दैनिक जागरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दैनिक जागरण हे भारतातील एक हिंदी वृत्तपत्र आहे. २०१६ मध्ये संचलनानुसार ते जगात ५ व्या आणि भारतात दुुुसऱ्या क्रमांकावर होते. २०१९ च्या चौथ्या तिमाहीत भारतीय वाचक सर्वेक्षणानुसार दैनिक जागरणने एकूण ६.८६ कोटी (६८.६ दशलक्ष) वाचकसंख्या नोंदवली, जे सर्वोच्च प्रकाशन होते.

हे वृत्तपत्र जागरण प्रकाशन लिमिटेड या प्रकाशन गृहाच्या मालकीचे आहे,[१] जेे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियामध्ये सूचीबद्ध आहे.

इतिहास[संपादन]

दैनिक जागरणची स्थापना ब्रिटीश राजवट आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळात झाली. हे वृत्तपत्र 1942 मध्ये पूरण चंद्र गुप्ता, जे.सी. आर्य आणि गुरुदेव यांनी सुरू केले होते आणि नंतर नरेंद्र मोहन यांनी याचे संपादन केले होते. वृत्तपत्राची पहिली आवृत्ती झाशी येथे प्रकाशित झाली आणि कानपूर आवृत्ती ५ वर्षांनंतर १९४७ मध्ये प्रकाशित केली गेली. त्यानंतर रीवा आणि भोपाळ आवृत्ती अनुक्रमे 1953 आणि 1956 मध्ये सुरू झाली. 2003 मध्ये इतर अनेक शहर आवृत्त्या जोडल्या गेल्या. यामध्ये रांची, जमशेदपूर, धनबाद, पानिपत आणि भागलपूर या शहरांचा समावेश होता. 2004 मध्ये, हल्दवानी आणि लुधियाना आवृत्ती देखील लाँच करण्यात आली. मुझफ्फरपूर, जम्मू आणि धर्मशाला आवृत्त्या 2005 मध्ये आल्या.

अधिग्रहण[संपादन]

जागरण प्रकाशन लिमिटेडने 2010 मध्ये मिड-डे आणि 2012 मध्ये नई दुनियाचे अधिग्रहण केले.

वाद[संपादन]

दैनिक जागरणने दिल्ली हिंसाचारावर मौन पाळले. ही घटना दडपल्याचा आरोप दैनिक जागरणवर करण्यात आला.[२]

दैनिक जागरणवर भाजप सरकारच्या समर्थनार्थ खोट्या बातम्या चालवल्याचाही आरोप आहे. यामध्ये हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्येची घटना कव्हर करणारी बातमी चालवली गेली, ज्यामध्ये ही बलात्काराची खोटी केस दैनिक जागरणने घोषित केली.[३] तसेच बलात्काऱ्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न या पेपरने केला, नंतर सीबीआयने हे नाकारत असे म्हटले की सामूहिक बलात्कार झाला होता आणि तो लपविण्याचा प्रयत्न राज्याने केला.[३]

दैनिक जागरणवर भारतीय गणितज्ञ आणि शिक्षणतज्ञ आनंद कुमार यांच्या विरोधात स्मीअर मोहीम चालवल्याचा आरोप आहे. त्यांच्या सुपर ३० नावाच्या संस्थेबद्दल खोट्या बातम्या या पेपरने छापल्या आहेत.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Nag, Tirthankar; Basu, Rituparna; Dasgupta, Buroshiva (2017-01-01). "Dainik Jagran: sustaining leadership in the newspaper industry". Emerald Emerging Markets Case Studies. 7 (1): 1–36. doi:10.1108/EEMCS-05-2016-0083. ISSN 2045-0621.
  2. ^ Agal, Renu (2020-02-26). "Jagran ignores Delhi violence, Ujala leads with it — a look at front pages of Hindi press". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2022-07-09 रोजी पाहिले.
  3. ^ a b David, Supriti. "How Dainik Jagran and TOI's Lucknow editions ignored the Hathras rape". Newslaundry. 2022-07-09 रोजी पाहिले.
  4. ^ Tewary, Amarnath (2018-08-22). "Bihar Super-30 founder faces smear campaign" (इंग्रजी भाषेत). Patna. ISSN 0971-751X.