शिव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आदिनाथ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
शिव
Shiva and Parvati.jpg
शिव व पार्वती यांचे मध्ययुगीन लघुचित्र
मराठी शिव 6313
निवासस्थान कैलास, स्मशान
लोक शैव
वाहन नंदी
शस्त्र त्रिशूळ
वडील अज्ञात
आई अज्ञात
पत्नी सती, पार्वती, गौरी, उमावती
अपत्ये कार्तिकेय, गणपती,अशोक्सुन्दरी.
अन्य नावे/ नामांतरे महादेव, उमापती, भोलेनाथ, ईश्वर, उमेश, गंगाधर, त्रिनेत्र, त्र्यंबक, नीलकंठ, महेश, रुद्र, शंकर, शंभू, शूलपाणि, सदाशिव, सांब, गौरीहर, दीनानाथ,khandoba,
या देवतेचे अवतार खंडोबा, ज्योतिबा
या अवताराची मुख्य देवता महादेव, कालभैरव, हनुमान, अर्धनारीश्वर, दत्तात्रेय
मंत्र ॐ नमः शिवाय !
नामोल्लेख लिंग पुराण
तीर्थक्षेत्रे १२ ज्योतिर्लिंग ( भारतातील ),
बंगलोर संग्रहालय येथील शिव पार्वती मूर्ती

शिव हा हिंदू धर्मातील देवांचे देव आहे. तसेच संपूर्ण सृष्टी शिवापासुन उत्पन्न झाली आहे. शिव ब्रह्मा, विष्णू यांच्यासह त्रिमूर्तींतील एक देव मानला जातो. वेदांमध्ये त्यांचा 'रुद्र' या नावाने उल्लेख केला आहे. ‘शिव हा तत्त्वरूपाने निर्गुण रूपात आहे, तर त्या तत्त्वाची ध्यान ही सगुण रूपातील स्थिती आहे. भगवान शिव बहुतेक सर्व चित्रांमध्ये योग्याच्या रूपात चित्रित आहेत आणि त्यांची पूजा लिंगाच्या स्वरूपात केली जाते. उत्पत्ती-लय क्षमता, शांत-क्रोधी, चंद्र (शीतलता)-तिसरा डोळा (भस्म करणारे तेज)

''शिव' हे संपूर्ण सृष्टीचे करता - धरता आहेत. हिंदू धर्मातील ३३ कोटी देवांचे ते देव' मानले गेले आहेत. ते एक वैरागी पुरुष तसेच सिद्ध योगीपुरुष असून त्यांची उत्पत्ती कशी किंवा कुठून झाली आहे हे अजूनही कळू शकलेले नाही. त्यांना अनादी आदीपुरुष मानले गेले आहे. हे हिंदू धर्मातील प्रमुख, परम आणि सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांच्याजवळ त्रिशूळ आहे ज्याचा अर्थ शिव हे अस्त्र - शस्त्र आदींचे ज्ञाता असून मान्यता आहे कि, जेव्हा शिवाची उत्पत्ती झाली तेव्हा त्यांच्यासोबत रज, तम् आणि सत यांची उत्पत्ती झाली ते म्हणजे त्रिशुळाचे प्रतीक, वाद्य डमरू हे शिवाचे तांडव नृत्याचे अविष्कार दर्शवते. शिवाच्या गळ्यात नाग आहे. त्यामागची कथा अशी कि, पुराणामध्ये जेव्हा नागांचे साम्राज्य होते आणि त्यासोबत सागर मंथन वेळेस समुद्रातून अमृत मिळवण्यासाठी वासुकी नागाला रस्सी म्हणून वापरले गेले होते, त्यावेळेस समुद्रातून फार अश्या गोष्टी निघत होत्या कि ज्याकाही गोष्टी निघणार त्यांचा स्वीकार कोणीतरी करायचा होता, त्यामध्ये अशा बऱ्याच वस्तू श्री विष्णूंनी स्वीकारल्या, परंतु जेव्हा त्यामधून विष बाहेर आले तेव्हा ते विष घेण्यासाठी कुणीच पुढे येत नव्हतं, कारण ह्या विषाचा एकही थेंब जर धरतीवर पडला तर संपूर्ण सृष्टीला ते घातक झाले असते म्हणून ते विष शिवाने प्राशन केले. ते पिताच शिवाच्या अंगात दाहकता वाढली आणि त्यांचे कंठ काळे-निळे झाले. ती दाहकता नष्ट करण्यासाठी सगळ्या देवांनी त्याचबरोबर राक्षसांनी शिवाला फार गोष्टी देऊ केल्या पण दाहकता काही कमी होईना. त्यावेळेस हे वासुकी नाग ( शेषनाग यांच्यानंतरचे नाग लोकांतील राजा ) श्री विष्णूंनी शिवाचे कंठाची दाहकता कमी होण्यासाठी दिले, तेव्हा शिवाची अंगाची आग शांत झाली आणि त्याचबरोबर शिवाला हे प्रिय झाले आणि श्री विष्णूनी शिवाला " नीलकंठ " हे नाव प्रदान केले.शिव हे भोळ्या आणि सहज कुणालाही मागेल ते वर देणाऱ्या स्वभावाचे आहेत म्हणून संपूर्ण हिंदू देवतांमध्ये शिवाकडे राक्षसहि मोठ्या आशेने वर मागतात आणि हे शिव सहजगत्या देऊन हि जातात. म्हणूनच शिवाला भोलेनाथ नाव आहे. त्याचबरोबर शिवाचे खरे वास्तव्य हे स्मशानात आहे आणि ते स्वतः वैरागी स्वरूपात त्या प्रेतांचे भस्म आपल्या सर्वांगी ओढून घेतात.

