Jump to content

विश्वासबुवा कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विश्वासबुवा कुलकर्णी हे एक मराठी कीर्तनकार आहेत. धार्मिक विषयांखेरीज त्यांची ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवरील कीर्तनेही लोक आवडीने ऐकतात. विविध ठिकाणच्या कीर्तन महोत्सवांमध्ये त्यांचा सक्रिय आणि काही वेळा एकल सहभाग असतो. त्यांची कीर्तने नेहमीच नावीन्यपूर्ण असतात.

जानेवारी २०१५मध्ये त्यांनी निगडी प्राधिकरणात भरलेल्या विशाल हिंदू संमेलनात केलेल्या कीर्तनांचे विषय होते :

  1. क्रांतिवीर चापेकर बंधू
  2. क्रांतिचेतना राणी चेन्नमा
  3. क्रांतिज्वाला झाशीची राणी
  4. धर्मसूर्य स्वामी विवेकानंद
  5. धर्मशिरोमणी आद्य शंकराचार्य
  6. धर्मवीर संभाजी महाराज, वगैरे.

त्याआधीच्या महिन्यात त्याच्या कीर्तनाचा विषय ’संत-समाज-सृष्टी या विषयावर आणि पर्यावरण पूरक जीवन शैलीविषयी वेदग्रंथांतून प्रकट झालेले आणि संत मंडळींनी व्यक्त केलेले विचार’ असा होता.