ॲझोला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ॲझोलावरील मधमाशी
ॲझोला
विज्ञान आश्रमातील ॲझोला प्रकल्प

ॲझोला ही एक वनस्पती आहे. याचा पाला दुधाळ जनावरांसाठी उपयुक्त आहे. ॲझोला जलशैवाळासारखे दिसणारे तरंगते नेचे (fern) वर्गीय वनस्पती आहे. पशुपालनासाठी ॲझोला हे पीक महत्त्वाचे आहे. पशुपालनदुग्धव्यवसाय हे भारतातील तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शेतीरपूक व्यवसाय आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती व पशुसंवर्धनाचा मोठा वाटा आहे. अगदी पुरातनकालापासून शेतीला पशुसंवर्धनाची जोड आहे. आजच्या परिस्थितीत युवकांची वाढती बेरोजगारी, दुष्काळी परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील महिलापुरुष बचत गट यांना सुद्धा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय एकप्रकारे रोजगार निर्मितीचे साधन बनले आहे. परंतु या व्यवसायात दुभत्या जनावरांकडून अपेक्षित दूध उत्पादन मिळवण्यासाठी त्यांना संतुलित आहार देणे गरजेचे आहे. हिरवा चारा खाऊ घालणे ही दूध उत्पादन खर्च कमी करण्याची आणि उत्पन्न वाढवण्याची गुरूकेिली आहे. परंतु मागील वर्षी अगदी जूनपासुनच पावसाने पाठ फरवली आहे.[१]

पावसाळी पिकांबरोबरच चाऱ्याच्या पिकांचे उत्पादन धोक्यात आहे. अगोदरच आपल्याकडे असणारी जनावरांची संख्या आणि उपलब्ध चारा, वैरण यामध्ये खूप तफावत आहे. पशुखाद्याच्या किंमती पाहिल्या तर जास्त प्रमाणात पशुखाद्य देणे व्यवसायिकदृष्ट्या परवडत नाही.अशा परिस्थितीत उत्तम व्यवस्थापन करून कमीतकमी खर्चात अधिकाधिक दूध उत्पादन करणे आवश्यक आहे. यासाठी कमी खर्चात व चारा टंचाईत ॲझोलाचा जनावरांच्या आहारात वापर करता येईल. पशुखाद्यात ॲझोलाचा वापर केला तर असे खाद्य किफायतशीर व पौष्टिक बनते. दूध देणाऱ्या जनावरांना महागड्या खाद्याऐवजी ॲझोला खाऊ घातले तर दुधाची गुणवत्ता व प्रत वाढते. ॲझोला हे खाद्य पशुपालकास नेहमीच्या खाद्यापेक्षा खूप स्वस्त पडते.[१]

ॲझोला ही एक बहुगुणी चमत्कारिक वनस्पती आहे. तिचा प्रसार आणि लागवड वाढल्यास ती बहूपयोगी सिद्ध होऊ शकते.अवघे २ ते ३ सें.मी. आकाराची ही वनस्पती प्रचंड वेगाने वाढते. दर दोन दिवसांनी दुप्पट होण्याची क्रिया सतत सुरू असते.

दुधाळ जनावरांसाठी ॲझोला[संपादन]

जनावरांना सुलभतेने पचणारी उच्च प्रथिने आणि निम्न लीनिन (?) कंटेंटयुक्त ॲझोला अन्य घन आहारात मिसळून किंवा नुसताच जनावरांना देता येतो; हा कोंबड्या, शेळ्या, मेंढया, डुकरे आणि ससे यांनाही देता येते. अत्यंत सोपे, अल्पखर्चिक व किफायतशीर असे ॲझोलाचे उत्पादन शेतीस पूरक जोडधंदा म्हणूनदेखील उपयुक्त ठरू शकते. दुधाळ जनावरांवर केलेल्या प्रयोगावरून हे सिद्ध झाले आहे की, जेव्हा जनावरांना त्यांच्या रोजच्या खाद्यासोबत दीड ते दोन किलो ॲझोला दिला, तर दुधात दिवसाला दीड ते २ लिटर इतकी वाढ होते.[ संदर्भ हवा ] ॲझोला हे कोंबडीचेही खाद्यान्न आहे. जर बॉयलर कोंबडीला ॲझोला दिला, तर तिच्या अंडे देण्याच्या क्षमतेत वाढ होते.

