चर्चा:वंजारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

।स्त्रोताचा दुवा : https://sanjaysonawani.blogspot.in/2012/09/blog-post_15.html ।लेखाच्या ह्या 1560954  १४:४३, २९ जानेवारी २०१८‎ Goresm आवृत्तीमध्ये मजकूर नकल-डकव केला गेला. ।स्त्रोताची तारिख व वेळ : September 15, 2012, 11:43 PM

Untitled[संपादन]

।त्यामुळे मजकूर नकल-डकव आहे हे सिध्द होते. WikiSuresh (चर्चा) ०१:२३, १४ एप्रिल २०१८ (IST)

संरक्षित[संपादन]

Gnome-edit-redo.svgTiven2240: कृपया, या लेखाचा सुरक्षित/संरक्षित करा, कारण अनामिक सदस्यांचे अविश्वकोशीय संपादने यावर होत आहेत.--संदेश हिवाळेचर्चा १६:२४, २ मे २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १६:२४, २ मे २०१८ (IST)

वंजारी ही महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील एक जात आहे. महाराष्ट्रात वंजारी समाज भटक्या जमाती-(ड) (NT-D) मधे वर्गीकृत आहे. इसवी सनाच्या १५-१६ व्या शतकात राजस्तान मधून दक्षिणेकडे स्थलांतरित झाले विविध ३० (तीस) क्षत्रिय जाती-जामाती पैकी ही एक जात होय. हा समाज ईशान्य भारत सोडून भारतातील सर्वच राज्यांत कमी जास्त लोकसंख्येत आढळतो.वंजारी जात भारतात सर्वात शुर व रागीट ( agressive) क्षत्रीय जात आहे.

महाराष्ट्र राज्य बाहेरील वंजारी समाजाला तेथिल भाषेतील विविधते मुळे वंजारा,वंजरी संबोधले जाते. वंजारी समाज हा महाराष्ट्र राज्य सोबत जवळ जवळ संपूर्ण भारतात आढळतो वंजारी समाजाची उत्पत्ती ही रेणुका देवीच्या सन्तानींपासून झाली असे मानल्या जाते. रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी यांना पाच पुत्र होते, ते अनुक्रमे: वशूमंत, वस्तू, सूशौन, विश्ववस्तू व परशूराम हे होत. वशुमंतापासून कमण्डूक ऋषींना अनुक्रमे रघुपती, अधिपती, कानुपती आणि सुभानुपती हे पुत्र झाले. यातील रघुपती पासून १) रावजीन, अधिपती पासून २) लाडजीन, कानिपती पासून ३) मथुरजन आणि सुभानुपती पासून ४) भूसार्जीन अशा क्रमवार चार शाखांची उत्पत्ती झाली. आज या चारही शाखा एक आहे व वंजारी म्हणून परिचित आहे.

परंपरागत पूर्वीचा व्यवसाय;

राजस्तान मध्ये वंजारी समाज हा महाराणा प्रतापसिंघ यांच्या सैन्यात प्रधान सेनापती म्हणून कार्यरत होता. श्री भल्लसिंघ वंजारी व श्री फत्तेसिंघ वंजारी हे महाराणा प्रतापसिंघ चे प्रधान सेनापती होते. त्यांच्या समाधी आजही उदयपूर राजस्तान मध्ये आहे.राजस्थानात असतांना हा समाज कडवा लढवय्या क्षत्रिय म्हणून ओळखला जात होता. आजही राजस्थानात हा समाज मोठ्या प्रमाणात आढळून येतो. यवन आक्रमणांमुळे त्रस्त होऊन दक्षिणे कडे स्थलांतरित झाला. आणि व्यापार उदीम करू लागला. दळणवळण साधनांचा शोध लागण्यापूर्वी पुरातन काळापासून मालवाहतुक/मालपुरवठा करण्याचे काम वंजारी समाज करत असे. महाराष्ट्रात आल्यावर शिवाजी महाराजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात वंजारी होते.

पूर्वीच्या काळी वंजारी समाज मालवाहतूकीसह व्यापारही करत असे.

वंशज:

वंजारी हे वीर असुन ते महाराणा प्रताप यांच्या सैनिक होते. महाराणा प्रताप यांचे सैनापती मल्ला हे जातीचे वंजारी होते. आजची स्थिती आज महाराष्ट्रातील मुठभर गर्भश्रीमंत लोक सरकारी अधिकारी कर्मचारी व्यावसायिक सोडले तर वंजारी समाजाची अवस्था अवांच्छित समाजघटक अशी बनली आहे.

त्याच भागांत वंजाऱ्यांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणावर आहे.

चार पोटजातीत विभागलेला हा वंजारी समाज संत अवजीनाथ, संत भगवान बाबा, संत वामानभाऊ याना आपले दैवत मानतो.

व्यक्तिमत्त्वे:

धर्माजी प्रताप मुंडे भानुदासराव केंद्रे तात्याराव लहाने भास्करराव आव्हाड विश्‍वनाथ कराड हर्षवर्धन नव्हाते मा आ केशवदादा आंधळे संजय बांगर कैलास दौंड मच्छिंद्र चाटे विरधवल खाडे नाट्यकर्मी प्रभाकर लहामगे वामन केंद्रे तुकाराम खेडकर, सम्राट कांगने रघुवीर खेडकर (लोकनाट्य तमाशा मंडळ अध्यक्ष), हरिभाऊ बडे-नगरकर

वंजारी समाजाचा इतिहास:

वंजारी ही महाराष्ट्रातील हिन्दू धर्मातील एक जात आहे. सुमारे चारशे वर्षापुर्वी या समाजाने राजस्थानातुन येथे स्थलांतर केले. हा समाज मुख्यतः महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक गुजरात मध्यप्रदेश उत्तरप्रदेश छातीस्गड राजस्तान हरियाना पंजाब जम्मू काश्मीर व गोवा या भागांत कमी जास्त लोक्संखेने पसरलेल्या या जातीतील लोक प्रमुख ४ पोट जातीत विभागल्या मुळे एकता नसलेला पण भारतातील एक प्रमुख क्षत्रिय भटका समाज.

भारतात विविध राजांत सर्व समाजांसोबत मिळून मिसळून राहणारा शेतकरी पशुपालक समाज उपेक्षित राहिल्याने प्रगती थाबलेला समाज जाती व्यवस्थेचे चटके इतर क्षत्रिय समाजापेक्षा सर्वात जास्त सोसलेला समाज. या कारणाने आरक्षण मिळण्याने आज उभारत असेलेला समाज पण इतर क्षत्रिय समाजाकडून क्षत्रिय असूनही मान न मिळालेला समाज 
वंजारी समाजाचा त्यागाचा शौर्य पराक्रमाचा इतिहास आहे वंजारी समाज हा क्षत्रिय वंश असेलेला पण देशोदेशी भटकंती करणारा बलशाली व कडवट लढाऊ गट आहे .महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा औरंगजेब भेटी वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वताच्या सोबत निवडक लोकांमध्ये वंजारी लोक निवडण्याचे कारणही हेच कि वंजारी समाज हा क्षत्रिय बलशाली व कडवट लढाऊ बाण्याचा आहे .तसेच राष्ट्रमाता जिजाऊ मां साहेबांच्या माहेरगावी शिंदखेड राजा परिसरातील हजारो वंजारी तरुण मावळे शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी होते . तसेच राजस्तानात महाराणा प्रताप जेव्हा दिलीच्या पातशहा सोबत एकाकी लढत होते तेव्हाही हाच वंजारी समाज तेथे आपले शौर्य पराक्रमाचा इतिहास उभारत होता कारण महाराणा प्रताप यांचे प्रमुख सरदार मल्ला व फत्ता वंजारी हे निष्ठेने लढत होते त्यांच्या समाध्या उदयपुर किल्ल्यात आजही उभ्या आहेत. वंजारी हा क्षत्रिय वंश असेलेला महाराणी दुर्गावती १० लाख बैल वापरून संपूर्ण भारतात विविध राजांना युद्धात दारुगोळा शात्स्त्रात व मीठ मसाला आनाधान्न्य पुरवठा करत आसे. क्षत्रिय वंश असेलेला पण देशोदेशी भटकंती करणारा वंजारी समाज हा तत्कालीन समाज धुरिणांनी भटका या बिरुदाने बाजूला टाकला व काळाच्या ओघात आपली मूळ ओळख विसरून एक उपेक्षित समाज म्हणून पुढे चालत गेला. आणि आजही उपेक्षित राहिला आहे 
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शोध लागण्यापुर्वी पुरातन काळापासुन ही मालवाहतुक/मालपुरवठा करणारा एक मोठा समाज होता ज्याला आपण महाराष्ट्रात वंजारी म्हणतो. फिरता व्यापार करणारे म्हणजे वण-चारी...याचेच रुपांतर "वंजारी" या शब्दात झाले असे एक मत इतिहासात डोकावुन पाहता दिसते. या आद्य मालवाहतुकदारांचा...मालपुरवठादारांचा इतिहास पुरातन तर आहेच पण मानवी जीवनाला तेवढाच उपकारक ठरलेला आहे.
पुरातन काळी भारतात अरण्ये खुप होती. बैलगाड्या जावू शकतील असे फार रस्तेही नव्हते. भारत हा एक खंडप्राय देश. भुगोलही विचित्र. प्रचंड पर्वतरांगा. अलंघ्य नद्यांची रेलचेल. क्वचितच रहदारी करता येतील असे नाणेघाटासारखे घाट...पण ते बैलगाड्यांना अनुपयुक्त. बरे एका राज्यातील माल दुस-या राज्यांतील नागरिकांच्या गरजांसाठी/व्यापा-यांसाठी वाहतुक यंत्रणेची गरज तर होतीच. सिंधु संस्क्रुतीच्या कालापासुनच भारतात नैसर्गिक ते कृत्रीम बंदरे बनु लागली होती. या बंदरांतुन विदेशात माल निर्यात केला जायचा तसाच आयातही केला जायचा. हा बंदरांपर्यंत पोहोचवणे ते आयात माल देशात इच्छित स्थळी पोहोचवण्याची सुविधा नसती तर या आयात-निर्यातीचे काम अशक्यप्राय असेच होते.
 हे तत्कालीन सुविधांचा पुरेपुर अभाव पाहता विविध समाजघटकांतील ही गरज पुरी करायला पुढे आले. बैलगाड्यांचा उपयोग नसल्याने बैलांचा मोठ्या प्रमाणावर मालवाहतुकीसाठी वापर करायला सुरुवात केली. कापडांचे तागे, धान्य, मीठ, मसाले सैन्यासाठी दारुगोळा असे पदार्थ बैलांवर शिस्तशीर लादुन ते वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवले जावू लागले. तिकडुन तेथील माल लादुन आनला जावू लागला. त्याचबरोबर हे वंजारी स्वत: व्यापारही करत.
 आजचे घाट, रस्ते हे मुळच्या वंजारी मार्गांवरच बनले आहेत. या मार्गांवरुन एकेक वंजारी कुटुंब शेकडो बैलांचे तांडे घेवून देशभर मालवाहतुक करत असत. वाटेत चोर-दरोडेखोरांच्या धाडी पडण्याच्या घटना नित्य असल्याने प्रतिकारासाठी मूळचाच क्षत्रिय लढवैय्या वंजारी समाज सज्ज होता. मुळ व्यवसायच भटक्या स्वरुपाचा असल्याने आणि विविध जाती-जमातींशी, अगदी परकिय व्यापा-यांशीही नित्य संपर्ज येत असे.

✳वंजारी जातकुळी आणि वंशावळी✳ ⬅वंजारी समाज 4 विभागात विभागलेला आहे➡ ✅लाडजीन ✅रावजीन ✅मथूराजीन ✅भूसारजीन 🌞लाडजीन वंजारी बाबत🌞

१) कुळी - गंभीरराव (शिर्के), वेद - ऋग्वेद , गोत्र - शौनक

   उपनावे -  उमाळे, कताले, कावळे, काळटोपे, कुकडे, कोराळे, खरमाटे, खिल्लारे, गवते, गोमासे,   गोपाळकर, गंदीले, गंदास-गंधास, चराटे, चाबुकस्वार, चेवले, जरे, डमाळे, डुकरे, ढोले (डोहले), ताडगे, तांबडे, दराडे, नाईकवाडे, नवाळे, नाकाडे, नागरगोजे, नागरे -नांगरे, नेहरकर, पाखटे, पालवे, पोटे, फटकळ, फुंदे, फडे, वहांगे, भांगे, बारगजे, बिकट, बिनावडे (बिनवडे), बरके, बैळगे-बेळगे, बोंद्रे, लादे, लामण, लांडगे, लैंडखैरे, वारे, शेकडे, शेळके, शेरेकर, सारूक-सारुके, सळटे, सोसे, सांगळे, हांगे.     

कुळी - प्रतापराव (मुंढावच्छाव) धामपाळ, वेद - यजुर्वेद, गोत्र - अत्री उपनावे - आरबुज, कतने, कताने, कतखडे, कतारे, खडवगाळे, खेडकर, खोजेपीर, खोकले, खंदारे, गर्जे, गंदवे, गोलार, गवते, घरजाळे, घोडके, चवरे, चेपटे, ठुले, डोंबरे, ढगार, तोगे, दगडखैर, दहिफळे, धज, धुपारे, नेहाळे, पटाईत, पाळवदे, बरवडे, बडे - बढे, वदने, वालटे, वरवडे, वागादि, वमाळे, बोकारे, भटाने, भाताने, मुंडे - मुंढे, मानकर, मिसाळ, मोरुळे - मोराळे, लकडे, लव्हारे, होळंबे, वमळे (वमाळे), विघ्ने, सोशे, साठे, शिरसाठ, सोनपीर, सातभाये.

कुळी - चंद्रराव ( मोरे - मौर्य ), वेद - यजुर्वेद , गोत्र - गौतम - ब्रम्ह उपनावे - इगारे, इधारे, उंबरे, काकड, लहाने (लहाणे), सानप.

कुळी - गरुडराव, वेद - ऋग्वेद , गोत्र - कश्यप उपनावे - आंधळे, कांगणे, कुसपटे, केंबरे, केंद्रे, गोंगाणे, घोळवे, चौदार, जाधवर, जायफळ, तांदळे, दूधवरपे, भंडकर, मैंद.

कुळी - पवारराव, वेद - यजुर्वेद , गोत्र - भारद्वाज शुक उपनावे - आंबले, आंबाले (आंबाळे), उगले, उगलमुगले, उजाडमुळ्गे, कडपे, चिपाटे, बोडके, बारगळ, मुसळे, पवार, पंडित, लटपटे, वनवे, विंचू.

कुळी - जगतापराव (जगताप), वेद - यजुर्वेद , गोत्र - कश्यप उपनावे - कांदे, कुटे, गंगावणे, दोंड - दौंड, धात्रक, धायतिडीक, मुरकुटे, राख, हेकरे.

कुळी - भालेराव (यादव), वेद- यजुर्वेद, गोत्र - पराशर / कौडिण्य उपनावे - खाडे, चौले, डोंगरे, बांगर.

कुळी - प्रचंडराव (जाधव), वेद- यजुर्वेद, गोत्र - कश्यप / विश्वामित्र उपनावे - आव्हाड, इंदूरकर, काळे, काळकाटे, जायभावे, डोंबाळे, डोमाळे, दापुरकर, बोंदर, शिंत्रे, हाडपे.

कुळी - भगवंतराव, वेद- ऋग्वेद, गोत्र - जमदग्नी उपनावे - काळवझे, ताटे, फड(सौंदनकर), मगर.

कुळी - बळवंतराव, वेद- ऋग्वेद, गोत्र - कश्यप उपनावे - इपर - ईप्पर, चकोर, दरगुडे - दरगोडे, लाटे, सगळे, हेंबाडे.

कुळी - तवरराव (तोवर), वेद- यजुर्वेद, गोत्र - गार्गायण उपनावे - केकाण - केकाणे, थोरवे, भाबड, भोके, मानवते.

कुळी - अंकुशराव, वेद- ऋग्वेद, गोत्र - कश्यप उपनावे - गरकळ, टाकळस, डोईफोडे, डोळे, वरशीड, मरकड.

कुळी - सुखसराव, वेद- ऋग्वेद, गोत्र - कश्यप उपनावे - कराड (कराडे), कातकाडे, खपले, खांडेकर, खांडवेकर, गुटे, गंडाळ, चकणे, पानसरे, बुरकुल - बुरकुले, भाळवे - माळवे, साबळे, सोनावणे, हुळळे, निमोनकर.

कुळी - पतंगराव, वेद- ऋग्वेद, गोत्र - कश्यप उपनावे - आघाव, दिघोळे - डिघोळे, गुजर, शेवगावकर.

कुळी - पंचमुखराव, वेद- यजुर्वेद, गोत्र - कपील उपनावे - कथार, कापसे, कीर्तने, जवेर - जवरे, दोदले, डोळसे, ढाकणे, बोदले, लोखंडे, वाघ.

कुळी - हैबतराव (लाड), वेद- ऋग्वेद, गोत्र - कश्यप उपनावे - केदार,गामणे - गाभणे, गोरे, सिताफळकर.

कुळी - मानकरराव, वेद- ऋग्वेद, गोत्र - वसिष्ठ / कौशिक उपनावे - चाटे, वायमासे, पायमासे - पायभासे, पवासे - पंबासे.

कुळी - यशवंतराव (गायकवाड), वेद- ऋग्वेद, गोत्र - कश्यप उपनावे - गायकवाड, घुगे, तारे, देवरंगे, गोगे.

कुळी - देवराय , वेद- ऋग्वेद, गोत्र - वसिष्ठ / कपील उपनावे - इलग - विलग, घुले, वडगे, झडग.

कुळी - सुलतानराव (चव्हाण), वेद- ऋग्वेद, गोत्र - कश्यप / पुलस्थ उपनावे - काकडे, काळे, गिते, बुदवंत - बुधवंत, शेष, कापडी, कापडे, शेपाक, कळी - काळी.

कुळी - तोंडे, वेद- ऋग्वेद, गोत्र - कश्यप / मकन उपनावे - तोंडे.

कुळी - तिडके, वेद- ऋग्वेद, गोत्र - कश्यप / दुर्वास उपनावे - तिडके.

कुळी - लाड, वेद- ऋग्वेद, गोत्रज - कश्यप / मांडव्य उपनावे - लाड.

कुळी - वेद- ऋग्वेद, गोत्र - कश्यप उपनावे - हुळळे, हुळहुळे, लंग, जमाडे, नवाळे, पवार, हुशे

वंजारी समाजाचा इतिहास

आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शोध लागण्यापुर्वी पुरातन काळापासुन ही मालवाहतुक/मालपुरवठा करणारा एक मोठा समाज होता ज्याला आपण महाराष्ट्रात वंजारी म्हणतो. फिरता व्यापार करणारे म्हणजे वण-चारी...याचेच रुपांतर "वंजारी" या शब्दात झाले असे इतिहासात डोकावुन पाहता दिसते. या आद्य मालवाहतुकदारांचा...मालपुरवठादारांचा इतिहास पुरातन तर आहेच पण मानवी जीवनाला तेवढाच उपकारक ठरलेला आहे.

पुरातन काळी भारतात अरण्ये खुप होती. बैलगाड्या जावू शकतील असे फार रस्तेही नव्हते. भारत हा एक खंडप्राय देश. भुगोलही विचित्र. प्रचंड पर्वतरांगा. अलंघ्य नद्यांची रेलचेल. क्वचितच रहदारी करता येतील असे नाणेघाटासारखे घाट...पण ते बैलगाड्यांना अनुपयुक्त. बरे एका राज्यातील माल दुस-या राज्यांतील नागरिकांच्या गरजांसाठी/व्यापा-यांसाठी वाहतुक यंत्रणेची गरज तर होतीच. सिंधु संस्क्रुतीच्या कालापासुनच भारतात नैसर्गिक ते कृत्रीम बंदरे बनु लागली होती. या बंदरांतुन विदेशात माल निर्यात केला जायचा तसाच आयातही केला जायचा. हा बंदरांपर्यंत पोहोचवणे ते आयात माल देशात इच्छित स्थळी पोहोचवण्याची सुविधा नसती तर या आयात-निर्यातीचे काम अशक्यप्राय असेच होते.

हे तत्कालीन सुविधांचा पुरेपुर अभाव पाहता विविध समाजघटकांतील ही गरज पुरी करायला पुढे आले. बैलगाड्यांचा उपयोग नसल्याने बैलांचा मोठ्या प्रमाणावर मालवाहतुकीसाठी वापर करायला सुरुवात केली. कापडांचे तागे, धान्य, मीठ, मसाले असे पदार्थ बैलांवर शिस्तशीर लादुन ते वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवले जावू लागले. तिकडुन तेथील माल लादुन आनला जावू लागला. त्याचबरोबर हे वंजारी स्वत: व्यापारही करत.

मालवाहतुकीसाठी बैलांची गरज असल्याने हा समाज पशुंच्या पैदाशीतही अग्रेसर राहिला.

कोकणातुन व गुजरातेतील क्च्छमधुन मीठ आणत देशभर वितरण करणारा एक स्पेशालिस्ट वर्गही यातुनच निर्माण झाला. मीठाची गरज सर्वत्र. आगरी समाजाकडुन ते उचलायचे आणि देशभर विकायचे. त्या काळात मीठाची किंमत मोठी होती. लवण (मीठ) वाहतुक करणारे ते "लमान" (लभान) हा पोटभेद त्यातुनच निर्माण झाला.

आजचे घाट, रस्ते हे मुळच्या वंजारी मार्गांवरच बनले आहेत. या मार्गांवरुन एकेक वंजारी कुटुंब शेकडो बैलांचे तांडे घेवून देशभर मालवाहतुक करत असत. वाटेत चोर-दरोडेखोरांच्या धाडी पडण्याच्या घटना नित्य असल्याने प्रतिकारासाठी आपसुक वंजारी समाज लढवैय्याही बनलेला होता. मुळ व्यवसायच भटक्या स्वरुपाचा असल्याने आणि विविध जाती-जमातींशी, अगदी परकिय व्यापा-यांशीही नित्य संपर्ज येत असल्याने वंजा-यांची एक स्वतंत्र व वैशिष्ट्यपुर्ण संस्कृतीही बनत गेली. इतर कोणत्याही समाजापासुन वेगळे पडल्याने एक स्वतंत्र मानसिकता...भटकेपणाची नैसर्गिक उर्मी यातुन त्यांचे स्वत:चे संगीत...काव्यही उमलत गेले. भाषाही वेगळी बनत गेली. हे सारे नैसर्गिक व स्वाभाविक असेच होते. वंजारी-लमाणांच्या तांड्यांचे आकर्षण तत्कालीन कवी/नाटककारांमद्धेही होते. दंडीने त्याच्या दशकुमारचरितात तांड्यांच्या एका थांब्याचे व रात्रीच्या त्यांच्या आनंदी गीतांचे/नृत्यांचे अत्यंत सुंदर वर्णन करुन ठेवले आहे.

वंजारी समाजाचे कार्य फक्त नागरी व व्यापा-यांसाठीचा मालपुरवठा करणे येथेच संपत नाही. या समाजाचे राजव्यवस्थांसाठीचे सर्वात मोठे योगदान म्हणजे युद्धकाळात सैन्यासाठी अन्नधान्याचा पुरवठा करणे. हे काम वंजारी समाज पुरातन कालापासुन करत आला असला तरी तत्कालीन युद्धे नजीकच्याच सीमावर्ती राजांशीच शक्यतो होत असल्याने सैन्यासाठीच्या अन्नधान्य वाहतुकीची व्याप्ती कमी होती. पण पुढे युद्धांचा परिसर विस्तारत गेला. मध्ययुगात इस्लामी सत्ता आल्यानंतर सतत युद्धायमान परिस्थित्या जशा बनत गेल्या तसतसे या क्षेत्रातील वंजारी/लमानांचे योगदान वाढत गेले. महिनोनमहिने सैन्याचे तळ एकेका ठिकाणी पडत. सैन्य असो कि बाजारबुणगे, शाश्वत अन्नधान्य पुरवठ्याशिवाय जगणे शक्य नव्हते. सैन्य पोटावर चालते हे म्हणतात ते खोटे नाही. वाटेतला मुक्काम असो कि युद्धभुमीवरील, वंजारी/लमाणांचे तांडे अन्नधान्य पुरवठा अव्याहतपणे करत असत. हा समाज कोणत्या अशा विशिष्ट बाजुसाठीच पुरवठा करत नसल्याने, तटस्थ असल्याने वंजा-यांवर कोणताही पक्ष बळजबरी करत नसे वा हल्ले करुन त्यांची लुटमारही करत नसे याचे कारंण म्हणजे त्यांच्या अस्तित्वाखेरीज युद्धे लढता येणे अशक्य आहे याची जाणीव सर्वांनाच असे. सैन्याला अन्नधान्य पुरवठा करण्याचे काम अगदी ब्रिटिशकाळापर्यंत चालु होते. चेउल येथील बंदरात हजारो बैलांचे वंजारी तांडे येत असत, याची नोंद कोलाबा ग्यझेटियरने केलेली आहे. अनेक वंजारी/चारण/लमानांना मोगलांनी वतने दिली असल्याच्याही नोंदी मिळतात.

थोडक्यात अठराव्या शतकापर्यंत मालवाहतुक, फिरता व्यापार यात वंजारी समाजाचे प्राबल्य होते. परंतु ब्रिटिशकाळात रस्ते बनु लागले. औद्योगिक क्रांतीमुळे वाहतुकीची आधुनिक साधने आली व वाहतुकीचा वेगही वाढला. रेल्वेने तर पुरती क्रांतीच घडवली. बैलांच्या पाठीवर सामान लादुन भ्रमंती करनारा वंजारी/लमाण समाज दूर फेकला जावू लागला. त्याची गरजच संपुष्टात आली. चार-पाच हजार वर्ष अव्याहतपणे भटकत राहुन व्यवसाय करणा-यांचे पेकाट मोडले नसते तरच नवल! हा सर्वच समाज यामुळे एका विचित्र वळनावर आला. स्थिर होणे भाग पडले. ही सक्तीची स्थिरता होती. काही शेतीकडे वळाले, तर काही मोलमजुरीकडे.

अनेक वंशातुन निर्माण झालेला समाज

संपूर्ण भारतात विखुरलेली, परंतु काही राज्यांत अनुसूचित जमात व काही राज्यांत अनुसूचीबाहेर असलेली ही एके काळची भटकी जमात. यांची वस्ती प्रामुख्याने राजस्थान, आंध्रप्रदेश, ओरिसा, कर्नाटक, तमिळनाडू, पंजाब व बिहार , मध्य प्रदेश, महाराष्ट्र व हरयाणा या राज्यांत आढळते. बंजारा जमातीच्या अनेक शाखोपशाखा आहेत. प्रदेशपरत्वे या लोकांना बंजारी, लमाणी, लंबाडी, सुकलीर लमाण, मथुरा लमाण, न्हावी बंजारा, शिंगवाले बंजारा, चारण बंजारा, गोर बंजारा, कचलीवाले बंजारा, यांसारखी विविध नावे आहेत. स्थलपरत्वे त्यांच्या चालीरीती, देवदेवता व अंत्यसंस्कार यांतही काहीसा फरक आढळतो. महाराष्ट्र्रात काही जिल्हयात आढळणारी वणजारी किंवा वंजारी ही जात बंजारा वा बनजारी जमातीहून सांस्कृतिक दृष्टया निराळी आहे. याचे कारण म्हनजे या समाजाचे गेल्या दोनेकशे वर्षांत झालेले महाराष्ट्रीकरण. परंतु सर्वांचा व्यवसाय एकच होता. अर्थात विविध वंशाचे लोक या व्यवसायात सामील झाल्याने त्यांची प्रदेशनिहाय नांवे वेगळी झाली हे वरील यादीवरुन लक्षात येईल. अनेक वंजारी स्वत:ला राजपूत कुळीतील राणाप्रतापाचे वंशज समजतात. राजस्थानातून औरंगजेबाच्या वेळी ते मुसलमानांबरोबर दक्षिणेस आले असावेत असेही मानले जाते, पण ते ऐतिहासिक वास्तव नाही. त्यांच्यात अनेक उपजमांतीचे लोक आहेत. बिहार व ओरिसा या राज्यांत त्यांना आदिवासी म्हणून मान्यता मिळाली नाही. इतरत्र त्यांना अनुसूचित जमातींत समाविष्ट केले आहे. तर महाराष्ट्र्र राज्यात त्यांना भटक्या विमुक्त जातीचा दर्जा दिलेला आहे. आंध्र प्रदेशात ते सुगाळी, दिल्लीत शिरकिवन, राजस्थान व केरळात गवरिया व गूजरातमध्ये चारण म्हणून ओळखले जातात. लोदी घराण्यातील सिकंदरशाह याने १५०२ मध्ये धोलपूरवर स्वारी केली, तेव्हा बंजारांचा प्रथम उल्लेख केलेला आढळतो. एन.एफ. कंबलीज याने या जमाती संबंधीचे संशोधन प्रथम प्रसिद्ध केले. त्यांच्या मते बंजारांच्या चार प्रमुख पोटजाती आहेत चारण, मथुरिया, लमाण आणि घाडी, यांपैकी चारण हे संख्येने जास्त आहेत. त्यांच्यात पुन्हा राठोड, परमार चाहमान, जाडोत, किंवा मुखिया अशा चार कुळी आहेत.

थोडक्यात विविध वंशीय व प्रांतीय लोक या व्यवसायात आल्याने हे सर्व पोटभेद पडले असले तरी समस्या समान आहेत. व्यवसाय म्हणुन बंजारा-वंजारी-चारण हे सारे एकच हा समाजशास्त्रीय इतिहास आहे.

वंजारी समाजही पुरातन काळी मातृसत्ताक पद्धती पाळनाराच होता. महाराष्ट्रातील वंजा-यांची श्रद्धास्थाने म्हणजे जेजुरीचा खंडोबा आणि तुळजाभवानी. या समाजातुन उदयाला आलेले थोर संत म्हणजे भगवानबाबा महाराज. वंजारी समाजाची भगवानबाबांवर अपार श्रद्धा आहे.

आजचे वास्तव:

आज महाराष्ट्रातील वंजारी समाजाची अवस्था अवांच्छित समाजघटक अशी बनली आहे. आज काही प्रमानात शेती तर असम्ख्य वंजारी उसतोदणी कामगार म्हणुन राबत आहेत. आर्थिक स्थिती ही अत्यंत दुर्बळ झालेली आहे. आजही हा समाज स्वत:च्या अस्तित्वाच्या शोधात आहे. आजही शिक्षणाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर आहे. परभणी, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत वंजा-यांची संख्या मोठ्या प्रमानावर आहे. याचे कारण म्हनजे हा भाग सातवाहन ते यादव काळापर्यंत व्यापाराची मध्यवर्ती केंद्रे होती. Patilros101 (चर्चा) २३:४७, १७ मे २०१८ (IST)

Ok Patilros101 (चर्चा) २३:४९, १७ मे २०१८ (IST)

या मधे भरपूर माहिती ही दिशाभूल करणारी वाटत आहे,तरी माझे निवेदन आहे कि कोंकण, उत्तरमहाराष्ट्र या भागात विखुरलेल्या वंजारी समाजा बद्दल माहिती भरपूर कमी असल्याचे जानवत आहे. Tusharphad (चर्चा) २१:०३, २१ जून २०१९ (IST)

१४ जुलै २०१९ पासून Protected संपादन विनंत्या[संपादन]

right 2405:204:9628:47A0:EE43:4BAC:D168:52DD ०८:३५, १४ जुलै २०१९ (IST)