Jump to content

"वडोदरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६५: ओळ ६५:


===बडोद्यात झालेले ४थे मराठी साहित्य संमेलन===
===बडोद्यात झालेले ४थे मराठी साहित्य संमेलन===
हे ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात २०१८ सालच्या १६ ते १८ फेब्रुवारी तारखांना भरले होते. डाॅ. लक्ष्मीकांत देशमुख संमेलनाध्यक्ष होते

संमॆलनात पास झालेले ठराव : -

१. धुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी सरकारचा निषेध करणारा ठराव संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात रविवारी मांडण्यात आला. सरकारच्या असंवेदनशीलतेबद्दल नाराजी व्यक्त करत, शासनाने सर्व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न समजून घेत प्रामाणिकपणे सोडवावेत, अशी मागणी करण्यात आली.

संमेलनात झालेली मुलाखत :-

डॉ. सुधीर रसाळ आणि प्रशांत दीक्षित यांनी यांनी नरेंद्र चपळगावकर यांची प्रकट मुलाखत घेतली.

एखादे नाटक, चित्रपट आवडला नाही तर पाहू नका... पुस्तक आवडले नाही तर वाचू नका... मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मग दुसऱ्याला नाही का... एखादी कलाकृती आवडली नाही म्हणून विरोध करण्यासाठी चार दगड मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला,’’ असा थेट सवाल करत, लोकांसमोर सकारात्मक इतिहास मांडा, विचारस्वातंत्र्य कोणाच्याही चरणी वाहू नका, नम्रतेने चिकित्सा करा, प्रश्न विचारा, असा मौलिक सल्ला ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी समाजाला उद्देशून दिला
धर्म, शासन, झुंडशाही आणि लेखक स्वत: हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे चार शत्रू आहेत. यातून बाहेर पडून नवा इतिहास घडवायचा असेल, तर उदारमतवादाची कास धरली पाहिजे, असे चपळगावकर यांनी सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सरकारचा वाढता हस्तक्षेप, दुर्मिळ होत चाललेले विचारवंत, मातृभाषेचा वाढत चाललेला न्यूनगंड, लेखकांच्या वाढत्या राजकीय, आर्थिक महत्त्वाकांक्षा अशा विविध मुद्द्यांना त्यांनी निर्भीडपणे स्पर्श केला.





१९:४८, २५ मार्च २०१८ ची आवृत्ती

वडोदरा
વડોદરા
भारतामधील शहर

लक्ष्मीविलास पॅलेस
वडोदरा is located in गुजरात
वडोदरा
वडोदरा
वडोदराचे गुजरातमधील स्थान
वडोदरा is located in भारत
वडोदरा
वडोदरा
वडोदराचे भारतमधील स्थान

गुणक: 22°18′N 73°12′E / 22.300°N 73.200°E / 22.300; 73.200

देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
जिल्हा वडोदरा जिल्हा
क्षेत्रफळ २३५ चौ. किमी (९१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४२३ फूट (१२९ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २०,६५,७७१
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


बडोद्याचे महाराजा श्री सयाजीराव गायकवाड

बडोदे किंवा बडोदा (गुजराती: વડોદરા) हे भारताच्या गुजरात राज्यातील एक प्रमुख शहर आहे. या शहराचे नाव वडोदरा, Baroda असेही लिहितात. २०११ साली २०.६५ लाख लोकसंख्या असलेले वडोदरा गुजरातमधील अहमदाबादसुरतखालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे तर भारतामधील २०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. वडोदरा शहर विश्वामित्री नदीच्या काठावर राजधानी गांधीनगरच्या १२० किमी आग्नेयेस वसले आहे.

१६व्या व १७व्या शतकांमध्ये मुघल साम्राज्याच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर अखेर १७२१ साली येथून मुघलांना हुसकावून लावण्यात मराठ्यांना यश आले. १७२१ साली येथे गायकवाड घराण्याने बडोदा संस्थान स्थापन केले. ब्रिटीश राजवटीदरम्यान देखील बडोदा संस्थानाला स्वायत्त दर्जा होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४९ साली बडोदा संस्थानाला भारतामध्ये विलीन होणे भाग पडले.

सध्या वडोदरा गुजरातमधील उद्योगाचे मोठे केंद्र मानले जाते. खनिज तेल उद्योगामुळे वडोदऱ्याची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे.

वाहतूक

वडोदरा विमानतळ शहराच्या ईशान्य भागात आहे व येथून दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूर इत्यादी प्रमुख शहरांसाठी थेट विमान सेवा उपलब्ध आहे. भविष्यकाळामध्ये वडोदरा विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात येईल असा अंदाज आहे. वडोदरा रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे क्षेत्रामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथे दररोज सुमारे १५० गाड्या थांबतात. वडोदऱ्याहून मुंबईकडे जाण्यासाठी वडोदरा एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, गुजरात एक्सप्रेस, सौराष्ट्र मेल, पश्चिम एक्सप्रेस ,शताब्दी एक्सप्रेस इत्यादी दररोज सुमारे ५० गाड्या उपलब्ध आहेत.

मुंबई ते दिल्ली दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ८ वडोदऱ्यामधून जातो. वडोदरा ते अहमदाबाद दरम्यानचा ९३ किमी लांबीचा राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १ हा नियंत्रित-प्रवेश महामार्ग भारतामधील [राष्ट्रीय महामार्ग]] जाळ्यातील पहिलाच गतिमार्ग आहे. ह्या मार्गामुळे वडोदरा व अहमदाबाद दरम्यान एका तासात प्रवास शक्य झाला आहे.

बडोद्यात झालेली मराठी साहित्य संमेलने

बडोद्यातले पहिले संमेलन

२००९ सालच्या आॅक्टोबरमध्ये बडोद्यात पहिल्यांदा मराठी साहित्य संमेलन भरले होते. बडोदे न्यायमंदिरासमोरच्या मोकळ्या मैदानात झालेल्या या सातव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तीकर होते. स्वागताध्यक्ष बॅरिस्टर संपतराव गायकवाड तर उद्घाटक सयाजीराव गायकवाड होते.

याच संमेलनापासून ' मराठी ग्रंथकारांचे संमेलन' हे मुळचे नाव बदलून 'महाराष्ट्र साहित्य संमेलन', असे व्यापक नाव देण्यात आले. तत्कालीन महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यात आलेले हे पहिलेच संमेलन होते. या संमेलनाच्या वेळी झालेल्या साहित्य दिंडीत लहान मुलेही सहभागी झाली होती.


बडोद्याचे दुसरे साहित्य संमेलन

१९२१ सालच्या नोव्हेंबरमध्ये बडोद्यात दुसरे मराठी साहित्य संमेलन झाले. ते साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली राजमहालाच्या प्रांगणात भरले होते. न. चिं. केळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर वाद निर्माण झाला.

त्यावेळी केसरीचे संपादक असलेल्या केळकरांनी कोल्हापूरचे शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्यातल्या वादासंदर्भात २१ सालच्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शाहू महाराजांच्या विरोधात लेखन केलले होते, त्यामुळे संतापलेल्या काही लोकांनी शाहू महाराज हे सयाजीराव महाराजांचे व्याही असल्याचे कारण पुढे करत केळकर यांची निवड रद्द करण्याची मागणी केली होती.

केळकरांनी स्वतःहून राजीनामा द्यावा असाही प्रस्ताव देण्यात आला. पण स्वागताध्यक्ष संपतराव गायकवाड यांनी ठाम भूमिका घेतली आणि ही मागणी तसेच हा प्रस्ताव फेटाळून लावला.

या मराठी संमेलनाच्या साहित्य दिंडीत लेझीम पथक, मल्लखांब आणि लष्करी परेड होती. या परेडमध्ये पायदळ, घोडदळ आणि तोफखाना यांचा समावेश होता.

न. चिं. केळकर यांनी त्या वर्षी अध्यक्षपदावरून बोलताना अडीच तास भाषण केले. भाषण सुरू असताना कोणत्याही महत्त्वाच्या व्यक्तीनं उठून जायचे नाही, अशी अट त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच घातली होती.

हे ११वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते.

बडोद्यातले ३रे साहित्य संमेलन

१९३४ साली बडोद्यात तिसरे संमेलन झाले. हे २०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते. ना. गो. चापेकर संमेलनाध्यक्ष होते, तर नानासाहेब शिंदे स्वागताध्यक्ष.

न्यायमंदिर हॉलमध्ये झालेल्या या संमेलनातही लष्करी परेड झाली.

या संमेलनाला वि. स. खांडेकर, कवी अनिल, वामन मल्हार जोशी आदी उपस्थित होते. कवी माधव ज्युलियन संमलनाचे अध्यक्ष होते. त्या वर्षी उत्कृष्ट कवितेसाठीचं सुर्वणपदक बा. भ. बोरकर यांना मिळाले होते. त्यांनी त्यावेळी तेथे कर माझे जुळती आणि मुशाफिर या कविता सादर केल्या होत्या.

बडोद्यात झालेले ४थे मराठी साहित्य संमेलन

हे ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात २०१८ सालच्या १६ ते १८ फेब्रुवारी तारखांना भरले होते. डाॅ. लक्ष्मीकांत देशमुख संमेलनाध्यक्ष होते

संमॆलनात पास झालेले ठराव : -

१. धुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी सरकारचा निषेध करणारा ठराव संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात रविवारी मांडण्यात आला. सरकारच्या असंवेदनशीलतेबद्दल नाराजी व्यक्त करत, शासनाने सर्व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न समजून घेत प्रामाणिकपणे सोडवावेत, अशी मागणी करण्यात आली.

संमेलनात झालेली मुलाखत :-

डॉ. सुधीर रसाळ आणि प्रशांत दीक्षित यांनी यांनी नरेंद्र चपळगावकर यांची प्रकट मुलाखत घेतली.

एखादे नाटक, चित्रपट आवडला नाही तर पाहू नका... पुस्तक आवडले नाही तर वाचू नका... मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मग दुसऱ्याला नाही का... एखादी कलाकृती आवडली नाही म्हणून विरोध करण्यासाठी चार दगड मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला,’’ असा थेट सवाल करत, लोकांसमोर सकारात्मक इतिहास मांडा, विचारस्वातंत्र्य कोणाच्याही चरणी वाहू नका, नम्रतेने चिकित्सा करा, प्रश्न विचारा, असा मौलिक सल्ला ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी समाजाला उद्देशून दिला धर्म, शासन, झुंडशाही आणि लेखक स्वत: हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे चार शत्रू आहेत. यातून बाहेर पडून नवा इतिहास घडवायचा असेल, तर उदारमतवादाची कास धरली पाहिजे, असे चपळगावकर यांनी सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सरकारचा वाढता हस्तक्षेप, दुर्मिळ होत चाललेले विचारवंत, मातृभाषेचा वाढत चाललेला न्यूनगंड, लेखकांच्या वाढत्या राजकीय, आर्थिक महत्त्वाकांक्षा अशा विविध मुद्द्यांना त्यांनी निर्भीडपणे स्पर्श केला.


(अपूर्ण)

हेही पहा

बाह्य दुवे