Jump to content

गिरीश कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गिरीश पांडुरंग कुलकर्णी या पानावरून पुनर्निर्देशित)
गिरीश कुलकर्णी
जन्म गिरीश पांडुरंग कुलकर्णी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट (अभिनय, पटकथा, निर्मिती)
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट वळू,
देऊळ

गिरीश कुलकर्णी (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी चित्रपटांतील अभिनेता, पटकथाकार, निर्माता आहे. याने अभिनय केलेले वळू, देऊळ इत्यादी चित्रपट विशेष गाजले आहेत.

जीवन

[संपादन]

गिरीश कुलकर्णी याने लातूरहून यंत्र अभियांत्रिकीचा डिप्लोमा अभ्यासक्रम केला []. लातूरमध्ये शिकत असताना तो नाटकस्पर्धांत भाग घेत असे. डिप्लोमा झाल्यानंतर त्याने एका खासगी कंपनीत नोकरी पत्करली. मात्र काही काळानंतर नोकरी सोडून त्याने लेखनात कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला [].

कारकीर्द

[संपादन]

चित्रपट-कारकीर्द

[संपादन]
वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा सहभाग टिप्पणी
इ.स. २००८ वळू मराठी अभिनय (पात्र: "जीवन")
पटकथा
निर्मिती
गारूड हिंदी अभिनय लघुपट
इ.स. २००९ गाभ्रीचा पाऊस मराठी अभिनय (पात्र: "कृष्णा")
गंध मराठी अभिनय मंगेश
विहीर मराठी पटकथा
इ.स. २०११ देऊळ मराठी अभिनय (पात्र: "केश्या")
पटकथा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तसेच सर्वोत्कृष्ट पटकथालेखनाचा (सर्वोत्कृष्ट संवादलेखनाचा) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (इ.स. २०११)[]
इ.स. २०१२ मसाला मराठी अभिनय (पात्र: "रेवण पाटील")
कथा
पटकथा
संवाद
निर्मिती
पुणे ५२ मराठी अभिनय (पात्र: "अमर आपटे")
संवाद
निर्मिती

पुरस्कार

[संपादन]
  • इ.स. २०११ : देऊळ चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार [].
  • इ.स. २०११ : देऊळ चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट पटकथालेखन (सर्वोत्कृष्ट संवाद) पुरस्कार [].

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ a b सखदेव, प्रणव. "सर्जनशील 'गिरीश कुलकर्णी'". २८ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b c "मराठी चित्रपटांवर राष्ट्रीय पुरस्कारांचा 'कळस'". ४ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]