बदलापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  ?बदलापूर
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
गुणक: 19°10′01″N 73°14′22″E / 19.166867, 73.239391
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ३५.६८ चौ. किमी (१३.७८ चौ. मैल)
जिल्हा ठाणे
लोकसंख्या
घनता
 (२००४)
• /km² (/sq mi)
भाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड


• +९१-२५१
• एम.एच.-०५
संकेतस्थळ: www.badlapur.info
बदलापूर चिन्ह
बदलापूर चिन्ह

गुणक: 19°10′01″N 73°14′22″E / 19.166867, 73.239391 बदलापूर हे महाराष्ट्र राज्यातील एक निसर्गसौंदर्याने नटलेले शहर आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी किनारी वसलेल्या या शहराला कुळगाव-बदलापूर या नावाने सुद्धा ओळखले जाते. मुंबई शहराशी बदलापूर शहर मध्य उपनगरीय रेल्वेसेवेने जोडलेले असून, दक्षिणेस वांगणी तर उत्तरेस अंबरनाथ स्थानक आहे. मुळातले बदलापूर गाव हे बदलापूर रेल्वे स्थानकापासून जवळपास ५ किलोमीटर अंतरावर आहे. आज बदलापूर शहरात जुने बदलापूर गाव, कुळगाव, मांजर्ली, बेलवली, वालवली,वडावाली,कात्रप आणि अनेक छोट्या गावांचा समावेश आहे.

इतिहास[संपादन]

शिवाजी महाराजांच्या काळात बदलापूर हा सुरत मार्गे कोकण आणि गुजरात दरम्यान दळणवळणाचा मार्ग होता. उत्तम प्रजातींच्या घोड्यांसाठी हे शहर प्रसिद्ध होते. कोकण प्रदेशातल्या कठीण चढाईसाठी शिवाजी महाराजांचे योद्धे येथे घोडे बदलायचे. यावरूनच हे शहर बदलापूर या नावाने ओळखले जाऊ लागले. १९७१ साली उल्हासनगर तालुक्यातील या शहरात नगरपालिकेची स्थापना करण्यात आली.

आकर्षणे[संपादन]

बदलापु्र परीसरातील ६५.१५ मीटर उंचीचे बारवी धरण हे बदलापूर स्थानका पा्सून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर असलेले एक विशाल जलाशय स्त्रोत आहे. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड येथील औद्योगिक वसाहतींना या धरणातून पाणीपुरवठा केला जातो दरवर्षी बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २८०० ते ३००० मिमी. पावसाची नोंद होते. ब्यारेज आणि कुन्देश्वर ह्या धरणां व्यतिरीक्त बदलापूर स्थानकापासुन सुमारे ८ किलोमीटर अंतरावर चिखळोली धरण आहे, या धरणांच्या परिसरातील निसर्गामुळे छोट्या सहलीसाठी जवळपासच्या शहरांतून पर्यटक येथे येतात.

प्रमूख मंदिरे[संपादन]

विद्यापिठ प्राचीन कालीन शिवमंदिर (शांतिनगर),गणपती मंदिर (बदलापुर गांव),गांवदेवी मंदिर ,महालक्ष्मी मंदिर,दत्तमन्दिर,, श्रीराम मंदिर ,शिवमंदिर वाडावली तसेच बदलापुर मधील 4 तले 1) बदलापुर गांव 2)गाव देवी 3)शिवमंदिर वाडावली 4)महालक्ष्मी मंदिर

हॉस्पिटल[संपादन]

दुबे हॉस्पिटल,धन्वंतरी हॉस्पिटल,भगवती हॉस्पिटल,साईंकृपा हॉस्पिटल,

बदलापूर
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
अंबरनाथ
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
वांगणी
स्थानक क्रमांक: ३० मुंबई सीएसटीपासूनचे अंतर: ६८ कि.मी.