विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/नेहमीचे प्रश्न
Appearance
प्रकल्प
- मुख्य प्रकल्प पान
- सहभागी सदस्य
- तुम्ही भाषांतर कसे करता ?
- तुम्ही चपखल मराठी शब्द कसे शोधता?
- सूचना फलक
- प्रकल्प चर्चा
- भाषांतर सहाय्य पाने
- नित्योपयोगी भाषांतर
- नेहमीचे प्रश्न
- भाषांतर विशेष मदतकेंद्र
- आयात आणि भाषांतर
- निर्यात आणि भाषांतर
- आंतरविकि दुवे
- वर्गीकरण
- भाषांतर वर्गीकरण/लेख प्रकल्पाधिन
- प्राथमिकता असलेली कामे
- हवे असलेले साचे
- संबंधित विकिसंज्ञा
- वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- प्रकल्प वृत्त
- प्रश्नमंजुषा
- नवी आवृत्ती
- भाषांतर कसे करावे
- अडचणी
- स्वॉट
- विकिमिडिया इंडिया
- याहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki
साधने (संपादन)
कार्यगट (संपादन)
विभाग (संपादन)
मध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)
मध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)
मध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)
सहप्रकल्प (संपादन)
मदत हवी आहे !
[संपादन]- माझी शंका
मी मराठी माध्यमातून अभ्यास करणारे विद्यार्थी अथवा केवळ मराठी लिहिता वाचता येणार्यां साठी इंग्रजी भाषेत उपल्ब्ध पानांचे अनुवाद करू इच्छितो.
- माझे प्रश्न
- समजा एखादे इंग्रजी पान मला अनुवादित करायचे असेल तर त्यासाठी पायरीगणिक (step-by-step) माहिती कुठे मिळेल? उत्तरे समधानकारक आहेत
- मला कोणते पान अनुवादित करायचे हे निवडण्याची मला मुभा आहे काय? (उत्तर होय मूभा आहे सविस्तर उत्तर खाली पहावे) उत्तरे समधानकारक आहेत
- मी अर्धवट अनुवादित केलेलं पान साठवून कसे ठेवायचचे / नंतर त्याला प्रसिद्ध कसे करावे? (सविस्तर उत्तर खाली पहावे) उत्तरे समधानकारक आहेत
- धन्यवाद!
- माझे सदस्य नाव/टोपण नाव:
- Newkelkar १६:०६, १३ डिसेंबर २००९ (UTC)~~
विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प
[संपादन]- आपण विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प पाहिला आहेत काय , त्यात कदाचित अधिक माहिती उपलब्ध आहे असे आढळेल; पायरी गणिकसुद्धा माहिती आंतर्भूत करावयास आवडेल पण पायरी गणिक मध्येसुद्धा काय अभिप्रेत आहे याची कल्पना दिलीत तर बरे होईल.मी येथे थोडासा प्रय्त्न करतो काही शंका राहिल्यास जरूर विचाराव्यात.
- स्वतःच्या सदस्यपानावर इंग्रजीते मराठी भाषांतरात रूची असल्यासता {{भाषांतरकार|en|mr}} {{भाषांतरकार|sa|mr}} {{भाषांतरकार|sa|mr}} किंवा {{भाषांतरकार|hi|mr}} असे साचे लावू शकाल त्या शिवाय विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/सहभागी सदस्य येथे स्वतःची नोंद केल्यास इअतर भाषांतरकारांशी समन्वय साधणे सोपे जाईल. अर्थात हे बंधन कारक नाही हि पायरी ओलांडून तुम्ही पुढे जाऊ शकता.
