सुहास भालेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुहास भालेकर
जन्म ११ ऑक्टोबर, इ.स. १९३१
मृत्यू २ मार्च, इ.स. २०१३
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका)
भाषा मराठी

सुहास भालेकर (११ ऑक्टोबर, इ.स. १९३१ - २ मार्च, इ.स. २०१३; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी अभिनेते, दिग्दर्शक होते. यांनी मराठी नाटके, चित्रपट, दूरचित्रवाहिनी मालिका यांतून अभिनय केला.

कारकीर्द[संपादन]

सुहास भालेकरांनी कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. नाटकांत कामे करण्यास त्यांच्या वडिलांचा विरोध असल्यामुळे, त्यांनी सुरुवातीस साबाजी या नावाने [१] लोकनाट्यांतून कामे केली. इ.स. १९६०-७६ या कालखंडात [२] शाहीर साबळे आणि पार्टीच्या अनेक लोकनाट्यांमधून भालेकर आणि राजा मयेकर या अभिनेत्यांची जोडगोळी गाजली [३]. शाहीर साबळे आणि पार्टीच्या अनेक लोकनाट्यांचे दिग्दर्शन त्यांनी केले [३].

व्ही. शांतारामांच्या चानी चित्रपटाद्वारे भालेकरांचा चित्रपटक्षेत्रात प्रवेश झाला [४].

कारकीर्द[संपादन]

नाट्यकारकीर्द[संपादन]

सुहास भालेकर यांची नाटके/लोकनाट्ये आणि त्यातील भूमिका :

वर्ष (इ.स.) नाटक भाषा भूमिका/सहभाग टिप्पणी
अजब न्याय वर्तुळाचा मराठी अजबदास मूळ जर्मन नाटक ब्रेख्तचे द कॉकेशियन चॉक सर्कल
आतून कीर्तन वरून तमाशा मराठी
आंधळं दळतंय मराठी पाटीवाला लोकनाट्य
एकच प्याला मराठी तळीराम
एक तमाशा सुंदरसा मराठी सई परांजपे आणि लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेल नाटक
कशी काय वाट चुकलात मराठी लोकनाट्य
कोंडू हवालदार मराठी लोकनाट्य
तुझे आहे तुजपाशी मराठी वासूअण्णा
फुटपायरीचा सम्राट मराठी तुक्या
फुलाला सुगंध मातीचा मराठी गोविंदनाना
बापाचा बाप मराठी लोकनाट्य
बेबंदशाही मराठी खाशाबा
माकडाला चढली भांग मराठी
मी मंत्री झालो मराठी लखोबा
मृच्छकटिक मराठी मैत्रेय
लग्नाची बेडी मराठी गोकर्ण
सत्तेवरचे शहाणे मराठी पी.ए.
यमराज्यात एक रात्र मराठी लोकनाट्य

चित्रपट-कारकीर्द[संपादन]

सुहास भालेकर यांची भूमिका असलेले चित्रपट:

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा भूमिका टिप्पणी
चानी मराठी
इ.स. १९७६ शक हिंदी भालेकर आडनावाचा माणूस
इ.स. १९८० गहराई हिंदी
इ.स. १९८२ दोन बायका फजिती ऐका मराठी बाबूराव
इ.स. १९८४ सारांश हिंदी विश्वनाथ
इ.स. १९९८ चायना गेट हिंदी
अर्थ हिंदी
चक्र हिंदी
झुंज मराठी
नीलांबरी मराठी
लक्ष्मी मराठी
सुशीला मराठी

दूरचित्रवाणी-कारकीर्द[संपादन]

वर्ष (इ.स.) कार्यक्रम भाषा भूमिका/सहभाग टिप्पणी
इ.स. २००८ असंभव मराठी सोपानकाकाका
भाकरी आणि फूल मराठी
सुहास भालेकर यांचे दिग्दर्शन
  • शाहीर साबळे करीत असलेल्या लोकनाट्यांचे दिग्दर्शन बहुतेक वेळा सुहास भालेकर यांचे असे.


मृत्यू[संपादन]

२ मार्च, इ.स. २०१३ रोजी मुंबईतल्या बाँबे हॉस्पिटल येथे भालेकरांचा मृत्यू झाला [५]. फुप्फुसांच्या आजारामुळे त्यांना बाँबे हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते[५]. मृत्युसमयी ते ८३ वर्षांचे होते.

त्यांचा मुलगा हेमंत भालेकर हा अभिनेता आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "सुहास भालेकर काळाच्या पडद्याआड [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (मराठी मजकूर). प्रहार. २ मार्च, इ.स. २०१३. ३ मार्च, इ.स. २०१३ रोजी पाहिले.  Wikilink embedded in URL title (सहाय्य)
  2. ^ "सुहास भालेकर यांचं निधन [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (मराठी मजकूर). झी २४ तास. २ मार्च, इ.स. २०१३. ३ मार्च, इ.स. २०१३ रोजी पाहिले.  Wikilink embedded in URL title (सहाय्य)
  3. a b "ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भालेकर यांचे निधन" (मराठी मजकूर). लोकसत्ता. ३ मार्च, इ.स. २०१३. ३ मार्च, इ.स. २०१३ रोजी पाहिले. 
  4. ^ "सुहास भालेकर यांचे निधन" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाइम्स. ३ मार्च, इ.स. २०१३. ३ मार्च, इ.स. २०१३ रोजी पाहिले. 
  5. a b "सुहास भालेकर कालवश" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाइम्स. २ मार्च, इ.स. २०१३. ३ मार्च, इ.स. २०१३ रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.