कागद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


मनिला कागदाचा एक गठ्ठा.

कागद हे लिहिण्यास वापरल्या जाणारे,छपाईस वा वेष्टनासाठी (पॅकेजिंग) एक पातळ साहित्य/सामग्री आहे.लाकुड, बांबू, चिंध्या, गवत इत्यादीचे ओले सेल्युलोजच्या लगद्याचे तंतु विशिष्ट रित्या दाबुन व मग वाळवुन याची उत्पत्ती होते.

कागद हे असे साहित्य आहे ज्याचे अनेक उपयोग आहेत.त्यापैकी सर्वात सामान्य असा उपयोग लेखनासाठीछपाईसाठी आहे. वेष्टनासाठीही हा विस्तृतरित्या वापरला जातो.स्वच्छतेसाठी असणाऱ्या अनेक उत्पादनांत तसेच अनेक औद्योगिक तसेच बांधकाम क्रियांमध्येही याचा वापर होतो. क्वचितच, खाद्य कागद म्हणुनही याचा वापर केला जातो.h i

इतिहास[संपादन]

मुख्य पान: History of paper
हेसुद्धा पाहा: Science and technology of the Han Dynasty आणि List of Chinese inventions


पौराणिक इजिप्त मधील लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या पापयरसपासून आंग्ल शब्द 'पेपर' तयार झाला, जो पापयरस वनस्पतीपासून निघालेल्या पट्ट्या एकत्र ठोकुन बनविल्या जात असे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात साधारणतः आजच्या कागदाचा पूर्वज चिनमध्ये निर्माण केल्या गेला.या तारखेपूर्वीही त्याच्या वापराचे संकेत मिळतात. साचा:Fact कागद निर्मिती ही पौराणिक चिन मधील चार महान शोध या पैकी एक समजली जाते.हान काळात लगद्यापासुन कागद बनविण्याची क्रिया काई लुनद्वारे इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीस विकसित केल्या गेली.चिनने कागदाचा वापर रेशमास स्वस्त व परिणामकारक पर्याय म्हणुन केला ज्याने त्यांचीसुवर्ण युगाकडे वाटचाल करविली.

१३व्या शतकात, कागदाचा वापर हा चिन मधुन मुसलमानांद्वारे मध्ययुगीन युरोपमध्ये पोचला जेथे त्याचे उत्पादन सुरू झाले.तेथे पाण्यावर चलित पेपर मिल सुरु झाली व कागदाच्या निर्माणात यांत्रिकिकरण आले. [१] सर्व जगात,१९व्या शतकाचे सुरुवातीस, माहितीच्या अतिशय स्वस्त आदानप्रदानाने, जसे पत्र, वर्तमानपत्र, पुस्तके इत्यादी,कागदाचे औद्योगिक उत्पादन सुरू झाल्यामुळे संपूर्ण जगात सांस्कृतिक क्षेत्रात अनेक महत्त्वाचे बदल झाले.सन १८४४ मध्ये, कॅनॅडियन संशोधक चार्लस फेनेर्टी व जर्मन संशोधक एफ.जी. केलर यांनी कागद बनविण्यासाठी यंत्रसामग्री व लाकडावर प्रक्रिया करून लगदा बनविण्याची पद्धत शोधुन काढली.[२] लाकडाच्या लगद्यापासुन वर्तमानपत्राचा कागद व सर्व प्रकारचा कागद बनविण्याचे नवे युग त्यामुळे सुरू झाले.२००० वर्षे जुन्या पद्धतीचा अंत झाला.

कागद निर्माण[संपादन]

मुख्य पान: कागदनिर्मिती

रासायनिक लगदा तयार करणे[संपादन]

मुख्य पाने: kraft process, sulfite process, व soda pulping

रासायनिक लगदा प्रक्रियेचा हेतु लिग्नीन या पदार्थाच्या रासायनिक बांधणीस तोडुन, त्यास शिजणार्‍या तरलात द्रावित करणे जेणेकरुन त्यास सेल्युलोज तंतुंपासुन वेगळे धुता येउ शकेल. लिग्नीन हा, वनस्पतींचे कक्ष?(सेल)एकत्र धरुन ठेवण्याचे काम करतो,रासायनिक लगदा प्रक्रिया तंतुंना मुक्त करते व लगदा बनण्याची क्रिया सोपी होते.