- आपल्याला वर्ग:भाषांतर येथे भाषांतरकरून हवे असलेल्या सध्याची यादी उपलब्ध होईल . आपण विकिपीडियात प्रथमच संपादन करणार असल्यास कदाचित अभाषांतरीत लेखनातील एखादा उतारा भाषांतरकरून जतन केल्यास इतरांनाही सहयोग मिळेल तसेच विकिपीडीया लेखन शैलीचा अंदाजा येईल अर्थात असे करणे बंधन कारक नाही आपण ही पायरी ओलांडून सरल पुढील पायरीवर जावू शकता.
- आपल्याला इंग्रजी हिन्दी इत्यादी इतर विकिपीडियातून भाषांतर आणावयाचे झाल्यास:- सविस्तर उत्तर खालील स्वतंत्र विभागात पहावे.
- आपल्याला विकिपीडियेतर स्त्रोतातील लेखाचे भाषांतर करावयाचे झाल्यास प्रथमतः स्वतःला खालील प्रशन विचारा -
- हे माझे स्वतःचे इतर भाषी लेखन आहे त्याचे प्रताधिकार माझ्याकडे आहेत आणि ते मराठी भाषेत आणावयाचे आहे
- ते मुळाबरहुकूम जसेच्या तसे मराठीत आणावयाचे असल्यास आणि इतरांनी त्यात बदल कमीत कमी करून हवे असल्यास ते शक्यतो b:विकिबुक्स या सहप्रकल्पात न्या व तेथे वर्गःविकिस्रोत असे वर्गीकरण करा आणि आपण हे लेखन प्रताधिकार मुक्त करत असल्याचे चर्चा पानावर लिहून आपले नाव व परिचय नमूद करा.
- ते मुळाबरहुकूम जसेच्या तसे ठेवणे गरजेचे नसून ते विकिपीडियाच्या विश्वकोशिय लेखन शैलीत आणून इतरांनीसुद्धा त्या लेखनात, भाषांतरात आणि संपादनात सहयोग करावा असे अपेक्षीत असल्यास ते लेखन आपण मराठी विकिपीडियावर भाषांतरीत किंवा लिहू शकता. अधिक माहिती विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा येथे पहावी.
- विकिपीडियावर लिहिताना लेखाचे शिर्षक मराठी भाषेतच असावे असा संकेत आहे.आधिक माहिती विकिपीडिया लेखन संकेत येथे पहावी.
- स्वतःचे नसलेल्या लेखनाचे मराठीत नुवादीत करावयाचे आधी प्रताधिकार मुक्ती प्रकल्प येथे अधिक माहिती घ्यावी
- हे माझे स्वतःचे इतर भाषी लेखन आहे त्याचे प्रताधिकार माझ्याकडे आहेत आणि ते मराठी भाषेत आणावयाचे आहे
- तुम्हाला भाषांतरास अधिक कलावधी लागणार असल्यास किंवा लेख ४ परिच्छेदापेक्षा मोठा असल्यास; लेखाचे शिर्षक निवडल्या नंतर तापुरत्या स्वरूपात लेख लेखाचेनाव/धूळपाटी असे साठवू शकता अथवा तात्पूरत्या कालावधीत इतरांची दखल कमी हवी असल्यास सवतःचे सदस्यनाव सदस्य:स्वतःचे सदस्य नाव/धूळपाटी येथेसुद्धा लेखन जतनकरू शकता. तसेच कमी परिच्छेदांचे काम असल्यास विकिपीडिया:धूळपाटी चा उपयोग करण्याचाही विचार करता येईल.
- बर्याचदा तुम्ही ज्या विषयावर लेखन करणार आहात त्या विषयाबद्दल एखादा लेखन समन्वय प्रकल्प असण्याची शक्यता असते. लेखन समन्वय प्रकल्पात वेळ वाचण्याच्या दृष्टीने (बंधन कारक नसलेले) लेख आराखडे उपलब्ध असणे संभवते
- ज्या नवीन लेखपानावर भाषांतर सुरूकरत आहात त्या लेखात {{भाषांतर}} किंवा {{अनुवाद}} साचा लावावा म्हणजे भाषांतर पानात सहयोग हवा आहे हे इतर सदस्यांनाही समजते तसेच भाषांतरअत सहयोग असलेल्या वर्गीकरणात लेखाची नोंदही होते.
- लेखाच्या तळाशी {{पर्याय:लेखात प्रयूक्त संज्ञा}} साचा लावण्या बद्दल विचार करावा त्यामुळे लेखात इंग्रजी शब्दा करिता मराठीत कोणता शब्द वापरला आहे याची यादी उपलब्ध करता येते तसेच लेखात एखादा मराठी शब्द विशीष्ट अर्थछटेने योजल्यास अशा शब्दापुढे {{विशीष्ट अर्थ पहा}} साचा लावण्याचा विचार करावा आणि अर्थछटा शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा असा वेगळा विभाग लेख तळात {{पर्याय:लेखात प्रयूक्त संज्ञा}} ने तयार झालेला असेल् तेथे नमुद करावे.
- शक्यतोवर लेखाचा पहिला परिच्छेद आणि ==चिन्हात दिलेली विभाग/परिच्छेद नावे== प्राधान्याने मराठीत आणिवी म्हणजे सहयोग देणार्या इतर सदस्यांना अधिक उत्साह येऊ शकतो.
- भाषा लेखना बद्दल सांगावयाचे झाल्यास प्रथम भाषांतर आणि लेखन करा आणि नंतर विकिपीडिया:लेखनभाषा संकेत ला अनुसरून काही बदल करावयाचे झाल्यास पहावे. तेथे लेखन संकेताबद्दल चर्चासुद्धा करू शकता.
- पर्यायी मराठी शब्दांची गरज असल्यास {{मराठी शब्द सुचवा}} साचा लावावा तो [मराठी शब्द सुचवा] असा दिसेल किंवा ऑनलाईन शब्दकोश यादी च्या सहाय्याने इंटरनेटवर आपण इंग्रजी मराठी शब्दांचा शोध घेऊ शकता. नवीन मराठी शब्द कसे बनवावेत याब्द्दल तुम्ही चपलख मराठी शब्द कसे शोधता? येथे काही सहाय्य उपलब्ध आहे.
- विकिपीडियात नेहमी लागणारा शब्द,पद आणि वाक्य संचय वापरा आणि त्यात भर घाला.
- मराठी भाषेकरिता मशिनी भाषांतरणाची सोय अद्याप नसली तरीसुद्धा त्या बद्दल अधिक माहिती मशिन ट्रान्सलेशन येथे उपलब्ध आहे.
- आणि आपण भाषांतर कसे करता याचे अनुभव इतरांना उपयोग व्हावा म्हणून अनुभव येथे आवर्जून नोंदवा.
- नेहमीचे प्रश्न
- मी ऑफलाईन भाषांतरकरून येथे आनू शकतो काय ?
- ऑफलाईन पेक्षा विकिपीडियावरच ऑनमलाईन भाषांतर करणे जमल्यास लेखाच्या इतिहासातून मशिन ट्रान्सलेशन क्षेत्रात काम करणार्या तज्ज्ञांना याचा उपयोग संभाव्य आहे याची नोंद घ्यावी
- मला कोणते पान अनुवादित करायचे हे निवडण्याची मला मुभा आहे काय?
- जरूर आहे. फक्त तो मजकूर व विषय वैश्वकोशीय स्वरूपाचा (एन्सायक्लोपेडिक स्वरूपाचा) असावा अशी अपेक्षा आहे.
- मी ऑफलाईन भाषांतरकरून येथे आनू शकतो काय ?
माहितगार ०८:१२, १४ डिसेंबर २००९ (UTC)
उ. मदत हवी आहे !
[संपादन]- #समजा एखादे इंग्रजी पान मला अनुवादित करायचे असेल तर त्यासाठी पायरीगणिक (step-by-step) माहिती कुठे मिळेल?
