पिनाकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पिनाकी हे आधुनिक व्हायोलिनचे मूळरूप आहे. याचा आकार धनुष्यासारखा असतो. याची दोन्ही टोके एका दोरीने बांधलेली असल्याने त्याचा आकार टिकून राहतो. याचे खालचे टोक एका भोपळ्यावर आधारलेले असते. याच्या दोन्ही टोकांना तांती बांधलेल्या असतात. त्यांच्या मध्यावर तांतीच्या खाली पावणे दोन बोटे लांबीची एक घोडी बसविलेली असते. स्वरस्थानकावर तांती दाबता याव्यात म्हणून ही बसविलेली असते.

धनुकलीने हे वाद्य वाजवितात. धनुकलीला घोड्याच्या शेपटीचे केस बांधतात. तिच्यावर राळ घासली की ती चांगली फिरते. खालचा भोपळा पायात धरतात. वरचे टोक खांद्यावर ठेवून डाव्या हाताने तांतीवर दाब देऊन हे वाद्य वाजवितात. याची माहिती के. वासुदेव शास्त्री यांच्या 'संगीत शास्त्र' (१९५८) या पुस्तकात मिळू शकते.