ॲझोला काय आहे[संपादन]

ॲझोला हे जलशैवाळासारखे दिसणारे तरंगते शैवाल आहे. निळे–हिरवे शैवाळ हे पाण्यात मुक्तपणे तरंगलेल्या अवस्थेत आढळते. नत्र स्थिरीकरणाच्या गुणधर्मामुळे आणि नत्राच्या अधिक प्रमाणामुळे हिरवळीचे खत म्हणूनही याचा वापर होतो. पण नत्राबरोबरच या वनस्पतीत प्रथिने, जीवनसत्त्वे (अ आणि ब) असेच क्षारतत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. ॲझोलामध्ये प्रथिनेचे प्रमाण २५ ते ३० टक्के, १०-१५ टक्के खनिज व ७-१२ टक्के प्रमाणात अमिनो आम्ल असतात. याचप्रमाणे ॲझोलामध्ये पिष्ठमय पदार्थ व तेलाचे प्रमाण अत्यल्प आहे.

तक्ता
अ.क्र. जनावरांचा प्रकार त्याचे प्रमाण - प्रतिजनावर प्रतिदिवस
गायम्हैस (दीड ते दोन किलो)
शेळीमेंढी (३०० ते ४०० ग्रॅम)
कोंबडी (२० ते ३० ग्रॅम)

ॲझोलाची गादी तयार करणे[संपादन]

ॲझोलाची गादी तयार करण्यासाठी ॲझोलाची एक जात, १ किलो शेण, ssp खत, मिनरल मिक्स्चर, इत्यादी साहित्य आवश्यक आहे. तसेच फावडे, कुदळ, घमेले, प्लास्टिक कागद, शेडनेट, बादली, इत्यादी साधनेही आवश्यक आहेत.

कृती

 1. ॲझोलाची गादी तयार करण्यासाठी पहिल्यांदा जमिनीचे मोजमाप करून घेणे.
 2. जिथे गादी तयार करायची आहे तिथे आखणी करून घेणे.
 3. ठरलेल्या मापानुसार गादी खोदून घेणे. साधारण ठरलेले माप ७५×३×१ फूट असे खोदून घेणे.(गादीचा आकार = ७५×३×१ फूट, मिनरल मिक्स्चर = ९० ग्रॅम, ssp खत = ९० ग्रॅम, शेण खत = ९ किलो, माती = ९ किलो) असे प्रमाण प्रती गादी वापरले.
 4. गादीवर प्लास्टिक कागद अंथरल्यानंतर त्यात माती चाळून पसरून घेणे.
 5. त्यात शेणाचे पाणी ओतणे.
 6. गादी पाण्याने भरून घेणे.
 7. त्यामध्ये ssp खत मिक्स करून सोडणे.
 8. तसेच मिनरल मिक्स्चरच्या पावडरचे पाणी करून ओतणे .
 9. नंतर १ किलो ॲझोला धुऊन पाण्यावर पसरवणे.
 10. ॲझोला एकावर एक येणार नाही याची दक्षता घेणे.

