बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर (जन्म : इ.स. १८४९ - मृत्यू : १९२६) हे ख्याल गायकीत पारंगत असे ग्वाल्हेर घराण्याचे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गायक होते. महाराष्ट्रात ख्यालगायनाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे मिरजेच्या दरबारी राज गायक होते.

अनुक्रमणिका

[संपादन] पूर्वायुष्य

बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचा जन्म महाराष्ट्रात इचलकरंजी जवळ चंदूर येथे झाला. त्यांनी ख्याल गायकीचे शिक्षण पं. वासुदेवराव जोशी यांच्याकडे ग्वाल्हेर येथे घेतले. ग्वाल्हेर हे ठिकाण ख्याल शैलीतील हिंदुस्तानी संगीतासाठी तेव्हा सुप्रसिद्ध होते. तेथील शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी मिरज येथे हवामानाच्या अनुकूलतेमुळे आपले बस्तान बसविले. त्यानंतर लवकरच मिरज व त्या भोवतीचा भाग हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात पुढे आला व नंतर १०० वर्षांनीही ती परंपरा कायम राहिली आहे.

[संपादन] शिष्य

बाळकृष्णबुवांच्या शिष्यांत प्रमुखतः विष्णू दिगंबर पलुसकर, बाळकृष्णबुवांचे सुपुत्र अण्णाबुवा, अनंत मनोहर जोशी (अंतू-बुवा), मिराशी बुवा आणि वामनबुवा चाफेकर यांचा उल्लेख करावा लागेल. अण्णाबुवांचे बाळकृष्णबुवांच्या हयातीतच निधन झाले.

[संपादन] वारसा

सर्वसामान्य लोकांना शास्त्रीय संगीताची गोडी लावण्यात व त्याचा प्रसार करण्यात त्यांचे शिष्य पलुसकर बुवा यांचे योगदान मोठे आहे.

[संपादन] संदर्भ

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये