रामचंद्र गणेश कुंदगोळकर
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| रामचंद्र गणेश कुंदगोळकर | |
|---|---|
सवाई गंधर्व |
|
| उपाख्य | सवाई गंधर्व |
| आयुष्य | |
| जन्म | इ.स. १८८६ |
| जन्म स्थान | कुंदगोळ, धारवाड, कर्नाटक, भारत |
| मृत्यू | १२ सप्टेंबर इ.स. १९५२ |
| व्यक्तिगत माहिती | |
| नागरिकत्व | भारतीय |
| देश | |
| भाषा | मराठी, कन्नड |
| संगीत साधना | |
| गुरू | उस्ताद अब्दुल करीम खाँ |
| गायन प्रकार | हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, भजन, अभंग, |
| घराणे | किराणा घराणे |
| संगीत कारकीर्द | |
| पेशा | गायकी |
हिदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम शास्त्रीय गायक सवाई गंधर्व हे गंधर्व परंपरेतील एक होत. त्यांचे नाव रामभाऊ कुंदगोळकर (पूर्ण नाव : रामचंद्र गणेश कुंदगोळकर) होते.
रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी नसताना त्यांनी संगीतामध्ये रुची वाढविली आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ केला. तेथील अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामभाऊंनी एका नाटक कंपनीला सामील झाले आणि लवकरच मराठी रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. बालगंधर्व (उर्फ नारायण श्रीपाद राजहंस) यांच्याप्रमाणे त्यांनादेखील लोक सवाई गंधर्व या नावाने ओळखू लागले. त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे आज अजरामर झाली आहेत.
ख्यातनाम गुरू आणि मार्गदर्शक [संपादन]
व्यक्तीच्या गुणवत्तेचा खरा कस अनेक ठिकाणी लागतो, त्यातील सर्वाधिक उच्चदर्जाची कसोटी म्हणजे ती व्यक्ती इतरांमध्ये असलेल्या गुणवत्तेला कसे फुलविते आणि त्यांना कसा वाव देते तसेच मार्गदर्शन करते. सवाई गंधर्व या मूल्यांधारित कसोटीवर सर्वाधिक खरे उतरले आहेत. किराणा घराण्याची परंपरा यशस्वीरित्या पुढे नेणार्या आणि अधिकच उजळविणार्या त्यांनी मार्गदर्शन केलेल्या गायक/गायिका तसेच भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्र आज त्यांच्या ऋणी आहेत. यापैकी काही नावे म्हणजे पंडित भीमसेन जोशी, बसवराज राजगुरू, गंगूबाई हानगल, वगैरे. यापैकी पंडित भीमसेन जोशी यांनी त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे सुरु केला.