Jump to content

अफगाणिस्तान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान या पानावरून पुनर्निर्देशित)
अफगाणिस्तान
د افغانستان اسلامي امارت (पश्तू)
جمهوری اسلامی افغانستان (दारी)
अफगाणिस्तानाचे इस्लामी अमिरात
अफगाणिस्तान चा ध्वज
ध्वज
राष्ट्रगीत: अफगाण राष्ट्रीय गीत
अफगाणिस्तानचे स्थान
अफगाणिस्तानचे स्थान
अफगाणिस्तानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
काबुल
अधिकृत भाषा दारी, पश्तू
सरकार एकाधिकारशाही हंगामी इस्लामिक अमिरात
 - राष्ट्रप्रमुख हिबातुल्लाह अखुंडजादा
 - पंतप्रधान मोहम्मद हसन अखुंड
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट १९, १९१९ 
क्षेत्रफळ
 - एकूण ६,४७,५०० किमी (४१वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण ३,१८,८९,९२३ (२००७, अंदाज) (३७वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ४६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १९.८४ अब्ज अमेरिकन डॉलर (११४वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ७२४ अमेरिकन डॉलर (१७२वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन अफगाणिस्तानी अफगाणी
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+०४:३०
आय.एस.ओ. ३१६६-१ AF
आंतरजाल प्रत्यय .af
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९३
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


अफगाणिस्तान (अधिकृत नाव: पश्तू- د افغانستان اسلامي امارت, फारसी- جمهوری اسلامی افغانستان, मराठी-अफगाणिस्तानाचे इस्लामी अमिरात) हा आशियाच्या साधारणतः मध्यभागी असलेला एक भूपरिवेष्टित देश आहे. भौगोलिक वर्गीकरणात याला काही वेळा मध्य आशियात, काही वेळा दक्षिण आशियात, तर काही वेळा मध्यपूर्वेत गणले जाते; कारण बहुतेक सर्व शेजारी देशांशी याचे धार्मिक, वांशिक, भाषिक व भौगोलिक संबंध जोडलेले आहेत.

इतिहास

[संपादन]

अफगाणिस्तानचे मूळ नाव अहिगणस्थान असे होते. महाभारतामधील कौरवांचा मामागांधारीचा बंधू शकुनी मूळ ह्याच देशातला होता. सिंधू नदीच्या पलिकडे पारसिक (आजचा इराण) राज्या पर्यंत भारतीय गणराज्ये राज्ये पसरलेली होती. हे सर्व लोक वैदिक धर्माचे अनुयायी होते. काबूल नदीचे नाव कुभा असे होते. फार पूर्वी यथील वंशातील लोकांची एक शाखा पुढे जाऊन त्यांनी इराण आणि ग्रीस येथील राज्ये वसवली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा सरनौबत नेताजी पालकर याला क्रूरकर्मा औरंगजेबाने जबरदस्तीने मुसलमान करून अफगाणिस्तानातच ठेवले होते. एकेकाळी आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिकदृष्ट्या अतिशय संपन्न व प्रगत होता. पण आज हा देश दुर्दैवाने जागतिक दहशतवादाचे प्रमुख केंद्र बनला आहे. अफगाणिस्तानमधील सोव्हिएत युद्धानंतर अनेक वर्षे चालू असलेल्या गृहयुद्धामध्ये अफगाणिस्तानचे अतोनात नुकसान झाले. १९९६ ते २००१ दरम्यान अफगाणिस्तानवर तालिबान ह्या अतिरेकी गटाची सत्ता होती. २००१ सालच्या नाटोच्या आक्रमणादरम्यान तालिबानचा पाडाव झाला व हमीद करझाई राष्ट्राध्यक्षपदावर आला. हे अध्यक्षीय प्रजासत्ताक २०२१ पर्यंत टिकले. त्यावेळी अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यावर तालिबानने पु्न्हा एकदा काबुलसह अफगाणिस्तानचा ताबा घेतला.

अफगाणिस्तानची लोकसंख्या तीन कोटी असून, क्षेत्रफळ ६,४७,५०० चौरस किलोमीटर एवढे आहे. आकारमानाच्या दृष्टीने या देशाचा क्रमांक ४१वा असून, लोकसंख्येच्या दृष्टीने या देशाचा क्रमांक ४२वा आहे. काबूल ही अफगाणिस्तानाची राजधानी व तेथील सर्वात मोठे शहर आहे.

भूगोल

[संपादन]

अफगाणिस्तानच्या चतुःसीमा

[संपादन]

अफगाणिस्तानच्या दक्षिण आणि पूर्व भागात पाकिस्तान भारत व पश्चिमेला इराण हा देश आहे; तसेच उत्तरेला तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तानताजिकिस्तान हे देश आहेत.

प्रांत

[संपादन]

अफगाणिस्तान ३४ प्रांतांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक प्रांत अनेक जिल्ह्यांमध्ये विभागलेला असतो.

मोठी शहरे

[संपादन]

राजधानी काबूल हे अफगाणिस्तानचे सगळ्यात मोठे शहर आहे. येथे दहा लाखांपेक्षा अधिक लोक राहतात. याशिवाय कंदाहार, हेरात, मझार ए शरीफ, जलालाबाद, गझनीकुंडुझ ही इतर काही मोठी शहरे आहेत.

धर्म

[संपादन]

अफगाणिस्तानावरील पुस्तके

[संपादन]

संदर्भ

[संपादन]