भारतीय स्टेट बँक
भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि वित्तीय सेवा संस्था | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | व्यवसाय, उद्यम, पत संस्था, बँक, वित्तीय संस्था, सार्वजनिक कंपनी | ||
---|---|---|---|
उद्योग | economics of banking, आर्थिक सेवा, वित्तपुरवठा | ||
स्थान | भारत | ||
मालक संस्था | |||
मुख्यालयाचे स्थान | |||
स्थापना |
| ||
मागील |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. सन १९२१ मध्ये स्थापन झालेल्या इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया झाले. भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या १०० बँकांत या बँकेचा २०१२ साली ६०वा क्रमांक लागतो.[१] शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास स्टेट बँक जगातील सर्वात मोठी बँक ठरू शकेल.
१८०६ मध्ये बँक ऑफ कलकत्ता नावाने स्थापलेली ही बँक भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक आहे. डिसेंबर २०१२ची मालमत्ता विचारात घेता, ही भारतातील सर्वात मोठी बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी असून हिची ५०१ अब्ज डॉलर मालमत्ता व १५७ परदेशी कार्यालये धरून एकूण १५,००३ शाखा होत्या.[२] मुंबई नंतर दिल्लीत सर्वात जास्त शाखा आहेत.[३] एसबीआय अनिवासी भारतीयांना (एनआरआय) भारतातील आणि भारताबाहेरील शाखांच्या नेटवर्कमधून बँकिंग सेवा पुरवते. एसबीआयच्या भारतात १४ प्रादेशिक hubs असून देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ५७ विभागीय कार्यालये आहेत.[४] एसबीआयचा भारतीय व्यापारी बँकांमध्ये ठेवी आणि कर्ज स्वरूपात २०% हिस्सा आहे.[५]
एस बी आयच्या गैरबँकिंग संस्था
- एस बी आय कॅपिटल मार्कट लिमिटेड.
- एस बी आय फ़ंडस मॅनजमेंट प्रायव्हेट लि .
- एस बी आय फॅक्टर्स आणि कमर्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लि.
- एस बी आय कार्ड्स आणि पेमेंट्स सर्विसेस प्रायव्हेट लि.
- एस बी आय डी एफ एच आय लि.
स्टेट बँकेच्या सहयोगी बँका
- स्टेट बैंक ऑफ़ बीकानेर एंड जयपूर
- स्टेट बैंक ऑफ़ हैदराबाद
- स्टेट बैंक ऑफ़ मैसूर
- स्टेट बैंक ऑफ़ पटियाला
- स्टेट बैंक ऑफ़ त्रावणकोर
- स्टेट बैंक ऑफ़ इंदौर
- स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र
- भारतीय महिला बँक
संदर्भ
- ^ Do we need more banks or bigger banks? Moneycontrol.com
- ^ History of the Evolution of SBI volumes १, २ and ३ and Banking Beyond Boundaries (Penguin, २०११)
- ^ "State Bank of India Branches". 2013-05-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 May 2013 रोजी पाहिले. Unknown parameter
|अॅक्सेसवर्ष=
ignored (सहाय्य) - ^ "State Bank of India Offices". 2022-01-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-10-23 रोजी पाहिले.
- ^ "SBI accounts for one-fifth of country's loans". 25 January 2009 रोजी पाहिले. Unknown parameter
|अॅक्सेसवर्ष=
ignored (सहाय्य)