- इंग्रजीतून किंवा इतर भाषांतून मराठीत एखादा लेख अनुवादताना काय पद्धत अवलंबावी याबद्दल माहिती देणारे सहाय्यपान सध्यातरी उपलब्ध नाही. परंतु, खाली नोंदवलेले, अनुवादताना उपयुक्त पडतील असे मुद्दे आपल्याला सुचवू इच्छितो :
- इंग्लिश / परभाषेतील विकिपीडियावरील अनुवाद करण्याजोग्या लेखाच्या पानावर डावीकडच्या आंतरविकी दुव्यांमध्ये मराठी विकिपीडियावरील समांतर लेखाचा दुवा असल्यास शोधणे. असा दुवा मिळाल्यास, आपल्याला मराठीत आणावयाच्या लेखाचे पान अगोदरच बनवले गेले असेल. मराठी विकिपीडियावरील त्या संबंधित लेखामध्ये आवश्यक त्या मजकुराचा अनुवाद करून तो लेख विस्तारायला आपण मदत करू शकता.
- इंग्लिश / परभाषेतील लेखाच्या पानावर डावीकडच्या आंतरविकी दुव्यांमध्ये मराठी लेखाचा दुवा नसेल, तर मराठी विकिपीडियावर समानार्थी शीर्षकाचा शोध (शोधपेटी वापरून) घ्यावा. तरीही संबंधित शीर्षक न सापडल्यास त्या शीर्षकाचा नवीन लेख बनवावा आणि परभअषेतील मजकूर अनुवादण्याचे काम आरंभावे.
- छोट्या - छोट्या परिच्छेदांचा अनुवाद जोडत मराठी लेखात भर घालू शकता. किंवा परभाषेतील लेखाचा अख्खा अनुवाद प्रथम ऑफलाइन करून (एखाद्या टेक्स्ट किंवा वर्ड डॉक्युमेंट फायलीत तुमच्या वैयक्तिक संगणकावर साठवून ठेवून), पूर्ण अनुवादांती मराठी लेखाचे पान विकिपीडियावर बनवून त्यात आपला ऑफलाइन अनुवाद कॉपी-पेस्ट करू शकता.
- मला कोणते पान अनुवादित करायचे हे निवडण्याची मला मुभा आहे काय?
- जरूर आहे. फक्त तो मजकूर व विषय वैश्वकोशीय स्वरूपाचा (एन्सायक्लोपेडिक स्वरूपाचा) असावा अशी अपेक्षा आहे.
- मी अर्धवट अनुवादित केलेलं पान साठवून कसे ठेवायचचे / नंतर त्याला प्रसिद्ध कसे करावे?
- अर्धवट अनुवादित केलेलं पान साठवून कसे ठेवायची अशी विशेष सुविधा विकिपीडियावर उपलब्ध नाही. तुम्ही जेवढा अर्धवट अनुवाद लिहिला असेल, तेवढा अंशात्मक स्वरूपात विकिपीडियावरील लेखात साठवू शकता आणि त्यात हळूहळू नव्या परिच्छेदांची भर घालू शकता. किंवा वर सांगितल्याप्रमाणे परभाषेतील लेखाचा अख्खा अनुवाद प्रथम ऑफलाइन करून (एखाद्या टेक्स्ट किंवा वर्ड डॉक्युमेंट फायलीत तुमच्या वैयक्तिक संगणकावर साठवून ठेवून), पूर्ण अनुवादांती मराठी लेखाचे पान विकिपीडियावर बनवून त्यात आपला ऑफलाइन अनुवाद कॉपी-पेस्ट करू शकता.
- मराठी विकिपीडियावर आपण कोणत्याही प्रकारे घेतलेल्या विधायक सहभागाचे स्वागतच आहे. अजून काही शंका असल्यास येथे किंवा चावडीवर विचारू शकता.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) २२:५०, १३ डिसेंबर २००९ (UTC)