Jump to content

गिनी-बिसाउ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गिनी-बिसाउ
República da Guiné-Bissau
गिनी-बिसाउचे प्रजासत्ताक
गिनी-बिसाउचा ध्वज गिनी-बिसाउचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Unidade, Luta, Progresso (पोर्तुगीज)
राष्ट्रगीत: Esta É a Nossa Pátria Bem Amada
(ही माझी प्रिय मातृभूमी आहे)
गिनी-बिसाउचे स्थान
गिनी-बिसाउचे स्थान
गिनी-बिसाउचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बिसाउ
अधिकृत भाषा पोर्तुगीज
सरकार प्रजासत्ताक
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २४ सप्टेंबर १९७३ (पोर्तुगालपासून
 - प्रजासत्ताक दिन १० सप्टेंबर १९७४ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३६,१२५ किमी (१३६वा क्रमांक)
 - पाणी (%) २२.४
लोकसंख्या
 -एकूण १६,४७,००० (१४८वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ४४.१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १.९२५ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १,११४ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.२८९ (कमी) (१६४ वा) (२००८)
राष्ट्रीय चलन पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रँक
आय.एस.ओ. ३१६६-१ GW
आंतरजाल प्रत्यय .gw
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २४५
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


गिनी-बिसाउचे प्रजासत्ताक (पोर्तुगीज: República da Guiné-Bissau) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. गिनी-बिसाउच्या उत्तरेस सेनेगाल, दक्षिण व पूर्वेस गिनी तर पश्चिमेस अटलांटिक महासागर आहेत. बिसाउ ही ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

ऐतिहासिक काळात मालीच्या साम्राज्याचा भाग असणारा गिनी-बिसाउ १९व्या शतकापासून पोर्तुगीजांची एक वसाहत होता. १९७४ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या देशाचे नाव गिनी ठेवण्यात आले व शेजारील गिनी देशापासून वेगळेपण राखण्यासाठी ह्या देशाच्या नावामध्ये बिसाउ हे राजधानीचे नाव जोडण्यात आले. स्वातंत्र्यानंतर गिनी-बिसाउचे राजकीय अस्तित्त्व अस्थिर राहिले आहे. लोकशाहीवादी सरकारे येथे सर्रास उलथवून टाकण्यात आली आहेत व लष्करी राजवट अनेकदा स्थापित केली गेली आहे. १२ एप्रिल २०१२ रोजी येथील लष्करी अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सत्ता हातात घेतली व विद्यमान राष्ट्राध्यक्ष व उमेदवारांना कैद केले.

इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे गिनी-बिसाउ गरीब व अविकसित आहे. मानवी विकास सूचक व दरडोई उत्पनामध्ये गिनी-बिसाउ जगात सर्वांत खालच्या क्रमांकांपैकी एक आहे. येथील राजकीय भाषा पोर्तुगीज असली तरीही केवळ १४ टक्के जनता पोर्तुगीज वापरते.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: