तमिळ-ब्राम्ही लिपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तमिळ-ब्राम्ही किंवा दमिली लिपी : ही प्राचीन ब्राम्ही लिपीपासून प्रभावित असून ती आधुनिक तमिळ लेखनात वापरली जाणारी लिपी आहे. सध्याच्या तामिळनाडू ,केरळ , आंध्र प्रदेश,श्री लंका हिचा उत्तर भाग या प्रदेशात पूर्वी असलेल्या दोन राजवंशात ज्यांचे नाव चेर आणि पांड्य असे होते त्या काळात ह्या लिपीचा सर्वात जास्त वापर केला गेला. या लिपीत सापडलेली लिखाणे सध्याच्या द्रविड संस्कृतीची सर्वात प्राचीन लिखाणे आहेत. हे लिखाण गुहांच्या भितींवर, मडक्यावर,नाण्यांवर,अंगठ्यांवर आढळून आले आहेत. ही प्राचीन तमिळ असून ती प्राचीन संगम साहित्य याची सुरुवात होती असे मानले जाते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Richard Salomon (1998) Indian Epigraphy: A Guide to the Study of Inscriptions in Sanskrit, Prakrit, and the other Indo-Aryan Languages