छपाई, रंगकाम किंवा लेखन करण्यासाठी उपयुक्त अश्या पांढर्‍या कागदाची निर्मिती लगद्यावर ब्लिचिंग?ची क्रिया करून करता येते.रासायनिक लगद्याची किंमत यांत्रिक लगद्यापेक्षा अल्प प्रमाणामुळे जास्त असते कारण त्यात उत्पादन फक्त मुळ लाकडाच्या प्रमाणात ४० ते ५०% इतकेच होते. या पद्धतीत तंतुंच्या लांबीचे जतन होते म्हणुन रासायनिक लगदा हा बळकट कागद निर्माण करु शकतो. याचा दुसरा फायदा असा आहे कि, या प्रक्रियेस लागणारा उष्मा व वीज ही या प्रक्रियेतुन मिळालेल्यालिग्नीनला जाळुन तयार केल्या जाउ शकते. अशा प्रकारच्या कागदास 'वुड फ्री पेपर' असे नाव आहे.('विना वनस्पतीचा कागद' नव्हे)

क्राफ्ट पद्धत ही लगदा तयार करण्याची एक सर्वसामान्य पद्धत आहे व त्याद्वारे बळकट व ब्लिच न केलेले कागद तयार करता येउ शकतात.त्याचा थेट वापर कागदी पिशव्याकागदी खोके बनविण्यासाठी करण्यात येतो.त्यावर पुढे प्रक्रिया करून त्याचा खोके बनविण्यासाठी नळीदार कागद बनविण्यात येतो.

यांत्रिकरित्या लगदा निर्माण[संपादन]

यांत्रिकरित्या लगदा तयार करण्याच्या मुख्य दोन पद्धती आहेत. उष्म-यांत्रिक लगदा व groundwood pulp. पूर्वी दिलेल्या पद्धतीत,लाकडाचे लहान लहान तुकडे केल्या जातात व ते मोठ्या वाफचलित रिफायनरीमध्ये टाकण्यात येतात.तेथे हे तुकडे दोन लोखंडी चकत्यात पिळल्या जातात व त्यापासुन तंतु तयार करण्यात येतात.groundwood pulp या पद्धतीत, ग्राइंडरमध्ये मोठमोठे ओंडके जेथे ते फिरणार्‍या दगडांवर घासल्या जाउन त्याचे तंतु तयार करण्यात येतात.यांत्रिकरित्या लगदा करण्याच्या पद्धतीत,त्यात असलेला लिग्नीनचा अंश काढल्या जात नाही.त्यामुळे या पद्धतीत ९५% पेक्षा जास्त उत्पादन मिळते.परंतु, याने कागद पिवळा पडतो व काही काळानंतर तो ठिसुळ होतो.या पद्धतीत तंतु हे आखूड असतात त्यामुळे त्यामुळे निर्माण होणारा कागद हा निर्बळ असतो. जरी या पद्धतीत पुष्कळ वीज लागते तरी रासायनिक लगद्यापेक्षा याची किंमत कमी असते.

शाई काढलेला लगदा[संपादन]

मुख्य पान: deinking

कागदाची पुनर्प्रक्रिया पद्धत ही दोन्ही रासायनिक वा यांत्रिक असू शकते.पाण्यात मिसळुन द्रावण तयार करून व यांत्रिक क्रिया करून त्यात असलेले हायड्रोजनचे बंध तोडल्या जाउ शकतात.त्याने तंतु विलग होतात.जास्तीतजास्त पुनर्प्रक्रिया केलेल्या कागदात त्याचा दर्जा टिकविण्यासाठी मुळ अक्षत तंतु असतातच.शाई काढलेला लगदा, हा ज्यापासुन बनविला गेला, त्या कागदाच्या समान दर्जाचा वा थोडा कमी दर्जाचा राहु शकतो. पुनर्प्रक्रिया केलेल्या तंतुंच्या मुळ तीन वर्गवार्‍या करता येउ शकतातः

 • मीलमधील अंतर्गत टाकाउ कागद - यात असा कागद येतो जो मीलमध्ये बनविण्यात येतो पण नियत दर्जापेक्षा कमी दर्जाचा आहे. हा कागद परत लगदा करण्यासाठी निर्माण प्रणालीत टाकण्यात येतो.हा विना-मानकाचा असलेला कागद विकल्या जात नाही.यास पुनर्प्रक्रिया केलेला कागद समजल्या जात नाही.मागील अनेक वर्षांपासुन पुनर्प्रक्रिया केलेला कागद निर्माण होण्यापूर्वी, अनेक कागदाच्या मील असा कागद वापरीत आहेत.
 • वापरकर्त्यापर्यंत न पोचलेला टाकाउ कागद-हे कागदाचे कापलेले व एखाद्या प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेले कागद असतात जसे,कागद कटाई व लिफाफा बनवितांना उरलेले तुकडे.हा वाया गेलेला कागद मीलबाहेर निर्माण होतो व भरावासाठी याचा वापर केल्या जाउ शकतो.हा एक चांगला पुनर्प्रक्रियेचा स्रोत आहे.यात अनेक अशाही कागदांचा समावेश होतो जे छापल्या गेलेले आहे परंतु शेवटच्या वापरकर्त्यापर्यंत पोचले नाहीत.(छापखान्यातील वाया गेलेला व न विकलेली पुस्तके व नियतकालिके)

[३]

 • वापरकर्त्यापर्यंत पोचुन मग टाकाउ झालेला कागद - हाशा प्रकारचा कागद असतो जो शेवटच्या वापरकर्त्यापर्यंत पोचुन मग टाकाउ झालेला असतो. जसे-कार्यालयातील टाकाउ कागद,वापरलेली/वाचलेली नियतकालिके व वर्तमानपत्रे.यातील जास्तीत-जास्त कागद हा छापलेला असतो,त्यावर पुनर्प्रक्रिया ही छापलेला कागद म्हणुन होते व प्रथम तो शाई काढण्यासाठीच्या प्रक्रियेला प्रथम पाठवितात.

पुनर्प्रक्रिया केलेला कागद हा १००% पुनर्प्रक्रिया केलेले साहित्य वापरुन तयार केला जातो वा अनाघ्रात लगद्यापासुन तयार होतो. ते मुळ कागदाईतके चकाकणारे व बळकट नसतात.

भर[संपादन]

तंतुंव्यतिरिक्त, लगद्यात, खडुचिनी माती यांची भर घालतात. त्याने छपाई व लेखनासाठी आवश्यक असलेले कागदाचे गुणधर्म वाढतात.विशिष्ट आकार येण्यासाठी लगद्यात तसे पदार्थ टाकण्यात येतात वा मग निर्माणप्रियेदरम्यान मशिनमध्ये चोपडण्यात येतात.याचा उपयोग छपाईची शाई वा रंग सोकण्यासाठी आवश्यक तो पृष्ठभाग तयार करण्यास होतो.

कागदाची निर्मिती[संपादन]

मुख्य पाने: papermachinehandmade paper

हा लगदा मग कागद तयार करण्याच्या मशीनला पुरविण्यात येतो दबावाखाली आणून त्यातील पाणी काढले जाते व तो सुकविण्यात येतो. कागदाचा पत्रा\तावावर दाब देण्याने त्यातील पाणी जोराने बाहेर पडते.ते पाणी मग गोळा केल्या जाते. हाताने तयार केलेल्या कागदासा ठी, पाणी टिपण्यास मोठा टिपकागद वापरतात. कागद वाळविण्यास हवा व उष्मा वा दोन्ही वापरण्यात येतात. पूर्वी, तो कपडे वाळविण्यासारखा दोरीस टांगुन वाळविल्या जात असे.आधुनिक काळात,वाळविण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या यांत्रिक पद्धती वापरल्या जातात.त्यात वाफेचा वापर करून एका दंडगोलास सुमारे २०० फॅ. या तपमानापर्यंत गरम केले जाते. अशे सुमारे ४० दंडगोल असू शकतात.त्याने कागदातील पाण्याचे प्रमाण ६% पर्यंत कमी होते.

शेवटचा हात[संपादन]

त्यानंतर कागदास वेगवेगळ्या कामासा ठीचा त्याचा वापर बघुन,त्याचे भौतिक गुणधर्म बदलण्यास, 'आकार' प्रक्रियेतुन जावे लागते. या वेळेपर्यंत कागद हा 'विनालेप' असतो. नंतर त्यावर 'लेपन' प्रक्रिया केली जाते.कॅल्शियम कार्बोनेट (खडु) किंवा चिनी मातीचा यासाठी वापर करतात.लेपन एका वा दोन्ही बाजुस केले जाते.त्याने कागदाचा पृष्ठभाग हाफटोनच्या कामासाठी अधिक चांगला होतो.लेपन न केलेले कागद हे त्या कामासा ठी अपवादानेच वापरण्यात येतात.

'कॅलेंडर' पद्धतीने लेपन वा न लेपन केलेले कागद यांना चकाकी आणण्यात येते.लेपन केलेले कागद हे मग,मॅट, सिल्क व चकाकणारा असेही राहु शकतात. चकाकणारे कागद हे उच्च दर्जाची दृश्य घनता देतात ज्याने चित्र छपाई सुंदर दिसते.

वेब छपाई साठी, मग कागद हा रीळांवर गुंडाळला जातो, वा मग त्याच्या वापरास अनुकूल अशी त्याची तावात कापणी होते. मशीनच्या चालीनुसार कागदाचे तंतु ठेविल्या जातात.ताव हे " लांबीनुसार तंतु " अश्या पद्धतीने ठेविल्या जातात,ते तावांच्या लांबीस समांतर असतात. त्या कागदास विविध पद्धती वापरुन अंगची कलाकुसर केली जाते. जसे जाळी,पाणचिन्ह(वॉटरमार्क) इत्यादी. ही प्रक्रिया सर्वात शेवटची असते.हातघडाईच्या कागदास विशिष्ट आकार रहात नाही व त्याची किनार चोपडी असते व तो खरखरीत असतो. [४]

वापर[संपादन]

त्याच्या वापरानुसार,वेगवेगळ्या गुणधर्मांचा कागद बनविल्या जाउ शकतो. [५]

 • वेष्टनास : नळीदार कागदाचे डब्बे, कागदी पिशवी|कागदी पिशव्या]] पाकिटे ,वेष्टन वॉलपेपर इत्यादी.
 • स्वच्छतेसः
 • बांधकामाचे साहित्य म्हणुन.
 • ईतर वापर:टिपकागद,लिटमस कागद, प्रतिरोधक कागद,फिल्टर पेपर

प्रकार,जाडी व वजन[संपादन]

कलेसा ठी वापरण्यात येणारे कागद हे वेगवेगळ्या आकारात व रंगात येतात.
मुख्य पाने: Paper sizePaper density

कागदाची जाडी ही कॅलिपरने मोजतात व ती इंचाच्या हजाराव्या भागात दिली जाते: [६] कागदाची जाडी ही ०.०७ मिलीमीटर (०.००२८ इंच) व ०.१८ मिलीमीटर (०.००७१ इंच)या दरम्यान राहुशकते.[७]

अकागद हा वजनानेही मोजल्या जातो.अमेरीकेत,५०० न कापलेल्या कागदांच्या रीमच्या वजन बघुन,एका कागदाचे वजन काढतात. उदाहरणार्थ-20 पाउंड वजनाच्या एका रीमला चार तुकड्यात कापले तर,त्याचे वजन ५ पाउंड होते., ८.५ इंच × ११ इंच (२१६ मिमी × २७९ मिमी)[८]

Paper is often characterized by weight. In the United States, the weight assigned to a paper is the weight of a ream, 500 sheets, of varying "basic sizes", before the paper is cut into the size it is sold to end customers. For example, In the United States, printing paper is generally 20 lb, 24 lb, or 32 lb at most. Cover stock is generally 68 lb, and 110 lb or more is considered card stock.

The ८.५ इंच × ११ इंच (२१५.९ मिमी × २७९.४ मिमी) size stems from the original size of a vat that was used to make paper.[संदर्भ हवा] At the time, paper was made from passing a fiber and water slurry through a screen at the bottom of a box. The box was १७ इंच (४३१.८ मिमी) deep and ४४ इंच (१,११७.६ मिमी) wide. That sheet, folded in half in the long direction, then twice in the opposite direction, made a sheet of paper that was exactly ८.५ इंच × ११ इंच (२१५.९ मिमी × २७९.४ मिमी).

In Europe, and other regions using the ISO 216 paper sizing system, the weight is expressed in grammes per square metre (g/m2 or usually just g) of the paper. Printing paper is generally between 60 g and 120 g. Anything heavier than 160 g is considered card. The weight of a ream therefore depends on the dimensions of the paper and its thickness.

The sizing system in Europe is based on common width to height ratios for different paper sizes. The largest standard size paper is A0 (A zero). Two sheets of A1, placed upright side by side fit exactly into one sheet of A0 laid on its side. Similarly, two sheets of A2 fit into one sheet of A1 and so forth. Common sizes used in the office and the home are A4 and A3 (A3 is the size of two A4 sheets).

The density of paper ranges from २५० kg/m3 (१६ lb/cu ft) for tissue paper to १,५०० kg/m3 (९४ lb/cu ft) for some speciality paper. Printing paper is about ८०० kg/m3 (५० lb/cu ft).[९]

Some paper types include:

कागदाचे भविष्य[संपादन]

Some manufacturers have started using a new, significantly more environmentally friendly alternative to expanded plastic packaging made out of paper, known commercially as paperfoam. The packaging has very similar mechanical properties to some expanded plastic packaging, but is biodegradable and can also be recycled with ordinary paper.[१०]

With increasing environmental concerns about synthetic coatings (such as PFOA) and the higher prices of hydrocarbon based petrochemicals, there is a focus on zein (corn protein) as a coating for paper in high grease applications such as popcorn bags.[११]

Also, synthetics such as Tyvek and Teslin have been introduced as printing media as a more durable material than paper.

हेही पाहा[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. Burns 1996, pp. 417f.
 2. Burger, Peter. Charles Fenerty and his Paper Invention. Toronto: Peter Burger, 2007. ISBN 978-0-9783318-1-8 pp.25-30
 3. Natural Resource Defense Council
 4. "Document Doubles" in Detecting the Truth: Fakes, Forgeries and Trickery, a virtual museum exhibition at Library and Archives Canada
 5. Grades and uses of paper. 2007-10-12 रोजी पाहिले.
 6. "कागद जाडी तक्ता", केस पेपर कंपनी एन्कॉ.(इंग्लिश मजकूर)
 7. "कागदाच्या तुकड्याची जाडी",
 8. McKenzie, Bruce G., The Hammermill Guide to Desktop Publishing in Business, p. 144, Hammermill Papers, 1989.
 9. Density of paper and paperboard. PaperOnWeb. 2007-10-31 रोजी पाहिले.
 10. PaperFoam Carbon Friendly Packaging
 11. Barrier compositions and articles produced with the compositions cross-reference to related application
 • Burns, Robert I. (1996), "Paper comes to the West, 800−1400", in Lindgren, Uta, Europäische Technik im Mittelalter. 800 bis 1400. Tradition und Innovation (4th ed.), Berlin: Gebr. Mann Verlag, pp. 413–422, ISBN 3-7861-1748-9 
 • Needham, Joseph (1986). Science and Civilization in China: Volume 5, Chemicals and Chemical Technology, Part 1, Paper and Printing. New York: Cambridge University Press, 1985. (also published in Taipei: Caves Books, Ltd., 1986.)
also referred to as:
 • Tsien, Tsuen-Hsuin, '"Paper and Printing," vol. 5 part 1 of Needham, Joseph Science and Civilization in China:. Cambridge University Press, 1986. ISBN 0-521-08690-6. (also published in Taipei: Caves Books, Ltd., 1986.)
 • "Document Doubles" in Detecting the Truth: Fakes, Forgeries and Trickery, a virtual museum exhibition at Library and Archives Canada

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत