Jump to content

चर्चा:अहिराणी बोलीभाषा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

− 2. डाँ सुधीर राजाराम देवरे : येथे जे डाँ रमेश सुर्यवंशी यांनी अहिराणी भाषेविषयी मते मांडले आहेत ते बहुतांश बरॉबर आहेत. त्यात संपादन करण्यासारखे मला काही वाटले नाही. अभ्यासकांनी; संशॉधकांनी या लेखनाचे संदर्भ द्यायला काहीच हरकत नाही. भाषा या महत्वाच्या आहेत. मग त्या कॉणत्याही असॉत. बॉली असॉत की र्पमाण भाषा असॉत. भाषा वाचवल्या पाहिजेत. मरू द्यायच्या नाहीत.

− − डाँ सुधीर देवरे


डाँ रमेश सुर्यवंशी यांचा उल्लेख

[संपादन]

@स्नेहल शेकटकर: विकिपीडियात संपादकांनी स्वत:ची व्यक्तीगत मते मांडायची नसतात हे बरोबर आहे. आपण संपादनातील बारकाव्यांकडे लक्ष देत आहात त्यामुळे मराठी विकिपीडियाला आपल्या रुपाने एक चांगला संपादक प्राप्त होतो आहे हि अभिनंदनीय बाब आहे. आपण संपादीत केलेला सदर लेखांशात डाँ रमेश सुर्यवंशी या विषयातले सुपरिचीत तज्ञ असूनही स्वत:चा स्वत:च्या संशोधनाचा स्वत: संदर्भ सर्व साधारण पणे अभिप्रेत नसते. असे झाले तर दुसऱ्या संपादकांकडून ते तपासले जावयास हवे. या दृष्टीने मी या विषयातील दुसरे सुपरिचीत तज्ञ डाँ सुधीर देवरे यांना पाचारण केले आणि त्यांनी लेख तपासून येथे चर्चा पानावर त्यांचा प्रतिसाद नोंदवला आहे आणि म्हणून औचित्याचा मुद्दा गौण होतो.

जिथ पर्यंत लेखन शैलीचा भाग आहे "रमेश सूर्यवंशी यांच्या मते, जुन्या खानदेश परिसरात म्हणजे अजिंठ्याचे डोंगर, सातपुड्याचे डोंगर, चांदवडचे डोंगर आणि वाघूर नदी या खोल खाणी-खदाणीत वास्तव्यास असलेले अहिर लोक अहिराणी बोलत." ह्यात डॉ. रमेश सूर्यवंशी यांचा तज्ञाचे संदर्भासहीत मत म्हणून सयूक्तीक आहे. जसे आपण न्यूटनचे अथवा आईनस्टाईनचे नाव घेऊन मत नोंदवू तसाच हाही उल्लेख समजता येतो. शिवाय ज्याच्या मताच त्याला श्रेय क्रेडीट देण हे अधीक प्रशस्त असतं आणि कॉपीराईट कायद्यानुसार सहसा तशी गरज सुद्धा असते. या विशीष्ट वाक्यात रमेश सूर्यवंशी यांचा उल्लेख नाही आला तर विशेष बिघडणार नाही कारण ओळीतील संदर्भात तो नोंदवल्यामुळे श्रेय उल्लेखाची या वाक्यापुरती फारशी चिंता नाही. पण "एका अभ्यासानुसार," हे जनरलायझेशन मात्र सहसा ज्ञानकोशीय लेखकांनी टाळायला हव. "एका अभ्यासानुसार," हे लेखकांना स्वत:ची व्यक्तीगत अथवा समसमीक्षीत नसलेली अथवा संदर्भ नसलेली मते घुसडण्याची संधी देऊ शकत. आपण इथे तस करत नाही आहात पण अशा मोघम वाक्य रचनेची नवागत वाचकांना सवय झाली तर नंतर संपादन करताना तेही तसेच करू लागण्याची शक्यता म्हणून "एका अभ्यासानुसार," असा उल्लेख शक्यतो टाळावा हि नम्र विनंती.

आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय वाचन लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:३९, ९ जुलै २०१४ (IST)[reply]

@माहितगार: धन्यवाद. आपले विवेचण माझ्यासाठी खुपच मोलाचे आहे. मी इथे नवीन असल्याने बऱ्याच गोष्टी अजुन शिकतो आहे. आपणांस वाटत असल्यास मी केलेले संपादन आपण कृपया उलटवावे.


आपल्या सहकार्यपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:१८, १० जुलै २०१४ (IST)[reply]
@स्नेहल शेकटकर: थोडेसे विषयांतर: माहितगार आणि Mahitgar ही दोन्हीही सदस्यखाती तांत्रिकदृष्ट्या व विकिकक्षेतही वेगवेगळी सदस्यखाती आहेत. 'माहितगार' नावाने असलेले सदस्सखाते 'Mahitgar' यांचेच असण्याची शक्यताही नाकारता येत नाही किंवा अन्य नावानेही त्यांनी वेळोवेळी वेगवेगळी सदस्यखाती वापरलेली असू शकतात. (अन्य कुणाही सदस्याच्या बाबतीतही असेच) पण ज्याला साद घालायची आहे त्या सदस्यापर्यंत साद-प्रतिसाद पोहोचण्यासाठी त्याच्या सदस्यखात्याचेच नाव साद साच्यात घालणे तांत्रिकतेचा आणि विकिकक्षेचा विचार करता महत्त्वाचे असते. सहीसाठी वापरलेली विकिसंज्ञा हेच सदस्यखात्याचे नाव असते असे नाही. साद साच्यात सदस्यखात्याचेच नाव आवश्यक अाहे. (हलकेच घ्यावे. आपण नवीन आहात व शिकता आहात असे आपल्या य़ेथील प्रतिसादावरुन कळाले. पुढील काळात आपल्याकडून अशी गल्लत होऊ नये म्हणून हा विषयांतराचा प्रपंच) संतोष दहिवळ (चर्चा) १०:४४, १० जुलै २०१४ (IST)[reply]

लेवा बोलीभाषा व अहिराणी बोलीभाषा या एकच नाहीत असे माझे मत आहे. अर्थात सध्या त्याला काही ठोस आधार लगेच देता येणार नाही. पण शोधत आहे. त्यांच्यात बरेच साम्य आहे पण त्या एकदुसऱ्याचा पर्याय नव्हेत.त्या एकाच क्षेत्रातील जरी असल्या तरीही त्यात फरक आहे.सापडल्यास लगेच नोंदवितो.लेवा भाषिक अहिराणी समजू शकतो व त्याउलट देखिल. पण त्या एक नव्हेत. असो.--वि. नरसीकर , (चर्चा) २१:३३, २२ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]