Jump to content

गौतम बुद्ध यांच्याबद्दल व्यक्त झालेली मते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गौतम बुद्ध यांच्या बद्दल उल्लेखनीय व्यक्तींची मते खालीलप्रमाणे आहेत.

विचार

[संपादन]
  • भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला सदाचार शिकवणारा पहिला महापुरुष भगवान बुद्ध होय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

तुकडोजी महाराज

  • गौतम बुद्धांनंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव जगाने किंवा भारताने आजपर्यंत निर्माण केला नाही.

ओशो (रजनीश)

  • शाक्यमुनी गौतम बुद्धांखेरीज संपूर्ण मानवजातीत येशू ख्रिस्तांएवढा थोर पुरुष दुसरा झाला नाही.

रेनन, प्रसिद्ध ख्रिस्तपंडित

  • जगातल्या सर्व धर्मसंस्थापकांत भगवान बुद्ध हेच फक्त असे थोर होते की, जे आपली मुक्तिसाध्य करण्याच्या मानवी सामर्थ्याचा स्वाभाविक मोठेपणा बरोबर ओळखू शकले. मानवतेची योग्यता उंचावण्याच्या कर्तृत्वात जर खऱ्या थोर माणसाचे मोठेपण सामावले असेल तर खरा थोर असा तथागताशिवाय दुसरा कोण असू शकेल? बुद्धांनी मानवाच्या वर दुसरे कोणी संस्थापित करून त्याला हीन न करता प्रज्ञा (ज्ञान) व मैत्रीच्या (प्रेम) शिखरावर (त्याला) प्रस्थापित करून श्रेष्ठत्व प्राप्त करून दिले आहे.

ड्वाईट गोडार्ड

  • कलियुगी हरी बुद्धरूपधरी ।

तुकोबा शरीरी प्रवेशला ।।
संत बहिणाबाई

  • एकोनी बंका करित उत्तर ।

बौद्ध अवतार पांडुरंग ।।
संत बंका महार

आह्मी बळकट जालों फिराउनी । तुमच्या वचनीं तुह्मां गोऊं ॥1॥ 

जालें तेव्हां जालें मागील तें मागें । आतां वर्मलागें ठावीं जालीं ॥ध्रु.॥ तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध । शुद्धापाशीं शुद्ध बुद्ध व्हावें ॥2॥ तुका ह्मणे आह्मां आत्मत्वाची सोय । आपण चि होय तैसा चि तूं ॥3॥


संत तुकाराम

  • बुद्ध अवतारी आम्ही झालो संत ।

वर्णवया मात नामा म्हणे ।
संत नामदेव

  • “बुद्धांच्या ह्रदयाचा एक लक्षांशही मला लाभला तर मी स्वतःला धन्य मानले असते.”

स्वामी विवेकानंद

  • “अवघ्या जगामध्ये बुद्धच असे एकमेव महापुरुष आहेत की ज्यांनी यज्ञातील पशुहत्या थांबविण्यासाठी यज्ञात पशूच्या ऐवजी स्वतःचे जीवन बळी देण्याची तयारी दाखवली.”

स्वामी विवेकानंद

  • “बौद्ध धर्म हा जगातील पहिला प्रचारक धर्म होता आणि त्याने त्या काळातील सगळ्या सभ्य जगात प्रवेश केला, आणि तरीही या धर्माच्या प्रचारार्थ रक्ताचा एक थेंबही सांडावा लागला नाही.”

स्वामी विवेकानंद

  • “बुद्ध हे इतर सर्व धर्माचार्यांपेक्षा अधिक साहसी, अधिक प्रांजळ होते. ते म्हणाले होते की, "कोणत्याही शास्त्रावर विश्वास ठेवू नका. वेद हे थापाडे आहेत. शास्त्रे जर माझ्या अनुभूतींशी वा उपलब्धींशी जुळतील तर ते त्या शास्त्रांचेच भाग्य. सर्वात श्रेष्ठ शास्त्र स्वतःमीच आहे. यागयज्ञ आणि देवदेवतार्चन निष्फळ होय जगाला सर्वांग सुंदर नीतिशास्त्रीची शिकवण देणारे बुद्ध हेच पहिले मानव होते.”

स्वामी विवेकानंद

  • “बुद्ध हे एक थोर समाज सुधारक होते. भारतातील थोर तत्त्वज्ञांमध्ये बुद्ध हेच असे एकमेव होते की ज्यांना जातिभेद मान्य नव्हता... इतर सर्वच दार्शनिकांनी वा तत्त्वज्ञांनी थोड्याबहुत प्रमाणात सामाजिक अंधविश्वासांना कुरवाळलेच आहे. समाजाच्या खुळचट समजुतींची खुशामत केली आहे.”

स्वामी विवेकानंद

  • “भगवान बुद्धांसारखा त्यागी महापुरुष या अवनीतलावर अन्य कुणी झाला नाही.”

स्वामी विवेकानंद

  • “मानवामानवातच काय पण मनुष्य आणि पशू यांमध्ये देखील जी विषमता आढळते तिचा बुद्धांनी निषेध केला. ‘सर्व जीव समान आहेत’ असा उपदेश बुद्ध करीत. बुद्धांनीच सर्वप्रथम मद्यपाननिषेधाचा पुरस्कार केला आहे.”

स्वामी विवेकानंद

  • “जगातील सर्व आचार्यांमध्ये वा धर्म संस्थापकांमध्ये बुद्ध हे एकटेच असे आहेत की ज्यांच्या कार्याला बाहेरील कोणताही हेतू प्रेरक नव्हता. इतर सर्वांनीच आपण ईश्वरावतार, ईश्वरदूत, ईश्वरपुत्र आहोत अशी घोषणा केलेली आहे, आणि ते असेही सांगून गेले आहेत की, त्यांच्यावर जो विश्वास ठेवील तोच स्वर्गी जाईल, मुक्त होईल. पण बुद्ध मृत्यूच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हेच म्हणत असत, “कुणीही तुम्हाला मुक्त होण्यासाठी साहाय्य करू शकणार नाही. स्वतःच स्वतःला साहाय्य करा, स्वतःच्याच प्रयत्‍नांची मुक्तिलाभाची कास धरा.” स्वतः संबंधी ते म्हणत, "बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशाप्रमाणे अनंत ज्ञानसंपन्न; मी सिद्धार्थ गौतमाने ती अवस्था प्राप्त करून घेतली आहे. तुम्हीही जर तिच्यासाठी प्राण पणास लावून प्रयत्‍न कराल तर तुम्हांलीही ‘बुद्धत्व’ प्राप्ती होऊ शकेल." ”

स्वामी विवेकानंद

  • “भारतात आज हे जे संन्याशांचे मठ वगैरे दिसतात ते सारे बौद्ध धर्माच्या अधिकाराखाली होते. हिंदूनी आता त्या साऱ्यांना आपल्या रंगाने रंगवून स्वतःचे करून घेतले आहे. बुद्धांपासूनच यथार्थ संन्यासाश्रमाचा पाया रचला गेला. त्यांनीच संन्यासाश्रमाच्या मृत सांगड्यात प्राण ओतले.”

स्वामी विवेकानंद

  • “बुद्धांनी प्रचंड शक्तिशाली सत्याची शिकवण दिली. सर्व जगाला त्यांनी भेदभाव न करता शिकवले, कारण ‘मानवाची समानता’ हा त्यांच्या महान संदेशांपैकी एक संदेश होता. सर्व मानसे समान आहे, याला काही अपवाद नाही.”

स्वामी विवेकानंद

  • “बुद्ध हे समतेचे महान उपदेशक होते. आध्यात्मिकता प्राप्त करून घेण्याचा प्रत्येक पुरुषाला व स्त्रीला सारखाच हक्क आहे. ही त्यांची शिकवण होती.”

स्वामी विवेकानंद[]

  • माझ्या मतानुसार बुद्धांचा धम्म श्रेष्ठ आहे. दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याची तुलना केली जाऊ शकत नाही. जर एखाद्या विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही, असे माझे माझे पक्के मत, सर्व धर्मांचा २१ वर्षे सखोल अभ्यास केल्यावर झाले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • “भविष्य काळातील धर्म हा वैश्विक धर्म असेल, तो व्यक्तिगत शरीरधारी ईश्वराच्या पलीकडचा, ठाम निश्चित अशा परंपरेने पाळत असलेल्या मतप्रणाली, तसेच पराप्राकृतिक ईश्वराचा शोध घेणाऱ्या शास्त्रांना बाजूला ठेवणारा असेल. विज्ञानाच्या गरजांची जर कोणता धर्म परिपूर्ती करीत असेल तर तो फक्त बौद्ध धर्म आहे.

अल्बर्ट आईन्स्टाईन

  • बौद्ध धर्मातील नैतिक आदर्श पुरुष जो अर्हत, तो नैतिक आणि बौद्धिक अशा दोन्ही दृष्टींनी महान असला पाहिजे. तो तत्त्वज्ञ, तसाच श्रेष्ठतम सदाचारीही असला पाहिजे. बौद्ध धर्मात ज्ञान हे मुक्ती (निर्वाण)साठी अनिवार्य मानले गेले आहे आणि ते प्राप्त करण्यास अपयश येण्याची दोन कारणे आहेत त्यापैकी अज्ञान हे एक कारण आहे. (दुसरे कारण लोभ किंवा तृष्णा होय.) ह्या उलट ख्रिश्चन आदर्श पुरुषाच्या घडणीत ज्ञानाला अजिबात स्थान नाही. जगातल्या दुःखापैकी पुष्कळशी दुःखे दृष्टपणापेक्षा मूर्खत्वाने आणि अंधश्रद्धेने निर्माण झाली आहेत.

डब्ल्यू. टी. स्टेस, ग्रंथ - बौद्ध धर्माचे नीतिशास्त्र (Buddhism Ethics)

  • बौद्ध धर्माइतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या श्रेष्ठत्वावर आणि अज्ञानाच्या हीनतेवर भर देण्यात आला नाही. आपली दृष्टी स्पष्ट असण्याबाबत बौद्ध धर्माव्यतिरीक्त कोणत्याही धर्मात मनोविकासासाठी (चित्त संस्कारासाठी) इतकी सखोल योजना प्रस्तुत करण्यात आली नाही.

ई. जे. मिल्स, ग्रंथ - बौद्ध धर्म (Buddhism)

  • बौद्ध धर्माचे आध्यात्मिक तत्त्वज्ञान ही हितकारक सामर्थशाली देणगी आहे, बौद्ध धर्माप्रमाणे युनिटेरिअन ख्रिस्ती बांधवही धर्मग्रंथ किंवा मतप्रणालीची बाह्य शक्ती नाकारून मानवाला अंतर्यामी असलेल्या मार्गदीपाचा अधिकार मान्य करतात. युनिटेरिअन मताचे अनुयायी येशू ख्रिस्त व तथागत बुद्ध हे जीवनाचे सर्वोच्च भाष्यकार आहेत असे मानतात.

रेव्हरॅंड लेस्ली बोल्टन, युनिटेरिअन ख्रिस्ती पाद्री

— डॉ. रंजन रॉय

  • दीर्घकाळापर्यंत मानवावर बाह्य शक्तींनी अधिकार गाजवला आहे. जर तो खरोखरच सुसंस्कृत व्हावयाचा असेल तर त्याने स्वतःच्या तत्त्वानुसार स्वशासनाचा स्वीकार करावा. बौद्ध धर्म ही जगातील पहिली नैतिक विचारधारा आहे, जिच्यामध्ये मानवास आत्मनियमन (स्वशासन) करण्याची शिकवण दिलेली आहे. म्हणूनच प्रगतिशील जगाला ही सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धर्माची आवश्यकता आहे.

इ. जी. टेलर, ग्रंथ - बौद्ध धर्म आणि आधुनिक विचारधारा (Buddhism and Modern Thought)

  • जेव्हा आम्ही निसर्गाचा ग्रंथ उघडतो, तेव्हा कोट्यवधी संवत्सरांतील रक्त आणि अश्रूंनी लिहिलेली उत्क्रांतीची गाथा वाचतो, जेव्हा जीवन नियंत्रणाचे नियम आणि विकासाच्या उत्पत्तीस कारणीभूत होणारे नियम आपण अभ्यासतो, तेव्हा ईश्वर प्रेमरूप आहे हे मत किती भसवे आहे याची जाणीव होते. बुद्धाचा धर्म हा कितीतरी निराळा धर्म आहे.

विनवुड रीड, ग्रंथ - मानवाचे हौतात्म्य (Martyrdom of Man)

आर. जे. जॅक्सन

  • बौद्ध धर्म एक अदभुत धर्मनी तत्त्वज्ञान आहे.

मार्क झुकेरबर्ग

  • ऐतिहासिक थोर धर्मांपैकी मी बौद्ध धर्माला पसंत करतो.

बर्ट्रांड रसेल

संदर्भ

[संपादन]
  1. ^ संदर्भ - भगवान बुद्ध आणि त्यांची शिकवण : लेखक - स्वामी विवेकानंद