Jump to content

मधुराणी गोखले-प्रभुलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मधुराणी प्रभुलकर या पानावरून पुनर्निर्देशित)
मधुराणी गोखले
जन्म मधुराणी गोखले
२ मार्च, १९८० (1980-03-02) (वय: ४४)
भुसावळ, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००० ते आजतागायत
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम आई कुठे काय करते!
वडील श्रीराम गोखले
पती
प्रमोद प्रभुलकर (ल. २००३)
अपत्ये स्वराली []

मधुराणी गोखले प्रभुलकर ह्या एक मराठी अभिनेत्री, गायिका आणि संगीतकार आहेत. सध्या त्या मराठी दूरचित्रवाहिनी स्टार प्रवाह वरील मालिका आई कुठे काय करते! मधील अरुंधतीच्या अभिनयासाठी ओळखल्या जात आहेत.[][]

मधुराणी प्रभुलकर यांचा जन्म भुसावळ येथे झाला तर पुढील शिक्षण आणि बालपण पुण्यात गेले. त्यांनी मराठी चित्रपट, मराठी दूरचित्रवाहिनी वरील मालिका आणि विविध जाहिरातीतून काम केलेले आहे.

कारकीर्द

[संपादन]

प्रभुलकर यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात वयाच्या सोळाव्या वर्षी सुरू केली असून त्यांनी स्वतः लिहिलेले आणि त्यांचीच निर्मिती असलेले नाटक 'सी-सॉ'ला सर्वोत्तम नाटकाचा 'पुरुषोत्तम करंडक' पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःचा चित्रपट निर्मिती अभ्यासक्रम सुरू केला. इ.स. २००३ मध्ये त्यांनी झी मराठी वरील 'इंद्रधनुष्य' या मालिकेत काम केले. त्याच साली त्यांनी 'गोडगुपित' या मराठी चित्रपटाची निर्मिती देखील केली आणि याच बरोबर 'तुमचं आमचं सेम असतं' आणि 'नवरा माझा नवसाचा' या मराठी चित्रपटात देखील भूमिका निभावली..[] इ.स. २००८ मध्ये प्रभुलकर यांनी झी मराठी दूरचित्रवाहिनी वरील 'सा रे गा मा पा' या सेलिब्रिटी शोमध्ये भाग घेऊन आपल्या गायन कौशल्याची चुणूक दाखवली. यामुळे त्यांना 'सुंदर माझे घर' या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

सध्या प्रभुलकर या स्टार प्रवाह दूरचित्रवाहिनी वरील आई कुठे काय करते! या मालिकेत डिसेंबर २०१९ पासून मुख्य भूमिका साकारत आहे.[][] []

अभिनय सूची

[संपादन]

चित्रपट

[संपादन]
वर्ष चित्रपट भूमिका नोंद
२००० लेकरु माधवी
२००४ नवरा माझा नवसाचा कँडी []
२००६ नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे टीव्ही होस्ट
२००९ सुंदर माझे घर गौरी []
२०१० मणी मंगळसूत्र गौरी [१०]
२०१६ जिथुन पडल्या गाठी अश्विनी बर्वे
२०१८ भाभीपीडिया श्रीमती बॅनर्जी [११]
२०१९ आरोहन अदिती

दूरचित्रवाहिनी

[संपादन]
वर्ष मालिका भूमिका
२००३ इंद्रधनुष्य श्रद्धा
२००७ यंदा कर्तव्य आहे होस्ट
हिच माझी मैत्रीण
२००८ सा रे ग म प: सेलिब्रिटी स्पेशल स्पर्धक
२००७-२००९ असंभव सहाय्यक भूमिका
२०१९ - वर्तमान आई कुठे काय करते! अरुंधती देशमुख[१२]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "आई कुठे काय करते : अरुंधतीच्या रिअल लाइफ मुलीविषयी माहितीये का? पाहा तिचे फोटो". २० सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "आपल्याला दुसरी बाजू माहीत नाही तर त्यावर बोलताच का? मधुराणी गोखले-प्रभुलकरचा प्रश्न". Maharashtra Times. 2021-01-19 रोजी पाहिले.
  3. ^ "Dhantadhan | 'आई कुठे काय करते!'च्या सेटवर घडलं काय? | ABP Majha". ABP Majha. 2021-01-19 रोजी पाहिले.
  4. ^ "Madhurani Gokhale-Prabhulkar movies, filmography, biography and songs - Cinestaan.com". Cinestaan. 2021-09-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-19 रोजी पाहिले.
  5. ^ "नवी मालिका, 'आई कुठे काय करते!'". झी २४ तास. 2019-12-23. 2020-12-13 रोजी पाहिले.
  6. ^ "Madhurani Gokhale-Prabhulkar movies, filmography, biography and songs - Cinestaan.com". Cinestaan. 2021-09-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-19 रोजी पाहिले.
  7. ^ "Madhurani Gokhale Prabhulkar gets nostalgic as she shares her school memories; says, "I'm proud to be a part of this frame" - The Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-01-19 रोजी पाहिले.
  8. ^ "Navra Maza Navsacha (2004) - Review, Star Cast, News, Photos". Cinestaan (इंग्रजी भाषेत). 2021-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-19 रोजी पाहिले.
  9. ^ "Sundar Mazhe Ghar". Marathi Movie World (इंग्रजी भाषेत). 2021-01-19 रोजी पाहिले.
  10. ^ "'Mani Mangalsutra' defines Man and Woman relationship". Marathi Movie World (इंग्रजी भाषेत). 2021-01-19 रोजी पाहिले.
  11. ^ "Bhabhi Pedia Cast List | Bhabhi Pedia Movie Star Cast | Release Date | Movie Trailer | Review- Bollywood Hungama" (इंग्रजी भाषेत). 2021-01-19 रोजी पाहिले.
  12. ^ "'आई कुठे काय करते!' मालिकेत होणार अनिरुद्ध-अरुंधतीचा विवाह सोहळा". महाराष्ट्र टाइम्स. 2021-01-19 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]