Jump to content

नागरी लिपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नागरी
नागरी लिपी लिखित ताम्रपत्रे, इसवी सन १०३५
प्रकार
काळ
प्राथमिक वापर: पहिले शतक समकालीन
विकास: इसवी सन ७ व्या शतकापासून
पूर्वज प्रणाली
संतती प्रणाली
भगिनी प्रणाली
नागरी लिपीतील व्यंजन
नागरी लिपीतील स्वर

देवनागरी, नंदीनागरी आणि इतर काही लिप्यांचा विकास नागरी लिपी पासून झाला आहे. नागरी लिपीचा उपयोग पूर्वी प्राकृतसंस्कृत भाषांमध्ये लिहीण्यासाठी केला जात असे. बऱ्याचदा नागरी लिपीला देवनागरी लिपीदेखील संबोधले जाते.[१][२] इसवी सन पहिल्या सहस्रकादरम्यान नागरी लिपी प्रचलित झाली.[३]

आद्यकालीन ब्राह्मी लिपीपासून नागरी लिपीचा विकास झाला.[४]  गुजरातमध्ये सापडलेल्या काही अतिप्राचीन शिलालेखांनुसार असे आढळून आले आहे की संस्कृत नागरी लिपीचा विकास आणि वापर प्राचीन भारतात इसवी सन पहिल्या ते चौथ्या शतकांदरम्यान झाला असावा.[५] सातव्या शतकापर्यंत नागरी लिपीचा नियमित वापर होत असे. इसवी सनाच्या पहिल्या सहस्रक समाप्तीनजिक ही लिपी देवनागरी व नंदीनागरी लिपीमध्ये[६] पूर्णपणे विकसित झाली असे संशोधकांना आढळून आले आहे.[१][७]

प्राचीन भारतामध्ये मध्य-पूर्वेकडील भागांमध्ये गुप्त लिपीसमवेत नागरी लिपीचा वापर रूढ झाल्याचे दिसून येते, कारण पश्चिमेकडे शारदा लिपी तर अति-पूर्वेकडे सिद्धम लिपी अधिक प्रमाणात वापरात होती. कालांतराने, नागरी लिपीचा देवनागरी व नंदीनागरी सारख्या लिप्यांमध्ये विकास झाला. तसेच, शारदा लिपीपासून विकसित झालेल्या गुरमुखी लिपीवरदेखील नागरी लिपीचा प्रभाव दिसून येतो.[ संदर्भ हवा ]

भारताबाहेर वापर

[संपादन]

सातव्या शतकात तिबेटचा राजा स्रॉंग-त्सान-गंबो ने सर्व विदेशी पुस्तकांचे तिबेटी भाषेत भाषांतर करण्याचा आदेश दिला. त्याने त्याचा  राजदूत तोन्मी संबोटा यास प्रादेशिक भारतीय भाषांतील आद्याक्षरे व लिहीण्याच्या पद्धती गोळा करण्यासाठी भारतात पाठविले. राजदूत संबोटाने काश्मिरमधील संस्कृत नागरी लिपी मधील २४ तिबेटी उच्चारांशी संलग्नित उच्चार शोधले. त्यासोबतच, त्याने ६ प्रादेशिक उच्चारांसाठी नवीन अक्षरांची भर घातली.[८]

म्यानमारच्या रखाइन राज्यात असलेल्या म्राव्क-वू (पूर्वीचे नाव, म्रोहॉंग) शहरातील संग्रहालयात सन १९७२ मध्ये नागरी लिपीचे दोन नमुने प्रदर्शनास ठेवण्यात आली. पुरातत्त्व शास्त्रज्ञ ऑंग थॉ लिहितात: "...६ व्या शतकात भारतातील वेसाली राजवंशाचे राजा नितिचंद्र व राजा विरचंद्र यांनी संस्कृत आणि पाली संमिश्रीत शिलालेख नम्रतेने समर्पित केले आहे ...".[९]

हेदेखील वाचा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b कॅथलिन किपर (२०१०), The Culture of India, New York: The Rosen Publishing Group, ISBN: 978-1615301492, पृष्ठ ८३
  2. ^ जिअॉर्ज कार्डोना आणि दानेश जैन (२००३), The Indo-Aryan Languages, Routledge, ISBN: 978-0415772945, पृष्ठे ६८ ते ६९
  3. ^ Devanagari through the ages, Issue 8 of Publication, India Central Hindi Directorate Issue 8 of Publication (Instituut voor Toegepaste Sociologie te Nijmegen). Published 1967 Original from the University of California. १९६७.CS1 maint: location (link)
  4. ^ जिअॉर्ज कार्डोना आणि दानेश जैन (२००३), The Indo-Aryan Languages, Routledge, ISBN: 978-0415772945, पृष्ठे ६८ ते ६९
  5. ^ Gazetteer of the Bombay Presidency, p. 30, गूगल_बुक्स वर, Rudradaman’s inscription from 1st through 4th century CE found in Gujarat, India, Stanford University Archives, pages 30-45
  6. ^ Nandanagiri Unicode Standards
  7. ^ रिचर्ड सालोमन (२०१४), Indian Epigraphy, Oxford University Press, ISBN: 978-0195356663, पृष्ठे ३३ ते ४७
  8. ^ विल्यम वुडवाइल रॉकहिल, Annual Report of the Board of Regents of the Smithsonian Institution, p. 671, गूगल_बुक्स वर, United States National Museum, पृष्ठ ६७१
  9. ^ Historical Sites in Burma, 1972