"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १२९: | ओळ १२९: | ||
* विनोद दोशी (स्मृती) नाट्य महोत्सव (इ.स. २००९पासून), पुणे |
* विनोद दोशी (स्मृती) नाट्य महोत्सव (इ.स. २००९पासून), पुणे |
||
* पिंपरी-चिंचवड येथील प्रयोग या संस्थेचा प्रायोगिक व बालनाट्य महोत्सव |
* पिंपरी-चिंचवड येथील प्रयोग या संस्थेचा प्रायोगिक व बालनाट्य महोत्सव |
||
==नाट्यस्पर्धा== |
|||
* फिरोदिया करंडक एकांकिका स्पर्धा |
|||
* चंद्र सूर्य रंगभूमी या नृत्य-नाट्य-संगीत संस्थेच्या आंतरशालीय एकांकिका स्पर्धा |
|||
* पुरुषोत्तम करंडक नाट्यस्पर्धा |
|||
== रंगभूषाकार== |
== रंगभूषाकार== |
१४:४३, २६ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती
नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यमय कलाकृती. नाटकामध्ये शब्दसंहिता, कथानक, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना, अभिनय आणि कथानक असू शकते. पण यांतली एकही गोष्ट नाटकासाठी अपरिहार्य वा अनिवार्य नाही. सॅम्युअल बेकेट यांचे 'ब्रेथ' हे नाटक शब्दसंहिताविरहित आणि अभिनयविरहित आहे. नाटकाचा प्रयोगकाल काही सेकंदांपासून (उदा. ब्रेथ) बारा तासांपर्यंत(उदा. पीटर ब्रुक यांचे महाभारत) असू शकतो. ‘वाडा चिरेबंदी’सारखे नाटक सलग सादर न करता दोन दिवसही सादर होऊ शकते. नभोवाणीवरील श्रुतिका एकाहून अधिक दिवस चालू शकतात, तर दूरचित्रवाणीवर मालिका महिनोन्महिने चालतात.
इतिहास
भारतीय रंगभूमीचा इतिहास प्राचीन आहे. भास हा एक प्राचीन भारतीय नाटककार होता. तसेच कालिदास हा कवी नाटककार होता. ही नाटके बहुधा संस्कृत भाषेत असली तरी त्यांतली काही पात्रे प्राकृत भाषेत बोलत.
नाट्यकोश
मुख्यत्वे मराठी भाषेतील नाट्यसृष्टीची साद्यंत माहिती देणारा ’मराठी नाट्यकोश’, मराठी लेखक डॉ. वि.भा. देशपांडे यांनी संपादित केला आहे. १२००हून अधिक पृष्ठांच्या या ग्रंथाचा हिंदी अनुवाद अमेय इन्स्पायरिंग बुक्सतर्फे प्रकाशित करण्यात आला आहे.
नाटकांचे प्रकार
- अतिनाट्य (मेलोड्रामा)
- अभिजात नाटक
- असंगत नाट्य (न-नाट्य)
- आधुनिक अभिजात नाटक
- एकपात्री नाटक
- एकांकिका
- ऐतिहासिक नाटक
- कलावादी नाटक
- गद्यनाटक
- चर्चानाट्य
- चित्रनाट्य
- जीवनवादी नाटक
- तमाशा
- दशावतार
- दूरचित्रवाणी मालिका
- दीर्घनाटक
- न-नाट्य (असंगत नाट्य)
- नभोनाट्य (श्रुतिका)
- नाटिका
- नाट्यछटा
- नाट्यत्रयी
- नाट्यवाचन
- नृत्यनाटिका (बॅले)
- पथनाट्य
- पुरुषपात्रविरहित नाटक
- पौराणिक नाटक
- प्रहसन (फार्स)
- प्रायोगिक नाटक
- फिजिकल नाटक
- बालनाट्य
- बाहुली नाट्य (कठपुतळी)
- बिनवास्तववादी नाटक (फॅन्टसी)
- भक्तिनाट्य
- भयनाट्य
- भविष्य नाटक (फ्यूचरिस्ट प्ले)
- मिथकाधारित नाटक (मिथ्-बेस्ड)
- मूकनाट्य
- लघुनाटक
- लळीत
- लोकनाट्य
- वास्तववादी नाटक
- विधिनाट्य
- विनोदी नाटक
- विशिष्टकाळ नाट्य (पीरियड प्ले)
- विज्ञान नाटक (सायन्स-फॅन्टसी)
- व्यक्तिकेंद्री नाटक
- शोकात्मिका
- स्त्रीपात्रविरहित नाटक
- श्रुतिका (नभोनाट्य)
- संगीत नाटक
- संगीतिका (ऑपेरा)
- समस्याप्रधान नाटक
- समूहकेंद्री नाटक
- साभिनय नाट्यवाचन
- सामाजिक नाटक
- सुखात्मिका
- सुरचित नाटक (वेल्-मेड्-प्ले)
- क्षोभ नाट्य
मराठी नाटके
मराठी नाटकांना संगीत नाटकांची परंपरा आहे. संगीत मानपमान, संशयकल्लोळ, शारदा आदी नाटके प्रचंड गाजली आहेत. त्यातील पदे अनेकदा गायली जातात.
मराठी नाटकांच्या परंपरेत प्रायोगिक रंगभूमीचे फार मोठे महत्त्व आहे.
रंगभूमीचे प्रकार आणि शाखा
- आसामी रंगभूमी
- उर्दू रंगभूमी
- एलिचपूरची नाट्यपरंपरा
- ओरिसा रंगभूमी
- कानडी रंगनभूमी
- कामगार रंगभूमी
- गुजराथी रंगभूमी
- ग्रिप्स थिएटर
- ग्रीक रंगभूमी
- झाडीपट्टीची रंगभूमी
- तंजावरी रंगभूमी
- तामीळ रंगभूमी
- तिसरी रंगभूमी
- तेलगू रंगभूमी
- दलित रंगभूमी
- निमव्यावसायिक रंगभूमी
- पंजाबी रंगभूमी
- परिसर रंगभूमी
- पारसी रंगभूमी
- प्रचार रंगभूमी
- प्रसार रंगभूमी
- प्रायोगिक रंगभूमी
- प्रौढ रंगभूमी
- बंगाली रंगभूमी
- बाल रंगभूमी
- ब्लॅक रंगभूमी
- मल्याळी रंगभूमी
- लोककला रंगभूमी
- संस्कृत रंगभूमी
- समांतर रंगभूमी
- सिंधी रंगभूमी
- स्त्री-रंगभूमी (हिंदीत नारी-रंगभूमी]])
- विद्यार्थी रंगभूमी
- व्यस्ततावादी रंगभूमी
- व्यावसायिक रंगभूमी
- हिंदी रंगभूमी
- हौशी रंगभूमी
नाट्यशास्त्र अध्यापन संस्था
- चतुरंग प्रतिष्ठान, पुणे
- भरत नाट्यसंशोधन मंदिर, पुणे
- मराठवाडा विद्यापीठ(नाट्यशास्त्र विभाग), औरंगाबाद
- मॉडर्न महाविद्यालय, पुणे
- ललितकला केंद्र, पुणे विद्यापीठ, पुणे
नाट्य महोत्सव
महाराष्ट्रात वेळोवेळी अनेक नाट्य महोत्सव होतात. महोत्सवांत उत्तमोत्तम नाटके रंगमंचावर सादर होतात. काही नाट्य महोत्सव --
- विनोद दोशी (स्मृती) नाट्य महोत्सव (इ.स. २००९पासून), पुणे
- पिंपरी-चिंचवड येथील प्रयोग या संस्थेचा प्रायोगिक व बालनाट्य महोत्सव
नाट्यस्पर्धा
- फिरोदिया करंडक एकांकिका स्पर्धा
- चंद्र सूर्य रंगभूमी या नृत्य-नाट्य-संगीत संस्थेच्या आंतरशालीय एकांकिका स्पर्धा
- पुरुषोत्तम करंडक नाट्यस्पर्धा
रंगभूषाकार
नाटक रंगभूमीवर सादर करण्यासाठी त्यातील कलाकारांना सुयोग्य वेश चढवणे आणि त्यांच्या चेहऱ्याची रंगरंगोटी करणे हे रंगभूषाकारांचे काम असते. मराठी नाटय सृष्टीतले असे काही रंगभूषाकार --
- पंढरीनाथ जूकर
- कृष्णा बोरकर (जन्म : इ.स. १९३३)
नाट्यगृहे
नाटके आणि अन्य करमणुकीचे किंवा राजकीय व सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक नाट्यगृहे आहेत.यांतील बरीच त्या त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी बांधलेली आहेत, आणि या सभागृहांचे व्यवस्थापन त्या संस्था पाहतात.
बृहन्महाराष्ट्रातील प्रमुख नाट्यगृहे :
- अमर ग्यान ग्रोव्हर, (हाजीअली), मुंबई;(आसनसंख्या६५८)
- अल्फोन्सो, मुंबई
- आचार्य अत्रे नाट्य रंगमंदिर, कल्याण
- अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी(पिंपरी-चिंचवड)
- अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंबई
- डॉ.अ.ना. भालेराव (साहित्य संघ), गिरगाव, मुंबई
- आनंद विधान,अहमदनगर
- आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का, पुणे
- आंबेडकर शताब्दी भवन, मुंबई
- इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नाट्यगृह, चिपळूण
- इंद्रधनुष्य हॉल, म्हात्रे पूल, दत्तवाडी चौक (पुणे)
- इस्कॉन सभागृह, जुहू, मुंबई; (आसनसंख्या ४००)
- उद्यान प्रसाद, पुणे
- एन.सी.पी.ए. चे टाटा थिएटर, नरीमन पॉइन्ट, मुंबई
- एन.सी. पी.ए. चे गोदरेज सभागृह
- एन.सी.पी.ए.चे टाटा नाट्यगृह
- एन.सी.पी.ए. चा टाटा प्रायोगिक नाट्य रंगमंच
- एन.सी.पी.ए. चा जमशेदजी भाभा हॉल
- एस.एन.डी.टी. कॉलेज सभागृह, पुणे
- एस.एम. जोशी हॉल, पुणे
- औंधकर नाट्यगृह, बार्शी
- कर्नाटक संघ (झवेरभाई पटेल सभागृह, पंडित विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम, मुंबई;(आसनसंख्या ७७४)
- कॉकटेल थिएटर, मुंबई
- कामगार क्रीडा केंद्र, परळ, मुंबई
- कामा हॉल, काळा घोडा, मुंबई
- कालिदास, नाशिक
- कालिदास, मुलुंड, मुंबई; (आसनसंख्या १५८०)
- कावसजी जहांगीर हॉल, फ्लोरा फाउंटन, मुंबई
- कावसजी पटेल हॉल, धोबी तलाव, मुंबई
- काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
- काळे सभागृह, पुणे
- कीर्तन केंद्र, संघवी शाळेसमोर, जुहू, मुंबई
- केशवराव भोसले नाट्यगृह (पॅलेस थिएटर), खासबाग(कोल्हापूर)
- गडकरी रंगायतन, ठाणे;(आसनसंख्या ८००)
- गणेश कला केंद्र, पुणे
- गणेश नाट्यगृह, इचलकरंजी
- गरवारे महाविद्यालय सभागृह, पुणे
- गर्दे वाचनालयाचे सभागृह, बुलढाणा
- गोखले सभागृह, पुणे
- ग्रोव्हर ऑडिटोरियम, हाजी अली(मुंबई)
- घाटे नाट्यगृह, सातारा
- चंद्रशेखर ऑडिटोरियम, पुणे विद्यापीठ परिसर(पुणे)
- चिंदोडी लीला रंगमंदिर, बेळगाव (आता पाडून टाकले.)
- छबिलदास रंगमंच, दादर, मुंबई; (आसनसंख्या७००)
- जयहिंद कॉलेज सभागृह, मरीन लाइन्स, मुंबई; (आसनसंख्या ५५०)
- जुहू जागृती, मिठीबाई कॉलेजजवळ, विलेपार्ले, मुंबई; (आसनसंख्या २५०)
- जैन संघ, कोथरूड (पुणे)
- जोशी लोखंडे प्रकाशन सभागृह, पुणे
- झवेरबेन सभागृह, घाटकोपर(मुंबई)
- झवेरभाई पटेल सभागृह ,(कर्नाटक संघ, विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम(मुंबई)
- टाटा थिएटर (एन्.सी.पी.ए.), नरीमन पॉइन्ट, मुंबई
- टिंबर भवन , यवतमाळ
- टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड(पुणे)
- तमिळ संघम्(षण्मुखानंद),माटुंगा
- तापडिया नाट्यमंदिर, औरंगाबाद
- तेजपाल ऑडिटोरियम, गोवालिया टँक, मुंबई
- तेंडुलकर रेस्टॉरन्ट्स हॉल, मुंबई
- दर्शन हॉल , चिंचवड
- दादासाहेब गायकवाड, नाशिक
- दामोदर हॉल (दामोदर ठाकरसी नाट्यगृह), परळ, मुंबई;(आसनसंख्या८०३)
- दीनानाथ मंगेशकर, विले पार्ल पूर्व, मुंबई;(आसनसंख्या१०१०)
- दीनानाथ नाट्यगृह, सांगली. (हे नाट्यगृह पाडून तेथे नवीन नाट्यगृह बांधण्याचे घाटते आहे--२०१२मधली बातमी).
- देवांग मेहता ऑडिटोरियम, सेनापती बापट रस्ता, पुणे
- नवीनभाई ठक्कर हॉल, विले पार्ले (पूर्व), मुंबई
- नाट्यपरिषद रंगमंच, माहीम, मुंबई
- नूतन मराठी विद्यालय, पुणे
- नेहरू मेमोरियल हॉल,पुणे
- नेहरू सेंटर, हाजी अली, वरळी, मुंबई
- पंडित विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर (कर्नाटक संघ, झवेरभाई पटेल सभागृह), माहीम, मुंबई;(आसनसंख्या ७७४)
- पत्रकार भवन, पुणे
- परशुराम सायखेडकर, नाशिक
- पलुस्कर सभागृह, पंचवटी(नाशिक)
- पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह), कोल्हापूर्
- पाटकर हॉल , सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, मरीन लाइन्स(मुंबई)
- पाटोळे नाट्यगृह, मलकापूर
- पाटोळे नाट्यगृह, खामगाव
- पुरंदरे नाट्यगृह, पंढरपूर
- पु.ल. देशपांडे सभागृह
- पृथ्वी थिएटर, जुहू चर्च रोड, मुंबई(आसनसंख्या २२०)
- प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली(पश्चिम), मुंबई
- प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटर, बोरीवली(प), मुंबई
- फर्ग्युसन कॉलेजचे अॅम्फी थिएटर, पुणे
- फाइन आर्ट्स,चेंबूर, मुंबई
- बाकानेर, नागपूर
- बागडे नाट्यगृह, अहमदनगर
- बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज(पुणे)
- बालगंधर्व, मिरज
- बालप्रसार, नागपूर
- बालमोहन, शिवाजी पार्क(मुंबई)
- बाल शिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, पुणे
- बिर्ला क्रीडा केंद्र, गिरगाव चौपाटी(मुंबई); (आसनसंख्या ६१७)
- बिर्ला मातुश्री, मरीन लाइन्स(मुंबई); (आसनसंख्या११६२)
- बी.एन.वैद्य हॉल, हिंदू कॊलनी(मुंबई)
- बुरीबेन गॊळवाला, घाटकोपर(मुंबई)
- ब्रह्मानंद, नाशिक
- भरत नाट्यमंदिर, डोंबिवली
- भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ(पुणे)
- भाईदास, पार्ले, मुंबई; (आसनसंख्या ११५७)
- भारतीय विद्या भवन, गिरगाव चौपाटी, मुंबई; (आसनसंख्या ५००)
- भालेराव (साहित्य संघ), गिरगाव, मुंबई
- भावे स्कूल सभागृह, पेरूगेट(पुणे)
- भोसरी नाट्यगृह , पिंपरी-चिंचवड, पुणे
- मराठी साहित्य परिषद हॉल(माधवराव पटवर्धन सभागृह), पुणे
- मरीन प्लाझा, मरीन ड्राइव्ह, मुंबई
- मॉडर्न हायस्कूलचे सभागृह, पुणे
- माहीम म्युनिसिपल स्कूल सभागृह, मुम्बई
- माणिक सभागृह, वांद्रे रिक्लेमेशन,मुंबई; (आसनसंख्या ८००)
- मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
- मीनाताई ठाकरे, भिवंडी
- मुक्तांगण हायस्कूल हॉल, शिवदर्शन चौक, पुणे
- मेकॉनकी नाट्यगृह, सोलापूर
- म्हैसूर सभागृह, किंग्ज सर्कल, मुंबई
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अहमदनगर
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड(पुणे)
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बॉम्बे रेक्लमेशन, मुंबई; (आसनसंख्या ६००)
- यशवंत नाट्यमंदिर, मनमाला टँक रोड, माटुंगा, मुंबई
- रंगभवन खुले नाट्यगृह, धोबी तलाव, मुंबई
- रंगशारदा, वांद्रे रिक्लेमेशन, मुंबई;(आसनसंख्या ८११)
- रघुवीर, नागपूर
- रमणबाग, पुणे
- रशियन सांस्कृतिक केंद्र, पेडर रोड, मुंबई
- रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई; (आसनसंख्या ९११)
- रवींद्र नाट्यमंदिर मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई(आसनसंख्या १९९)
- रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड (पुणे)
- राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
- रावसाहेब गोगटे रंगमंदिर, बेळगाव
- लक्ष्मी नारायण बाग हॉल, शिवाजी पार्क, मुंबई १६
- लक्ष्मीप्रसार, कोल्हापूर
- लक्ष्मीविलास, जळगाव
- लेडी रमाबाई हॉल, एस. पी.कॉलेज(पुणे)
- वरेरकर नाट्य संघाचे महावीर मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
- वागळे हॉल, खाडिलकर रोड, गिरगाव, मुंबई
- विजयानंद, धुळे
- विजयानंद, नाशिक
- विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर (कर्नाटक संघ, झवेरभाई पटेल सभागृह), माहीम, मुंबई;(आसनसंख्या ७७४)
- विष्णुदास भावे, वाशी, नवी मुंबई
- वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर, अमरावती
- शांतादुर्गा, कणकवली
- शाहू स्मारक मंदिर, कोल्हापूर
- शिवाजी नाट्यगृह, कोल्हापूर
- शिवाजी मंदिर, दादर, मुंबई; (आसनसंख्या १०३२)
- श्रीराम, अकोले(विदर्भ)
- षण्मुखानंद(तमिळ संघम्), माटुंगा(मुंबई)
- संगीत नाट्यगृह, सोलापूर
- सर्वेश, डोंबिवली
- साठ्ये कॉलेज हॉल, विले पार्ले, मुंबई
- सायखेडकर, नाशिक
- सावित्रीबाई फुले, डोंबिवली
- साक्षी गॅलरी, लोअर परेल, मुंबई
- साहित्य संघ मंदिर, गिरगांव, मुंबई (आसनसंख्या ८००)
- सुदर्शन रंगमंच, पुणे
- सुयोग सोसायटी, मुंबई
- सेन्ट ॲन्ड्ऱ्यूज कॉलेज सभागृह, वांद्रे(प),मुंबई
- सोफिया भाभा हॉल, ब्रीच कॅन्डी, मुंबई; (आसनसंख्या ८१८)
- स्नेहसदन, पुणे
- हनुमान नाट्य मंदिर, दाभोळ
- हॅपी कॉलनी हॉल, कोथरूड(पुणे)
- हॉर्निमन सर्कल गार्डन,मुंबई
- हिंदुजा ऑडिटोरियम, गिरगाव, मुंबई;(आसनसंख्या ६४१)
- होमी भाभा सभागृह, नेव्हीनगर, मुंबई;(आसनसंख्या१०३०)
पुण्यातली जुनी बंद झालेली नाट्यगृहे
- आनंदोद्भव, पुणे
- आर्यभूषण तमाशा थिएटर, पुणे
- किर्लोस्कर, पुणे
- नटराज रंगमंदिर, पुणे
- पूर्णानंद, पुणे
- बहुरूपी मंदिर, पुणे
- बाजीराव, पुणे
- भानुविलास (आता तेथे भानुविलास चित्रपटगृह), पुणे
- महाराष्ट्रीय मंडळ, पुणे
- ललकार, पुणे
- लक्ष्मीविलास, पुणे
- किबे नाट्यगृह (नंतरचे लिमये नाट्यचित्रमंदिर, आता विजय टॉकीज), पुणे
- वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे
- सरस्वती मंदिर, पुणे
मुंबईतील जुनी बंद झालेली तमाशा थिएटरे व नाट्यगृहे
- ऑपेरा हाउस (तिथे नंतर न्यू ऑपेरा हाउस चित्रपटगृह), गिरगांव
- एम्पायर
- एली कदूरी हायस्कूलसमोरचे थिएटर, माझगांव
- कॉरोनेशन
- केळीच्या वखारीशेजारचे थिएटर, भायखळा(पश्चिम)
- कृष्ण थिएटर
- गुलशन थिएटर(तिथे आता त्याच नावाचे चित्रपटगृह)
- गेइटी
- ग्रॅन्ड
- डिलाइल रोड थिएटर
- ताज थिएटर
- दौलत थिएटर, बटाट्याच्या चाळीसमोर, पिला हाउस
- नायगाव थिएटर
- नॉव्हेल्टी (आता तेथे नॉव्हेल्टी चित्रपटगृह), ग्रॅन्ट रोड
- न्यू एलफिन्स्टन थिएटर, ग्रॅन्ट रोड
- न्यू हनुमान थिएटर, लालबाग (आता तिथे ‘न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय’)
- पलटण रोड थिएटर (क्रॉफर्ड मार्क्रेटजवळ)
- प्रिन्सेस
- बालीवाला थिएटर (तिथे आता आल्फ्रेड चित्रपटगृह), पिला हाउस
- बॉम्बे थिएटर, पिला हाउस
- बीडीडी चाळीजवळचे थिएटर , वरळी
- भांगवाडी थिएटर, काळबादेवी
- राणीच्या बागेतले खुले थिएटर
- रॉयल थिएटर (आता चित्रपटगृह), पिला हाउस
- रिपन थिएटर (आताचे रोशन चित्रपटगृह),पिला हाउस
- लोकमान्य थिएटर
- वडाचा नाका थिएटर (दीपक टॉकीजशेजारी, ग्लोब मिल पॅसेज, वरळी)
- शिवानंद थिएटर, प्लाझा टॉकीजमागे, दादर
- सैतान चौकीजवळचे थिएटर
- व्हिक्टोरिया
विदर्भातली बंद झालेली नाट्यगृहे
- धनवटे रंग मंदिर, नागपूर
अन्य गावांतील बंद झालेली नाट्यगृहे
- चिंदोडी लीला रंगमंदिर, बेळगाव
- सदासुख, सांगली (हे नाट्यगृह १८८७मध्ये बांधले होते.)
- हंसप्रभा, सांगली (हे नाट्यगृह १८९७मध्ये बांधले होते.) त्या जागी आता (नवे) बालगंधर्व नाट्यगृह आहे.
- दीनानाथ नाट्यगृह, सांगली.
नाटकाचे आद्य प्रवर्तक
ज्याला अस्सल मराठी नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक बळवंत पांडुरंग किर्लोस्कर (१८४३-१८८५) हे होत. किर्लोस्करांनी कविकुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले.[१]
प्रसिद्ध मराठी नाटककार
- जयवंत दळवी
- दिलीप परदेशी
- पु.ल. देशपांडे
- प्रेमानंद गज्वी
- महेश एलकुंचवार
- डॉ. रंजन दारव्हेकर
- रत्नाकर मतकरी
- वसंत कानेटकर
- विजय तेंडुलकर
- वि. वा. शिरवाडकर
- श्याम मनोहर
- सतीश आळेकर
नाटके लिहिणाऱ्या लेखकांमध्ये पुरुष नाटककारांची संख्या तीनशेहून बरीच अधिक आहे. स्त्री नाटककारांची संख्या मात्र तिसाहून अधिक नसावी. नाट्यलेखन करणाऱ्या काही प्रमुख लेखिका :
- काशीबाई फडके
- गिरिजाबाई केळकर
- मालती तेंडुलकर
- शकुंतला परांजपे
- सई परांजपे
यांशिवाय काही नवोदित लेखिका :
- इरावती कर्णिक
- मनस्विनी लता रवींद्र
- मधुगंधा कुलकर्णी
- विभावरी देशपांडे
प्रसिद्ध नाटके
हेही पहा
आक्षेप घेतलेली नाटके
विविध संघटनांनी नाटकाच्या नावावर, कथानकावर किंवा कथानकाच्या काही भागांवर आक्षेप घेऊन बंद पाडलेली किंवा बंद पाडायचा प्रयत्न केलेली काही नाटके :
- एक चावट संध्याकाळ (नाटक फक्त प्रौढांसाठी असल्याने स्त्रियांना आयोजकांनी मनाई केली)(बोरीवली नाट्यगृहाची बंदी)(मुंबई महापालिकेचीही बंदी)
- संगीत कीचकवध (लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर)(या नाटकावर ब्रिटिशांनी २७ जानेवारी १९१० रोजी बंदी घातली. नाटकातील कीचक म्हणजे इंग्रज अधिकारी कर्झन या कल्पनेमुळे)
- कुलवधु नाटकात ज्योत्स्ना भोळे यांच्या पाचवारी साडी नेसण्यावरून वाद झाले होते.
- गणपतीबाप्पा मोरया (लेखक योगेश सोमण). याच नावाचे वेगळ्या लेखकाचे एक बालनाट्यही आहे, त्यावर आक्षेप नव्हता.
- गांधी विरुद्ध गांधी (लेखक अजित दळवी).गांधीच्या नावाचा तथाकथित दुरूपयोग. आक्षेप टिकला नाही.
- घाशीराम कोतवाल (लेखक विजय तेंडुलकर). नाटकात केलेल्या नाना फडणिसांचे तथाकथित विकृतीकरण केल्यावरून नाटकावर आक्षेप घेतला गेला होता.
- पती माझे छत्रपती (संजय पवार). ह्या नाटकाचे आता ’पती माझे छत्रीपती‘ या नावाने प्रयोग होतात.
- बंधविमोचन (लेखक गोपाळ गोविंद सोमण) (ब्रिटिश सरकारच्या सचिवाच्या आज्ञेवरून मुंबई पोलीस आयुक्तांनी या नाटकावर अनौपचारिक बंदी घातली होती.)
- संगीत भातुकलीचा खेळ (लेखक धोंडो रामचंद्र करमरकर ) या बालनाट्यावर तत्कालीन इंग्रज सरकारने बंदी घातली होती.
- मी नथुराम गोडसे बोलतोय (लेखक प्रदीप दळवी).नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण केल्याचा आरोप.
- यदाकदाचित (संजय पवार). नाटकात देवदेवतांचे विकृत चित्रण आहे हा आक्षेप होता.
- योनीमनीच्या गुजगोष्टी (बोरीवलीच्या नाट्यगृहाची बंदी)(ठाणे महापालिकेचीही बंदी)
- संगीत राष्ट्रोद्धार (प्रयोगावर बंदी आल्यानंतर नाटकाच्या संहितेच्या प्रती गुप्तपणे वाटल्या गेल्या.)
- वस्त्रहरण (लेखक गंगाराम गवाणकर). महाभारताची तथाकथित चेष्टा करण्यावरून.
- विजयतोरणा (या नाटकाच्या १५ कलाकारांना ब्रिटिश सरकारने एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती.)
- शँपेन आणि मारुती या नाटकाचे नाव बदलून ’माकडाच्या हाती शँपेन’ असे करावे लागले.
- शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला(भीमनगर शब्दाबद्दल नांदेड पोलिसांचा आक्षेप)
- सखाराम बाईंडर (लेखक विजय तेंडुलकर). नाटकात साडी बदलण्याचे एक दृश्य होते. न्यायाधीशांनी ते पाहून नाटकावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली.
- स्वदेशी नाटक -१९०६ (लेखक गणेश बल्लाळ फणसाळकर) (सरकारी बंदी) (प्रयोगावर बंदी आल्यानंतर नाटकाच्या प्रती नाममात्र किमतीला विकल्या गेल्या.)
मराठीतली काही बोल्ड नाटके
- अवध्य (लेखक चि.त्र्यं. खानोलकर)
- एक चावट संध्याकाळ (लेखक अशोक पाटोळे)
- गेली एकवीस वर्षे (धर्मकीर्ती सुमंत)
- मात्र रात्र
- म्युझिक सिस्टिम (दिग्दर्शक विजय केंकरे)
- नाटक नको
- योनीमनीच्या गुजगोष्टी
- सखाराम बाईंडर (लेखक विजय तेंडुलकर)
संदर्भ
पहा : महाराष्ट्रातील नाट्य संस्था, नाट्यस्पर्धा
पाचशेहून अधिक प्रयोग झालेली नाटके
नाटकाचे नाव | लेखक | शेवटच्या ज्ञात प्रयोगाची क्रमसंख्या | त्या प्रयोगाची तारीख |
---|---|---|---|
अश्रूंची झाली फुले | वसंत कानेटकर | ****** | ॑॑॑॑॑ |
इथे ओशाळला मृत्यू | वसंत कानेटकर | ****** | ॑॑॑॑॑ |
एका लग्नाची गोष्ट | श्रीरंग गोडबोले | १००० | ३०-१-२००५ |
संगीत एकच प्याला | राम गणेश गडकरी | ****** | ॑॑॑॑॑ |
कचऱ्या हिंदुस्थानी (एकपात्री) | रमेश थोरात | ७६९ | १२-१०-२०११ |
कट्यार काळजात घुसली | पुरुषोत्तम दारव्हेकर | ****** | ॑॑॑॑॑ |
कथा अकलेच्या कांद्याची | शंकर पाटील | ****** | ॑॑॑॑॑ |
करायला गेलो एक | बाबूराव गोखले | ****** | ॑॑॑॑॑ |
कुटुंब रंगलंय काव्यात (एकपात्री नाट्यानुभव) | विश्वनाथ श्रीधर तथा विसुभाऊ बापट | २२५० | १७-७-२०११ |
गारंबीचा बापू | श्री.ना. पेंडसे | ****** | ॑॑॑॑॑ |
गुंतता हृदय हे | शं.ना. नवरे | ****** | ॑॑॑॑॑ |
गेला माधव कुणीकडे | वसंत सबनीस | १७४६ | ५-१-२०१३ |
गोकुळचा चोर | नानासाहेब शिरगोपीकर | ****** | ॑॑॑॑॑ |
घाशीराम कोतवाल | विजय तेंडुलकर | १८५० | १८-१-२०१२ |
घोटभर पाणी (एकांकिका) | प्रेमानंद गज्वी | ३००१ | २६-५-२०१२ |
झोपी गेलेला जागा झाला | बबन प्रभू | ****** | ॑॑॑॑॑ |
तरुण तुर्क म्हातारे अर्क | मधुकर तोरडमल | ****** | ॑॑॑॑॑ |
तुझे आहे तुजपाशी | पु.ल.देशपांडे | ****** | ॑॑॑॑॑ |
तो मी नव्हेच | आचार्य प्र.के.अत्रे | २८६३ | १४-३-२०१२ |
दिनूच्या सासूबाई राधाबाई | बबन प्रभू | ****** | ॑॑॑॑॑ |
दुरितांचे तिमिर जावो | बाळ कोल्हटकर | ****** | ॑॑॑॑॑ |
नटसम्राट | वि.वा.शिरवाडकर | ****** | ॑॑॑॑॑ |
पंडितराज जगन्नाथ | विद्याधर गोखले | ****** | ॑॑॑॑॑ |
प्रेमा तुझा रंग कसा? | वसंत कानेटकर | ****** | ॑॑॑॑॑ |
संगीत भावबंधन | राम गणेश गडकरी | ****** | ॑॑॑॑॑ |
मराठी पाऊल पडते पुढे (मराठमोळ्या गीत-नृत्यांचा कार्यक्रम) | उदय साटम (दिग्दर्शक) | २७०० | ९-१०-२०१२ |
संगीत मानापमान | कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर | ****** | ॑॑॑॑॑ |
मी जोतीराव फुले बोलतोय | ... ? ... | ६८० (?) | २७-६-२०१२ |
मी नथूराम गोडसे बोलतोय | प्रदीप दळवी | ६०० | ५-२-२०११ |
मोरूची मावशी | आचार्य प्र.के.अत्रे | ****** | ॑॑॑॑॑ |
रमाई | प्रभाकर दुपारे | ५०१ | २१-४-२०११ |
रायगडाला जेव्हां जाग येते | वसंत कानेटकर | २४०१ | ११-११-२०१२ |
लग्नाची बेडी | आचार्य प्र.के.अत्रे | ****** | ॑॑॑॑॑ |
वऱ्हाड निघालंय लंडनला | लक्ष्मण देशपांडे | ****** | ॑॑॑॑॑ |
वस्त्रहरण | गंगाराम गव्हाणकर | ५००० | २१-११-२००९ |
वाहतो दुर्वांची ही जुडी | बाळ कोल्हटकर | >१००० | ..?.. |
विच्छा माझी पुरी करा | वसंत सबनीस | ****** | ॑॑॑॑॑ |
संगीत शाकुंतल | अण्णासाहेब किर्लोस्कर | ****** | ॑॑॑॑॑ |
संगीत शारदा | गोविंद बल्लाळ देवल | ****** | ॑॑॑॑॑ |
सबकुछ मधुसूदन (इ.स. १९६३पासून सुरू असलेला एकपात्री मनोरंजक कार्यक्रम) | डॉ.मधुसूदन घाणेकर | १२००० | ९-१-२०१२ |
संगीत संशयकल्लोळ | गोविंद बल्लाळ देवल | ****** | ॑॑॑॑॑ |
सासूबाईंचं असंच असतं | आचार्य प्र.के.अत्रे | ****** | ॑॑॑॑॑ |
संगीत सौभद्र | अण्णासाहेब किर्लोस्कर | ****** | ॑॑॑॑॑ |
संगीत स्वयंवर | कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर | ****** | ॑॑॑॑॑ |
नाटकाचे प्रकार | |||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
अ | |||||||||||||||||||||
आ | |||||||||||||||||||||
ए | |||||||||||||||||||||
ऐ | |||||||||||||||||||||
क | |||||||||||||||||||||
ग | · गद्यनाटक · ग्रामीण नाटक | ||||||||||||||||||||
च | |||||||||||||||||||||
ज | |||||||||||||||||||||
त | · तमाशा | ||||||||||||||||||||
|