प्रोटेस्टंट पंथ
Jump to navigation
Jump to search
प्रोटेस्टंट (Protestant) ही ख्रिश्चन धर्मामधील एक शाखा आहे. १६व्या शतकातील प्रोटेस्टंट सुधारणेमुळे प्रोटेस्टंट धर्म वाढीस लागला. रोमन कॅथलिक चर्चमधील अनेक चुका प्रोटेस्टंट धर्मामध्ये सुधारण्यात आल्याचे अनुयायांचे मत आहे.
मार्टिन ल्युथरने १५१७ साली जर्मनीमध्ये सुधारणा चळवळीस सुरूवात केली. फ्रान्समध्ये जॉन केल्व्हिन, स्वित्झर्लंडमध्ये हल्डरिश झ्विंग्ली इत्यादी सुधारकांनी प्रोटेस्टंटचा प्रसार केला. हळूहळू हा धर्म युरोपभर पसरला. सध्या जगात अंदाजे ८० कोटी प्रोटेस्टंट धर्मीय (एकूण ख्रिश्चनांच्या ४० टक्के) आहेत. अमेरिका, नेदरलँड्स, स्कॅंडिनेव्हियामधील सर्व देश, दक्षिण आफ्रिका इत्यादी अनेक प्रमुख देशांमध्ये प्रोटेस्टंट धर्मीय लोकांची संख्या कॅथलिक धर्मीयांपेक्षा अधिक आहे.