Jump to content

खपानुसार भारतीय वृत्तपत्रांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


येथे खपानुसार भारतीय वृत्तपत्रांची यादी आहे. इ.स. १७८०मध्ये कोलकातामधील बेंगाल गॅझेटच्या प्रकाशनाने सुरू झालेला भारतीय वृत्तपत्र व्यवसाय जगातील सगळ्यात मोठ्या वृत्तपत्र व्यवसायांपैकी एक आहे.

सद्य स्थिती

[संपादन]

भारतातील वृत्तपत्र व्यवसाय जगातील सगळ्यात मोठ्या वृत्तपत्र व्यवसायांपैकी एक आहे.[]. १९९७ साली भारतात एकूण ४१,७०५ वृत्तपत्रे प्रकाशित होत होती. पैकी ४,७२० दैनिक तर १४,४७३ साप्ताहिक आवृत्त्यांमध्ये प्रकाशित होत होती. हिंदी भाषेत सर्वाधिक १६,६८४ वृत्तपत्रे प्रसिद्ध झाली[]

वाचकसांख्यिकी

[संपादन]

भारतीय वृत्तपत्रे दोन प्रकारे विभागली जातात, खप आणि वाचकवर्ग.

ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन्स ही वृत्तपत्र व्यावसायिक संस्था भारतातील वृत्तपत्रांचा खप प्रमाणित करते. आपल्या सदस्य-वृत्तपत्रांचा विकल्या जाणाऱ्या प्रतींच्या आकड्यांची येथे तपासणी केली जाते.

वाचकवर्ग

[संपादन]

प्रत्येक वृत्तपत्राच्या वाचकवर्गाचो दोन प्रकारे सर्वेक्षण केले जाते - भारतीय वाचक सर्वेक्षण आणि राष्ट्रीय वाचक सर्वेक्षण.

खपानुसार वृत्तपत्रयादी मराठी

[संपादन]

आरोप प्रत्यारोप

[संपादन]

खपानुसार वृत्तपत्रयादी (पूर्ण भारतीय)

[संपादन]

आकडे लाखांत[]

वृत्तपत्र भाषा शहर, राज्य प्रती दिवस खप मालकी आणि नोंदी
टाइम्स ऑफ इंडिया इंग्लिश अनेक राज्यांतील शहरे १३.४६ बेनेट कोलमन
दैनिक जागरण
दैनिक जागरण
हिंदी भाषा अनेक राज्यांतील शहरे ३१.६८ जागरण प्रकाशन
मलयाला मनोरमा
മലയാള മനോരമ
मल्याळी अनेक राज्यांतील शहरे १५.१४ मलयाला मनोरमा ग्रुप
द हिंदू इंग्लिश अनेक राज्यांतील शहरे १३.६० कस्तुरी अँड सन्स, १८७८ मध्ये स्थापना. बोफोर्स घोटाळा चव्हाट्यावर आणला
डेक्कन क्रोनिकल इंग्लिश अनेक राज्यांतील शहरे १३.४९ इंडियन प्रीमियर लीगमधील डेक्कन चार्जर्स संघाची मालकी
आनंद बझार पत्रिका
আনন্দবাজার পত্রিকা
बंगाली कोलकाता, पश्चिम बंगाल १२.७७ आनंद पब्लिशर्स
अमर उजाला
अमर उजाला
हिंदी भाषा अनेक राज्यांतील शहरे १२.३० हिंदीभाषक प्रदेशांत
दैनिक भास्कर
दैनिक भास्कर
हिंदी भाषा अनेक राज्यांतील शहरे ११.४७ गुजरातमध्ये दिव्य भास्कर नावाने प्रकाशित
हिंदुस्तान टाइम्स इंग्लिश अनेक राज्यांतील शहरे ११.४३ एच.टी. मीडिया लिमिटेड
१० हिंदुस्तान
हिन्दुस्तान
हिंदी भाषा अनेक राज्यांतील शहरे ११.४२ हिंदुस्तान टाइम्सची हिंदी आवृत्ती
११ ईनाडू
ఈనాడు
तेलुगू आंध्र प्रदेशमधील अनेक शहरे तसेच भारतातील मुख्य शहरे ११.३४ रामोजी रावची ईनाडू ग्रुप कंपनी. ई टीव्ही दूरचित्रवाणी वाहिन्यांची सुद्धा मालकी
१२ मातृभूमी
മാതൃഭുമി
मल्याळी केरळमधील अनेक शहरे तसेच भारतातील मुख्य शहरे १०.७७ मातृभूमी ग्रुप
१३ गुजरात समाचार
ગુજરાત સમાચાર
गुजराती अमदावाद, गुजरात १०.५१ लोक प्रकाशन लिमिटेड
१४ पंजाब केसरी
पंजाब केसरी
हिंदी भाषा पंजाब, हरयाणा ९.०२ संस्थापक जगत नारायणची शीख दहशतवाद्यांनी हत्या केली
१५ दिनकरन
தினகரன்
तमिळ तमिळनाडूमधील अनेक शहरे तसेच भारतातील मुख्य शहरे ९.०१ २००५ पासून सन टीव्ही
१६ सकाळ
सकाळ
मराठी महाराष्ट्रातील अनेक शहरे ८.७९ २००८पासून इंग्लिश भाषेतील सकाळ टाइम्सचे प्रकाशन
१७ दिन तंती
தினத்தந்தி
तमिळ तमिळनाडूमधील अनेक शहरे तसेच भारतातील मुख्य शहरे ८.५४ संस्थापक एस.पी. अदितनार
१८ दिव्य भास्कर
દિવ્ય ભાસ્કર
गुजराती अमदावाद, गुजरात ८.४० दैनिक भास्करची गुजराती आवृत्ती
१९ आज
आज
हिंदी भाषा वाराणसी, उत्तर प्रदेश ७.४८
२० इकोनॉमिक टाइम्स इंग्लिश अनेक राज्यांतील शहरे ६.५१ बेनेट कोलमन
२१ द टेलिग्राफ इंग्लिश अनेक राज्यांतील शहरे ४.६५ आनंद पब्लिशर्स
२२ प्रजावाणी
ಪ್ರಜಾವಾಣಿ
कन्नड कर्नाटक ३.६४ प्रजावाणी
२३ द न्यू इंडियन एक्सप्रेस इंग्लिश अनेक राज्यांतील शहरे ३.०९ एक्सप्रेस पब्लिकेशन्स लिमिटेड
२४ डेक्कन हॅराल्ड इंग्लिश अनेक राज्यांतील शहरे २.१४ द प्रिंटर्स
२५ उदयवाणी
ಉದಯವಾಣಿ
कन्नड कर्नाटक १.८५ उदयवाणी
२६ द स्टेट्समन इंग्लिश अनेक राज्यांतील शहरे १.७२ द स्टेट्समन लिमिटेड
२७ द हिंदू बिझनेस लाइन इंग्लिश अनेक राज्यांतील शहरे १.६३ कस्तुरी अँड सन्स
२८ बिझनेस स्टॅंडर्ड इंग्लिश अनेक राज्यांतील शहरे १.४४ बिझनेस स्टॅंडर्ड लिमिटेड
२९ दैनिक बारामती प्राईड मराठी बारामतीसह आसपासचे ७ तालुके ०.१९ ~

हेसुद्धा पाहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ World Press Trends
  2. ^ "Fact Sheet-The Media Scene".
  3. ^ World Press trends 2008 by World Association of Newspapers

साचा:Newspapers in India