मगध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मगध हे प्राचीन भारतातील एक बलाढ्य राज्य व सोळा महाजनपदांपैकी एक राज्य होतं. याच्या सीमा आधुनिक भारतातील बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशनेपाळच्या काही भागापर्यंत होत्या.

हर्यक वंश (ई. पू 545 ते ई. पू 412) या वंशाचा सर्वात प्रराक्रमी राजा बिम्‍बीसार होता (ई. पू 545 ते ई. पू 493) बिसारचे उपनाव श्रेनिक होते. राजा बिम्‍बीसार ने गिरिव्रजला आपली राजधानी बनवीले. हर्यक वंश हे नागवंश कुळाचि एक उपशाखा होती. याने कौशल व वैशाली या राज परिवारा सोबत वैवहिक संबध कायम केले. त्याची पहिली पत्नी कोशल देवी राजा प्रसेनजीतची बहिण होती. ज्यामुळे त्याला काशी नगर चे राजस्व मिळाले. त्याची दुसरी पत्नी चेल्लना ही चेटकची बहीण होती. त्या नंतर त्याने मद्र देशाची राजकुमारी क्षेमा सोबत विवाह केल्यांमुळे त्याला मद्र देशाचे सहयोग व समर्थन मिळाले माहबग जातक मधे बिम्बिसारच्या ५०० पत्नींचा उल्लेख केला जातो.

प्रशासन[संपादन]

कुशल प्रशासना वर सर्वप्रथम बिम्बिसारने जोर दिला. बिम्बिसार स्वत: शासनाच्यासमस्या मधे रुची घेत होता. त्याच्या राजसभेमधे ८० हजार गावाचे प्रतिनिधी भाग घेत असत असे माहबग जातक मधे सांगितले जाते. पुराणांनुसार बिम्बिसारने जवळपास २८ वर्षे मगधावर राज्य केले.