Jump to content

गुजरात समाचार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुजरात समाचार हे भारताच्या गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात खपणारे गुजराती दैनिक आहे. अहमदाबाद येथे मुख्यालय असणारे हे वृत्तपत्र अहमदाबाद, वडोदरा, सुरत, राजकोट, भावनगर, मेहसाणा, भूज, मुंबई आणि न्यू यॉर्क येथून प्रकाशित होते.

या वृत्तपत्राची सुरुवात १९३२ साली झाली होती. २०१४तील सर्वेक्षणानुसार या वृत्तपत्राचे ४६ लाख वाचक होते.