Jump to content

वत्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे

वत्स हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.

प्रदेश[संपादन]

वत्स राज्य हे यमुनेच्या खोऱ्यात व अलाहाबादच्या परिसरात होते. कोसाम, कौशाली किंवा कौशांबी ही याची राजधानी होती.

राजे व राज्यकर्ते[संपादन]

उदयन हा राजा याठिकाणी राज्य करीत होता. यौगंधरायण हा मुत्सद्दी मंत्री उदयनच्या दरबारात होता. उदयनने काशी, बंगालकलिंगचे राज्य जिंकून घेतलेले होते.

उदयन राजाविषयी कथा[संपादन]

उदयन हा पराक्रमी राजा होता. त्याचा राजकीय प्रभाव अवंतीच्या चंडप्रद्योताला सहन झाला नाही. उदयनला नामोहरम करण्याचे चंडप्रद्योताचे सगळे प्रयत्न अयशस्वी झाले. उदयन राजाला रानटी हत्ती माणसाळविण्याची कला अवगत होती. ती आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून चंडप्रद्योताने लाकडी हत्तीमध्ये सैन्य पाठवून विश्वासघाताने उदयनला कैद केले. मात्र शेवटी आपली मुलगी वासवदत्ता ही उदयनला दिली. अशी कथा बौद्ध ग्रंथात व भासाच्या प्रतिज्ञायौगंधरायण व स्वप्नवासवदत्ता या संस्कृत नाटकात वर्णिलेली आहे.

संकिर्ण[संपादन]

उदयन हा बौद्ध धर्माभिमानी होता आणि त्याने धर्मप्रसारासाठी प्रयत्नही केले. शेवटी वत्स राज्य मगधाने जिंकून घेतले.