Jump to content

मुजफ्फर हुसैन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मुजफ्फर हुसैन (२० मार्च, १९४५:बिजोलिया, राजस्थान - १३ फेब्रुवारी, २०१८:मुंबई, महाराष्ट्र)हे एक मराठी विचारवंत पत्रकार आणि लेखक होते. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यामुळे विविध भाषांतील वृुत्तपत्रांकरिता त्यांनी लेखणी चालवली.

मुजफ्फर हुसैन यांचे वडील राजवैद्य होते. राजस्थानातील संस्थानी राजवट संपल्यावर त्यांचे कुटुंब मध्यप्रदेशातील नीमच येथे आले. तेथील काॅलेजातून त्यांनी उज्जैन विश्वविद्यालयाची पदवी घेतली आणि एल्‌एल.बी.साठी ते मुंबईत आले. लाॅ काॅलेजात असतानाच त्यांचा कल पत्रकारितेकडे वळला.

मुजफ्फर हुसैन यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • अल्पसंख्याक वाद : एक धोका
  • इस्लाम आणि शाकाहार
  • इस्लाम धर्मातील कुटुंब नियोजन
  • धुमसती मुंबई
  • लादेन, दहशतवाद आणि अफगाणिस्तान

(अपूर्ण)



पुरस्कार

[संपादन]
  • पद्मश्री (२००२)