शारीरिक आणि भौतिक वैशिष्ट्ये[संपादन]

राखाडी रंग[संपादन]

शिवाचा रंग कर्पूरासारखा (कापरासारखा) पांढरा आहे; म्हणून त्याला `कर्पूरगौर' असेही म्हणतात. मूळ पांढर्‍या रंगातील स्पंदने साधकाला सहन होणार नाहीत; म्हणून राखाडी रंगाचे आवरण शिवाच्या शरीरावर असते. हे राखाडी रंगाचे आवरण म्हणजे चिताभस्म असते. शिवाला रोज नवीन चिताभस्म लागते.

गंगा[संपादन]

जी (स्नानकर्त्या जिवाला) भगवत्पदाप्रत पोहोचवते ती गंगा’. ही गंगा स्वर्गात होती. भगीरथाच्या कठोर तपश्‍चर्येमुळे ती पृथ्वीवर आली. त्या वेळी गंगेच्या प्रवाहाचा भयानक वेग अन्य कोणीही थोपवू शकत नव्हता म्हणून शंकराने गंगेला आपल्या जटेत धारण केले, म्हणून शिवाला गंगाधर असे म्हणतात.

चंद्र[संपादन]

शिवाने भाली, म्हणजे कपाळी चंद्र धारण केला आहे. चंद्रमा ही क्षमाशीलता, ममता आणि वात्सल्य या तीन गुणांची एकत्रित अशी अवस्था आहे.

नाग[संपादन]

शिवाने हलाहल हे समुद्रमंथनामधून निघालेले विष प्राशन केले; या विषाचा दाह कमी व्हावा यासाठी वासुकी नाग शिवाने धारण केला. नागाला शिवाचे आयुधही समजले जाते, यामुळे शिवाला नागेंद्र असे संबोधले जाते.

तिसरा डोळा[संपादन]

शिवाचा कपाळावर भुवयांच्या मध्ये जरा वर ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा आहे. हा डोळा तेजतत्त्वाचे प्रतीक आहे. शंकर त्रिनेत्र आहे, म्हणजे तो भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या त्रिकाळातील घटना पाहू शकतो. असे मानले जाते कि जर महादेवाचा तिसरा डोळा उघडला तर समोरचे सर्व काही राख होत असे.

व्याघ्रांबर[संपादन]

वाघ हा रज-तमांचे प्रतीक आहे. अशा वाघाला (रज-तमांना) मारून शिवाने त्याचे आसन केले आहे.

गजचर्म[संपादन]

शिवाने गजचर्मसुद्धा परिधान केले आहे, म्हणून त्याला पशुपती असे म्हणतात.

आध्यात्मिक वैशिष्ट्ये[संपादन]

चांगुलपणा[संपादन]

शंकर हे भोलेनाथच्या नावाने ओळखले जातात. त्यांनी ब्रह्मदेवाची कन्या म्हणजे गंगा आणि महाविष्णूच्या पायाखालची वाहणारी गंगा आपल्या जटांमध्ये धारण केली आहे.

महातपस्वी आणि महायोगी[संपादन]

सतत ध्यानात असणारा शिव हा एकच देव आहे. हा नेहमी बंध-मुद्रा करून आसनस्थ असतो.

वैरागी[संपादन]

ज्याचे चित्त अविकारी आहे असा शिव खरा जितेंद्रिय होय.

दुसर्‍याच्या सुखासाठी कोणताही त्रास भोगण्यास सिद्ध (तयार) असलेला[संपादन]

समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले हलाहल विष सर्व जगाला जाळीत होते. त्या वेळी शिवाने हलाहल विष प्राशन केले आणि जगाला विनाशापासून वाचविले.

महाकालीचा आवेग शांत करणारा[संपादन]

राक्षसांचा संहार करतांना महाकाली सुसाट वादळासारखी भयंकर झाली. तिला आवरणे असंभव झाले तेव्हा शंकराने प्रेतरूप घेतले आणि तिच्या कालनृत्याच्या वाटेत ते शिवाचे शव पडले. राक्षसांची प्रेते तुडवीत ती कालरात्री शंकराच्या शवावर आली. त्या शवाचा स्पर्श होताच कालरात्रीच्या नृत्याचे भयंकर वादळ शांत झाले आणि तिचा आवेग शांत झाला.

भुतांचा स्वामी[संपादन]

शिव हा भुतांचा स्वामी असल्याने शिवोपासकांस भूतबाधा बहुधा होत नाही.

देव आणि दानव दोघेही उपासक असलेला[संपादन]

स्वतः श्रीविष्णू हे शिवाचे उपासक आहेत. केवळ देवच नाही, तर बाणासुर, रावण इत्यादी दानवही शिवाचे उपासक आहेत.

परिवार[संपादन]

शिवाच्या परिवारात पत्‍नी पार्वती, पुत्र कार्तिकेय व गणपती, व पुत्री अशोकसुंदरी तसेच शिवगण, शिवाचे वाहन नंदी आदींचा समावेश आहे.

शिवाला प्रिय असणारे[संपादन]

शिव हे वैरागी पुरुष असल्यामुळे ते चैनीच्या आणि आनंदाच्या गोष्टीत रस ठेवत नाही. दान, सहजता, त्याग ह्या गोष्टी शिवाकडे मिळतात. शिव सगळ्यांना मुक्त हस्ताने देतात. त्यामुळेच त्यांना देवांचे देव म्हंटले गेले आहे. श्री ब्रह्म आणि श्री विष्णूंनी शिवाला आपल्याहून श्रेष्ठ ठरवण्यासाठी फार युक्त्या केल्या, पण शिवाचे श्रेष्ठत्व त्याहून अधिक वाढत गेले. शिवाला भस्म, बिल्वपत्र ( बेल ), रुद्राक्ष, भांग, चिलीम, पांढरे फुल अश्या गोष्टीच प्रिय आहेत.

शिवाचे भारतातील महत्वाचे बारा ज्योतिर्लिंगाचे स्थान[संपादन]

देवांचे देव महादेव यांनी भक्तांना वेळोवेळी आपले दर्शन दिले आणि जेथे - तेथे आपल्या भक्तांच्या आग्रहास्तव नैसर्गिक लिंग स्वरूपात बारा ठिकाणी ठाण मांडले, त्यालाच " ज्योतिर्लिंग " म्हणून ओळखले जाते. संपूर्ण भारतात अवघ्या महाराष्ट्रातच शिवाचे पाच ज्योतिर्लिंग स्थापित आहे. ह्या प्रत्येक ज्योतिर्लिंगासोबत शिवाची एक एक आख्यायिका आहे.

१. श्री सोमनाथ, सोरटी ( गुजरात )

२. श्री मल्लिकार्जुन, श्री शैलम ( आंध्र प्रदेश )

३. श्री महाकालेश्वर, उज्जैन ( मध्यप्रदेश )

४. श्री ओंकारेश्वर, शिवपुरी ( मध्यप्रदेश )

५. श्री वैद्यनाथ, परळी ( महाराष्ट्र )

६. श्री औंढ नागनाथ, हिंगोली / परभणी ( महाराष्ट्र )

७. श्री केदारेश्वर, केदारनाथ ( उत्तरांचल प्रदेश )

८. श्री त्र्यंबकेश्वर, नाशिक ( महाराष्ट्र )

९. श्री रामेश्वर, रामेश्वरम / सेतूबंधनं ( तामिळनाडू )

१०. श्री भीमाशंकर, डाकिनी / पुणे ( महाराष्ट्र )

११. श्री विश्वेश्वर, वाराणसी ( उत्तरप्रदेश )

१२. श्री घृष्णेश्वर, वेरूळ / देवसरोवर ( महाराष्ट्र )


सर्वत्र पसरलेले इतर शिवलिंगे[संपादन]

दशरथेश्वर महादेव मंदिर ,मुखेड (महाराष्ट्र )
अजय अमहेश्वर, महेंद्रपर्वत अमरनाथ-काश्मीर एकलिंग-उदयपूर कंडारिया महादेव-खजुराहो
कपालेश्वर-क्रौंचपर्वत कुंभेश्वर-कुंभकोणम कुमारेश्वर-क्रौंचपर्वत गौरीशंकर-जबलपूर
तारकेश्वर-पश्चिम बंगाल पशुपतिनाथ-नेपाळ पक्षीतीर्थ-चेंगलपेट प्रतिज्ञेश्वर-क्रौंचपर्वत
बृहदीश्वर-तंजावर भुवनेश्वर-ओरिसा मध्यमेश्वर-काशी गोकर्ण महाबळेश्वर-महाराष्ट्र वाळकेश्वर-मुंबई
मुक्तपरमेश्वर-अरुणाचल वैद्यनाथ-कांगडा व्यासेश्वर-काशी सर्वेश्वर-चितोडगड
सुंदरेश्वर-मदुरा स्तंभेश्वर-चितोड हरीश्वर-मानस सरोवर हाटकेश्वर-बडनगरू

संदर्भ[संपादन]