माणिक वर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माणिक वर्मा, पूर्वाश्रमीच्या माणिक दादरकर (१६ मे, इ.स. १९२६ - १० नोव्हेंबर, इ.स. १९९६) या हिंदुस्तानी संगीत व सुगम संगीत या संगीतप्रकारांत गायन करणाऱ्या मराठी गायिका होत्या. त्या हिंदुस्तानी संगीतातील किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत. मराठी भाषेतील गाजलेली भावगीते, नाट्यगीते व चित्रपटगीते त्यांनी गायली आहेत. किराणा घराण्याच्या गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्या हिंदुस्तानी संगीत शिकल्या. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल इ.स. १९७४ साली पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.

[संपादन] सांगीतिक कारकीर्द

गजानन दिगंबर माडगूळकर यांनी लिहिलेल्या व सुधीर फडके यांनी चाली बांधलेल्या गीतरामायणातील काही गाणी माणिक वर्मांच्या आवाजात होती. पुणे आकाशवाणी केंद्रावरून इ.स. १९५५ साली प्रसारित झालेल्या या साप्ताहिक संगीतकार्यक्रमात त्यांच्यासह सुधीर फडके, बबनराव नावडीकर, योगिनी जोगळेकर इत्यादी गायकांचा सहभाग होता.

[संपादन] वैयक्तिक जीवन

माणिकबाईंचा विवाह अमर वर्मा यांच्याशी झाला. राणी वर्मा, अरुणा जयप्रकाश, चित्रपट-अभिनेत्री भारती आचरेकर व नाट्य-चित्रपट-दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेत्री वंदना गुप्ते या त्यांच्या चार कन्या होत.

[संपादन] बाह्य दुवे



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये