ऊर्मिला कोठारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऊर्मिला कानेटकर या पानावरून पुनर्निर्देशित)
ऊर्मिला कानेटकर कोठारे
जन्म ऊर्मिला कानेटकर
४ मे, १९८६ (1986-05-04) (वय: ३७)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट, दूरचित्रवाणी)
भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी
प्रमुख चित्रपट दुनियादारी
शुभमंगल सावधान
सावली
पती
Twitter icon.png UrmilaKothare

ऊर्मिला कानेटकर (जन्म : ४ मे १९८६) ह्या कथ्थक नर्तिका व मराठी अभिनेत्री आहेत.

जीवन[संपादन]

ऊर्मिला कानेटकर ह्यांचा जन्म महाराष्ट्रात पुणे येथे झाला. प्रसिद्ध कथ्थक गुरू आशा जोगळेकर यांच्याकडे त्यांनी कथ्थकचे शिक्षण घेतले. अभिनेते आदिनाथ कोठारे हे त्यांचे पती आहेत.

इ.स. १९९७ साली भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नवी दिल्ली येथे साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी आझादी की जंग हे बॅले नृत्य सादर केले गेले, त्यात ऊर्मिला कानेटकरांचा सहभाग होता.

ऊर्मिला या ओडिसी या नृत्यशैलीचे शिक्षणही सुजाता महापात्रा यांच्याकडून घेत आहेत.

इ.स. २००६ साली प्रदर्शित झालेल्या शुभमंगल सावधान या चित्रपटाद्वारे ऊर्मिलाचे मराठी रजतपटावर पदार्पण झाले. त्यानंतर इ.स. २००७ साली प्रदर्शित झालेल्या सावली या चित्रपटातही ऊर्मिलाने भूमिका केली आहे.

झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर दाखविल्या गेलेल्या असंभव (मालिका) या मालिकेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ’तुझ्याविना’ या दूरचित्रवाणीतही त्यांची मुख्य भूमिका आहे.

टीव्ही मालिका[संपादन]

मालिका भूमिका चॅनेल भाषा
मायका राजी झी टीव्ही हिंदी
मेरा ससुराल सहारा वन हिंदी
गोष्ट  एका  लग्नाची स्टार  प्रवाह मराठी
असंभव झी मराठी मराठी
वेग साम मराठी मराठी

मराठी चित्रपट

वर्ष चित्रपट भूमिका भाषा
२००६ शुभ मंगल सावधान मराठी
आई  शप्पथ ..! मराठी
सावली    मराठी
२०११ मला आई वह्हायचंय ! मराठी
२०१३ दुनियादारी मराठी
वेलकम  ओबामा मराठी
२०१४ टाइम पास मराठी
बावरे  प्रेम  हे ! मराठी
अनवट मराठी
प्यार वाली लव्ह स्टोरी   मराठी
२०१५ टाइम पास २ मराठी
२०१६ गुरू मराठी
२०१७ ती सध्या काय करते मराठी

बाह्य दुवे[संपादन]