जुलै २०११ ची आवृत्ती

  • कृपया या लेखाचे मराठीत भाषांतर करा
  • या विषयास तज्‍ज्ञांचे सहकार्य हवे आहे. अशा व्यक्तींनी चर्चापानावर आपले मत मांडावे व योग्य ते बदल करावेत.

मोडी लिपी काय आहे?

मोडी

मोडी ही १३व्या शतकापासून २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेची प्रमुख लेखनपद्धती होती.महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकालात १२६०-१३०९ हेमाडपंत (खरे नांव हेमाद्रि पंडित) या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला. छपाईस अवघड असल्यामुळे मोडी लिपीचा वापर मागे पडला आणि देवनागरी लिपीचा वापर सार्वत्रिक सुरू झाला. उर्दूप्रमाणे मोडी लिपी हात न उचलता लिहिली जाते, त्यामुळे वेगाने लिहिणे सोपे जाते. मोडीत अनेक शब्दांची लघुरुपे वापरून कमीतकमी ओळीत सारांश लिहिला जातो. मोडीतली अक्षरे चक्राकार (circular) असतात, त्यामध्ये मराठीच्या विपरीत काना खालून वर जातो. यामुळे पुढचे अक्षर चटकन लिहिता येते. तसेच प्रत्येक अक्षराची सुरूवात आणि शेवट डोक्यावरच्या रेषेवर होते. मोडी लिपीत चिटणीसी, महादजीपंती, बिवलकरी, रानडी अशी वळणे प्रसिद्ध आहेत. पुढे घोसदार वळण येऊन त्याचा भारतातल्या इतर भागातही प्रसार झाला असे मानले जाते. असंख्य मराठी ऐतिहासिक कागदपत्रे मोडी लिपीत असून ऐतिहासिक संशोधनाकरिता मोडी जाणकारांची कमतरता भासते.

मोडी लिपीचा इतिहास

मोडी लिपीचा नमुना - हे पत्र सवाई माधवराव पेशवे यांनी सेनापती महादजी शिंदे यांस ३०-१२-१७८४ रोजी लिहिले होते

मोडी लिपीच्या उगमाबद्दल अनेक मते व मतभेद आहेत. इतिहासाचार्य वि.का.राजवाडे व डॉ.भांडारकरांच्या मते हेमाडपंताने ही लिपी श्रीलंकेतून आणली, परंतु चांदोरकरांच्या मते मोडी लिपी अशोककालातील मौर्यी(ब्राह्मी)चाच एक प्रगत प्रकार आहे. वाकणकर आणि वालावलकरांच्या मते मोडी लिपी ही ब्राह्मी लिपीचाच एक प्रकार असून हात न उचलता लिहिण्याच्या तिच्या वैशिष्ट्यामुळे इतर लिपींपेक्षा वेगळी झाली आहे. मोडी लिपी श्रीलंकेतून आणली गेली असावी अथवा मौर्यी लिपीवरून विकसित झाली असावी हे म्हणणे वाकणकर आणि वालावलकर यांना मान्य नाही. [पहा: Typography Of Devanagari, १९६१, मुद्रक: महाराष्ट्र सरकार.]

मोडी लिपी महाराष्ट्रात कमीत कमी ९०० वर्षे वापरात आहे. सर्वांत जुना उपलब्ध मोडी लेख इ.स. ११८९ मधील आहे. ते पत्र पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहात आहे. मोडी लिपी १९५० पर्यंत लिखाणात प्रचलित होती. मोडी हा शब्द फारसी भाषेतील 'शिकस्ता' यावरून आलेला आहे(?). गेल्या २-३ शतकात मोडी लिपीत अनेक फेरबदल झालेले आहेत. साधारण इ.स. १७००च्या सुमारास चिटणिसी आणि वळणे ही पूर्णपणे प्रगत झाली व यानंतर त्यात फारसे बदल दिसून येत नाहीत. ऐतिहासिक कागदपत्रातील मोडी लिपी क्लिष्ट आणि वाचण्यास कठीण असते.

मोडी लिपी पेशवाईकाळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती असे मानले जाते. पेशवे यांच्या दप्तरातील कागदपत्रे, दस्तऐवज पाहिले असता त्या उत्कर्षाची कल्पना येते. सुबक अक्षर, दोन ओळीतील समान अंतर, काटेकोर शुद्धलेखन हे या लेखनाचे वैशिष्ट्य. शिवाजीचा काळ ते उत्तर पेशवाई ह्या काळांतील मोडीवाचनातून मराठी भाषेतील स्थित्यंतरे लक्षात येतात व मराठी भाषेचा प्रवास अभ्यासता येतो.

इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मताप्रमाणे ज्ञानेश्वरी लिहिली जाण्याच्या काळात मोडी संकल्पना महाराष्ट्रात येत होती. याच काळात पहिले मुस्लिम आक्रमण भारतात होत होते. लिखाणाकरिता कागदाचा वापर हा मुस्लिमांनी भारतात सुरू केला असावा कारण कागज हा फ़ार्सी शब्द असून कागज या अर्थाचा संस्कृत शब्द अस्तित्वात नाही. इतिहासाचार्य राजवाडे ज्ञानेश्वरीतील खाली नमूद केलेल्या ओव्यांचा आधार देतात.देवनागरी अक्षरे।अक्षरआडव्या, उभ्या आणि टोकदार रेषांचा अवलंब करते त्यामुळे लिखाणाच्या हस्तलिखित प्रति बनवताना वेग कमी होतो. तर शिकस्त प्रमाणे गोलाकार व एकमेकांना जोडली जाणारी वळणे वापरून वापरली जाणारी मोडी हस्तलिखिताचा वेळ वाचवत होती. विराम चिन्हांचा वापर इंग्रजीशी ओळख झाल्यानंतरच भारतीय लिपींत सुरू झाला.

१]हे बहु असो पंडीतु , धरुणु बालकाचा हातु,

वोळी लेहे वेगवंतु, आपणाची॥(ज्ञानेश्वरी अध्याय १३,ओवी क्र.३०७)

२]सुखाची लिपी पुसिली ॥ (ज्ञानेश्वरी अध्याय ३,ओवी क्र.३४६)

३]दोषांचीं लिहिलीं फाडीं ॥(ज्ञानेश्वरी अध्याय ४,ओवी क्र.५२)

४]आखरे पुसलिया ना पुसे, अर्थ जैसा ॥(ज्ञानेश्वरी अध्याय ८,ओवी क्र.१७४)

मोडी लिपीचे चार कालखंडात वर्गीकरण केले गेले आहे - यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन. यादवकालीन मोडी लिपी लिखाणात अक्षरे एकमेकांच्या अगदीच जवळ आणि उभी काढली गेली. तीच, शिवकालीन शैलीय किं्चित उजवीकडे झुकलेली दिसतात. मोडी लिपीला तिरकस वळण, अधिक वर्तुळाकार आणि सुटसुटीत अक्षरे लिहिण्याचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांनी सुरू केला. तोपर्यंत मोडी लिपी ही टाकाने लिहिली जात असे. असाच प्रयत्न पुढे चालू ठेवून पेशवेकालीन शैलीत मोडी अगदीच सुंदर, रेखीव, गोलाकार, तिरकस आणि सुटसुटीत लिहिली जाऊ लागली. पेशवेकाळातील लिखाण बोरूने होत असे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज राजवटीत फाऊंटन पे्नचा वापर सुरू झाला. बोरूने जी प्रत्येक अक्षराला जाडी-रूंदी आणि टोक येत असे ते या फाऊंटन पेनच्या वापरात शक्य नसल्याने मोडी लिपी अगदीच गुंतागुंतीची, किचकट आणि कुरूप दिसून लागली. फाऊंटन पेनचा एकच फायदा होता तो म्हणजे त्यात शाई बराच वेळ टिकून राही. म्हणून सध्याचे मोडी लेखक फाऊंटन पेनच्या कॅलग्राफीच्या निब्सचा वापर करतात आणि काही प्रमाणात पेशवेकालीन मोडी लिपीचे सौंदर्य आणण्याचा प्रयत्न करतात.

अलीकडे, कर्नाटकात ९व्या शतकातील काही आढलेले शिलालेख हे मोडी लिपीत असून ते मोडी लिपी ही शिकस्तामधून निर्माण झाली या मताचे खंडण करतात. १०व्या शतकात “नस्तलीक” मधून “शिकस्ते” लिपी जन्मास आली. “शिकस्ता” म्हणजे “मोडकी नस्तलीक”. यावरून स्पष्ट होते की मोडी लिपीची संकल्पना ही शिकस्तामधून आली नव्हती. कारण, महादेवराव, रामदेवराव किंवा हरपालदेवराव यादवांच्या कारकिर्दीत मराठी लोकांचा श्रीलंकेशी संपर्क आला नव्हता. मात्र मोडी लिपीचे परंतु, नागरी, गुर्जरी आणि बंगाली लिप्यांशी साधर्म्य आहे.

मोडी वळणे

चिटणीसी,महादजीपंती,विवाळकरी,रानडी.

मोडी लिपीतील असंख्य दस्तऐवज हे खाली दिलेल्या ठिकाणी संग्रहित केले आहेत.

मोडीचे प्रशिक्षण

  • मोडी लिपी शिकण्यासाठी केशव भिकाजी ढवळे ढवळे प्रकाशन यांची १ ते ५ भाग असलेली पुस्तके उपलब्ध आहेत.
  • तुम्हीच मोडी शिका या नावाचे डायमंड पब्लिकेशनचे पुस्तक - ह्या पुस्तकात निरनिराळे मोडी दस्ताऐवज छापलेले आहेत.
  • भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे मोडी वर्ग घेतले जातात.
  • महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाद्वारे दरवर्षी उन्हाळ्यात, मोडी लिपीच्या प्रशिक्षणाची ८ ते १५ दिवसांची कार्यशाळा घेतली जाते. या कार्यशाळेत मोडी लिपीच्या लेखन-वाचनाची तसेच शिवकालीन आणि पेशवेकालीन व्यवहार पद्धतीची माहिती (कागदपत्रांचे वाचन करण्यासाठी आवश्यक अशा संदर्भांसकट) करून देण्यात येते. प्रशिक्षणाच्या शेवटी परीक्षा असून ती उत्तीर्ण झाल्यावर प्रमाणपत्र मिळते..


अधिक माहिती

सौजन्य आणि बाह्य दुवा