पखवाज
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
पखवाज (मराठी लेखनभेद: पखावज ;) हा भारतात, व दक्षिण आशियात प्रचलित असणारे दोन तोंडांचे ढोलवर्गीय तालवाद्य आहे. पखवाजास मृदंग, गोमुखी, पणवानाक अशा अन्य नावांनीही उल्लेखले जाते. हिंदुस्तानी संगीतातील ध्रुपद गायनपद्धतीत साथीच्या वाद्यांमध्ये पखवाज हमखास आढळणारे तालवाद्य आहे. गायनाच्या साथीसोबतच भारतातील शास्त्रीय नृत्यांच्या संगीतसाथीतही पखवाजाचे महत्त्वाचे स्थान असते.
पखवाजाच्या दोन तोंडांपैकी लहान तोँडाकडील बाजूस शाईपूड व मोठ्या बाजूला धुमपूड म्हणतात. पखवाजवादनाचे हिंदुस्तानी व कर्नाटकी अश्या दोन प्रमुख शैली मानल्या जातात.