रावण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
रामलीलेत रावणाची भूमिका करणारा कलाकार

रावण हा रामायण काळातील लंकेचा राजा होता. त्याला दशानन म्हणून ही ओळखतात. त्याला दहा तॊंड नव्हती कि वीस हात नव्हते. तो शरीराने सर्वसामान्य होता. ’रावण’ हे नाव त्याला शंकराने दिले. अनेकांनी त्याला आपल्या परीने श्रेष्ठ खलनायक म्हणून रेखाटण्याचा फार प्रयत्न केला. विश्वातले सर्व दुर्गण त्यात एकवटण्याचा प्रयत्न केला गेला आहे. खरे पाहता रावणाने रामाहून अधिक व श्रेष्ठ विद्या प्राप्त केली होती. तो कला, शास्त्र , विद्या, बल यांत रामाहून वरचढ होता. रावणाला चारही वेद आणि सहा उपनिषद याचे संपूर्ण ज्ञान होते. तो उत्तम आयुर्वेदाचार्य होता. वडिल विश्रवा ब्रम्हकुळातले तर माता कैकसी ही उच्च, दानव कुळातील होती.