पेराग्वे नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पेराग्वे नदी
Rio Paraguai, Río Paraguay
Rio Paraguay.jpg
आसुन्सियोनजवळ पेराग्वे नदीचे पात्र
Paraguayrivermap.png
पेराग्वे नदीच्या मार्गाचा नकाशा
उगम मातो ग्रोस्सो, ब्राझील
मुख पाराना नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश पेराग्वे, ब्राझील, आर्जेन्टिना, बोलिव्हिया
लांबी २,६९५ किमी (१,६७५ मैल)
सरासरी प्रवाह ४,६९६ घन मी/से (१,६५,८०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ११,२२,१५४ वर्ग किमी

पेराग्वे (पोर्तुगीज: Rio Paraguai, स्पॅनिश: Río Paraguay, ग्वारानी: Ysyry Paraguái) ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी ब्राझील देशाच्या मातो ग्रोसो राज्यामध्ये उगम पावते व साधारण दक्षिण दिशेला वाहते. बोलिव्हियापेराग्वे देशांमधून वाहत जाऊन पेराग्वे नदी पेराग्वे-आर्जेन्टिना आंतरराष्ट्रीय सीमेवर पाराना नदीला मिळते.

पेराग्वेची राजधानी आसुन्सियोन हे पेराग्वे नदीवर वसलेले सर्वात मोठे शहर आहे. पेराग्वे नदी सपाट प्रदेशामधून वाहत असल्यामुळे जलवाहतुकीसाठी तिचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: