Jump to content

गेर नृत्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गेर नृत्य हा सातपुडा पर्वतरांगांच्या परिसरात, महाराष्ट्रगुजरात यांच्या सीमाभागात राहणाऱ्या आदिवासी पावरा समाजात प्रचलित असलेला नृत्यप्रकार आहे. गेर होळीच्या निमित्ताने केले जाते.

नृत्य

[संपादन]

होळीच्या आधी १५ दिवसांपासून गेर नृत्याच्या तयारीस सुरुवात होते. या नृत्यातील लागणारी सामग्री रानातूनच जमा करावी लागते. नृत्यात सहभागी होणारे लोक घर सोडून गावात सराव करायला सोयीच्या मोकळ्या जागेवर जमा होतात व सुमारे १५ दिवस नृत्याचा सराव करतात.

या नृत्यात वाजंत्री, देखरेख करणारे, पूजन करणारे, संरक्षण करणारे, नाचणारे अशी माणसे असतात. यात राय, बावा बूद्या,वन्य प्राणी,चेटकीन वा काली इत्यादींचा समावेश असतो. जवळपास २० ते २५० लोकांचा समूह नाच सादर करतो. एकाच गावातील वा जवळपासच्या अनेक गावांतील लोक अश्या नाचात सहभाग घेतात.

वन्य प्राणी

[संपादन]

वन्यप्राणी वेषत अस्वल, वाघ इत्यादी प्राणी असतात. यांना नाचण्याचे बंधन नसते, हे लोक लोकांचे मनोरंजन करतात व आपल्या संघाचे रक्षण करतात.

चेटकीन वा काली

[संपादन]

प्रत्येक संघात एक चेटकीन असते. तोंड व संपूर्ण अंग काळ्या रंगाने रंगवलेला माणूस ही भूमिका करतो. त्याच्या हातात सूप व लाकडी पडी (मोठा चमचा)असतो. ह्यामुळे आपल्या संघाला कोणाची नजर लागत नाही. आपल्या संघाचे रक्षणाची जबाबदारी यांच्यावरसुद्धा असते.