पंडितराव दौंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पंडितराव नारायणराव दौंड

आमदार माजी राज्यमंत्री ग्रामीण विकास
कार्यकाळ
इ.स. १९८५ – इ.स. १९९०

जन्म 10/02/1938
राजकीय पक्ष काँग्रेस

पंडितराव दौंड (जन्मदिनांक 10/02/1938 - हयात) हे [भारतीय राजकारणी आहेत. पंडितराव दौंडच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून झाली. त्यावेळी अटीतटीच्या इ.स. १९८५ मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले. रेणापुर मतरसंघात भाजपच्या गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा पराभव करून विजय मिळाला होता.[१]

त्यांना राज्यमंत्रिपद मिळाले. त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र अपेक्षा असतानाही काँग्रेसकडून उमेदवारी नाकारण्यात आली. [२]

विधानसभेच्या रेणापूर मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री पंडितराव दौंड यांनी काँग्रेससोबत फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. [३]

ऊसतोडणी कामगार संघटना व ऊसतोड मजुरांनी २००२ साली संप पुकारला. कारखानदारांची प्रचंड कोंडी केली. ती फोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दादासाहेब रूपवते व पंडितराव दौंड यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. २००९ विधानसभेच्या रेणापूर मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री पंडितराव दौंड यांनी काँग्रेससोबत फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. [४]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "E sakal". Archived from the original on 2011-12-28. २९ ऑगस्ट २०१२ रोजी पाहिले.
  2. ^ "उपेक्षितांचे एकत्रिकरण". २९ ऑगस्ट, इ.स.२००९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  3. ^ "काँग्रेसचे माजी मंत्री पंडितराव दौंड राष्ट्रवादीत!". Archived from the original on 2016-03-11. २९ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "या 'कोयत्यांना' ना धार, ना आधार!". २९ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)