तेलुगू लिपी ही अबुगीडा प्रकाराची ब्राह्मी लिपीपासून उत्पन्न झालेली लिपी आहे. भारताच्या आंध्र प्रदेश, तेलंगणा व आसपासच्या प्रदेशात बोलली जाणारी तेलुगू भाषा लिहीणयासाठी वापरली जाते. तेलुगू लिपी ही संस्कृत लिहिण्यासाठीही मोठ्या प्रमाणात वापरली जाते. तसेच गोंडी भाषा लिहीण्यासाठीसुद्धा हिचा वापर होतो. पूर्व चालुक्यांच्या काळात हिचा वापर अधिक होऊ लागला. ब्राह्मी लिपी परिवारापासून कदंबा व भट्टीप्रोलु लिपीपासून ह्या लिपीचा विकास झाला आहे, तसेच कन्नड लिपीशी हिचे खूप साम्य आहे.
मौर्य कालखंडात वापरली जाणारी ब्राह्मी लिपी कृष्णा नदीच्या खोऱ्यात पोहचली आणे भगवान बुद्धांचे अवशेष ठेवण्यासाठी तयार केलेल्या कलशावर सापडलेल्या भट्टीप्रोलू लिपीचा उदय झाला. घंटासाला आणि मासुलीपटणम् (प्राचीन टॉलमीचे मैसोलोस् व पेरिप्लसचे मसालिया)च्या आजूबाजूच्या बंदरातून बौद्ध धर्म पूर्व आशियात पसरला गेला. इ.स. ५ व्या शतकात भट्टीप्रोलू ब्राह्मी तेलुगू लिपीत विकसित झाली. मुस्लिम इतिहासकार आणि अभ्यासक अल-बिरुनी यांनी तेलगू भाषेचा तसेच त्याच्या लिपीचा "अंधरी" असा उल्लेख केला.
तेलुगू लिपीत १८ स्वर आहेत, त्यापैकी प्रत्येकाला स्वतंत्र स्वरूप व व्यंजनासोबत जोडण्यासाठी स्वरचिन्हे आहेत. या भाषेत ऱ्हस्व व दीर्घ स्वरांमध्ये फरक केला जातो.
स्वर
క (क)सोबत
देवनागरी
स्वर
క (क)सोबत
देवनागरी
అ
క
अ
ఆ
కా
आ
ఇ
కి
इ
ఈ
కీ
ई
ఉ
కు
उ
ఊ
కూ
ऊ
ఋ
కృ
ऋ
ౠ
కౄ
ॠ
ఌ
కౢ
ऌ
ౡ
కౣ
ॡ
ఎ
కె
ऐ
ఏ
కే
ए
ఐ
కై
ऐ
ఒ
కొ
ओ
ఓ
కో
ओ
ఔ
కౌ
औ
అం
కం
ं
అః
కః
ः
जेव्हा स्वर एखाद्या शब्दाच्या किंवा अक्षराच्या सुरुवातीस येतो, तसेच तो स्वतःमध्ये संपूर्ण असतो तेव्हा तो स्वतंत्र स्वरूपात वापरला जातो (उदा. अ, उ, ए). स्वरचिन्हांचा वापर करून व्यंजवात मिसळला की त्याचे अक्षर बनते (उदा. क्+आ= का, य+ओ= यो). అ (अ)चे कोणतेही स्वरचिन्ह नाही आहे कारण सर्व व्यंजनात तो आधीपासून मिसळला आहे. इतर स्वरचिन्हे व्यंजनात मिसळले की त्यांचे उच्चारण त्या स्वराप्रमाणे होते.
उदाहरणार्थ :