Jump to content

तारपा नृत्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वारली चित्रपट्टीतील तारपा नृत्य

वारली आदिवासी जनजातीचे हे पारंपरिक नृत्य आहे.[]तारपा हे गारुड्याच्या पुंगीसारखे []असणारे वाद्य वाजविणारा वादक जेव्हा आपली लय बदलतो त्यावेळी या नृत्याची लयही बदलते असे या नृत्याचे स्वरूप आहे.[]


दादरा आणि नगरहवेली प्रांतातील वारली आदिवासींमध्ये हे नृत्य विशेष प्रचलित आहे.[]

तारपा वाद्य

[संपादन]

तारपा हे वाद्य नारनदेव या देवतेने वारली जनजातीला दिले अशी या जनजातीत समजूत प्रचलित आहे.वाळवलेल्या भोपळ्यापासून हे वाद्य तयार करतात.[]

सादरीकरण

[संपादन]

भाद्रपद वद्य द्वादशीच्या आसपास तांदुळाचे नवीन पीक हाती यायला लागल्यावर हे नृत्य सामान्यपणे केले जाते.या नृत्याचा शेतीशी व सुगीच्या आनंदाशी संबंध मानला जातो []. सामान्यतः रात्रीच्या जेवणानंतर हे नृत्य केले जाते.यामध्ये मध्यभागी तारपा वादक असून त्याच्याभोवती पुरुष वर्तुळात नाचतात.त्या वर्तुळाच्या बाहेर महिला एकमेकींच्या कमरेत हात घालून आणखी एक वर्तुळ करून नाचतात.[]






संदर्भ

[संपादन]
  1. Prasad, R. R. (1996). Encyclopaedic Profile of Indian Tribes (इंग्रजी भाषेत). Discovery Publishing House. ISBN 9788171412983.
  2. Warli paintings (इंग्रजी भाषेत). Shrividya Prakashan. 2006.
  3. Prasad, R. R. (1996). Encyclopaedic Profile of Indian Tribes (इंग्रजी भाषेत). Discovery Publishing House. ISBN 9788171412983.
  4. Gajrani, S. (2004). History, Religion and Culture of India (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 9788182050624.
  5. Tribhuwan, Robin D.; Finkenauer, Maike (2003). Threads Together: A Comparative Study of Tribal and Pre-historic Rock Paintings (इंग्रजी भाषेत). Discovery Publishing House. ISBN 9788171416448.
  6. Warli paintings (इंग्रजी भाषेत). Shrividya Prakashan. 2006.
  7. Tribhuwan, Robin D.; Finkenauer, Maike (2003). Threads Together: A Comparative Study of Tribal and Pre-historic Rock Paintings (इंग्रजी भाषेत). Discovery Publishing House. ISBN 9788171416448.