चित्रदालन[संपादन]

ॲझोलातील पोषणमूल्ये[संपादन]

ॲझोला ही वनस्पती निळे-हिरवे शेवाळ या प्रकारात मोडते. निळेहिरवे शेवाळ हे पाण्यात मुक्तपणे तरंगणाऱ्या अवस्थेत आढळते. नत्र स्थिरीकरणाच्या गुणधर्मामुळे आणि नत्राच्या अधिक प्रमाणामुळे हिरवळीचे खत म्हणून देखील याचा वापर होतो.परंतु नत्राबरोबरच या वनस्पतीमध्ये प्रथिने, जीवनसत्त्व (अ आणि ब) तसेच क्षारतत्त्वे (कॅल्शिअम, स्फुरद, पलाश, लोह, तांबे व मॅग्रेशिअम) मुबलक प्रमाणात आढळतात. ॲझोलामध्ये प्रथिनांचे प्रमाण २५-३० टक्के, १०-१५ टक्के खनिजे व ७-१२ टक्के प्रमाणात अमिनो आम्ले असतात. याचप्रमाणे ॲझोलामध्ये पिष्टमय पदार्थ व तेलाचे प्रमाण अत्यल्प आहे. या वनस्पतीमधील प्रथिने व तंतुमय पदार्थ व लिम्मीनचे प्रमाण कमी असल्यामुळे ही वनस्पती बी- १२, कॅल्शिअम, लोह, मॅग्रेशिअम, तांबे, जस्त, बीटा कॅरोटीन या घटकांचे प्रमाणही चांगले असल्यामुळे दुग्धाच्या गुणवतेमध्ये वाढ होते.

ॲझोलाचे उत्पादन[संपादन]

ॲझोलाचे उत्पादन घेण्यासाठी झाडाच्या किंवा ५० टक्के शेडनेटच्या कृत्रिम सावलीमध्ये आपल्या गरजेनुसार वाफा तयार करावा. या वाफ्यावर १२o गेज सिलपोलीन प्लॅस्टिक कागद पसरून त्यावर पाण्यात ॲझोला कल्चर टाकावे. ५० टक्के शेडनेटचा वापर करून किंवा झाडाच्या सावलीमध्ये जमिनीत १० फूट लांब, ५ फूट रुंद व ९ इंच खोल या आकाराचा वाफा तयार करावा. यानंतर वाफ्याचा पृष्ठभाग समपातळीत करून घ्यावा. एका जनावराला दररोज दोन किलो या प्रमाणे ॲझोला खाऊ घालण्यासाठी असे दोन वाफे तयार करावे लागतील. झाडाच्या मुळ्या प्लॅस्टिक कागदमध्ये जाऊन कागद खराब होऊ नये, म्हणून खताच्या रिकाम्या गोण्यांचे आच्छादन वाफ्यामध्ये सर्व बाजूने टाकून यावरून प्लॅस्टिक कागद टाकावा. यानंतर प्लॅस्टिक कागदवरती सर्व कडांना विटांचा थर द्यावा. वाफ्यामध्ये पावसाचे व इतर पाणी जाऊ नये, यासाठी पर्यायी चर काढून घ्यावेत. अशातऱ्हेने वाफा तयार झाल्यावर त्यात १० ते १५ किलो चांगल्या सुपीक काळया मातीचा थर टाकावा. यानंतर १० लिटर पाण्यात ३ ते ४ किलो न कुजलेले ताजे शेण, ३० ते ४० ग्रेम सुपर फॉस्फेट व ४० ग्रॅम खनिज मिश्रण टाकून एकत्रित चांगले मिसळून घ्यावे व तयार झालेले एकजीव मिश्रण खडड्यात अंथरलेल्या मातीवर ओतावे.यानंतर ६.५ ते ७.५ टक्के सामु असलेले स्वच्छ पाणी वाफ्यामध्ये जवळपास चार इंच ते पाच इंच उंचीपर्यंत साठवावे. याप्रमाणे तयार केलेल्या वाफ्यात एक ते दोन किलो ताजे व शुद्ध ॲझोलाकल्चर टाकावे. स्वच्छ सूर्यप्रकाश, २० ते २८ अंश से. तपमान, ७० ते ८० टक्के आद्रता आणि ६.५ ते ७.५ टक्के सामू असलेल्या पाण्यात ॲझोलाची चांगली वाढ होते व योग्य उत्पादन मिळते. जास्त क्षार असलेल्या पाण्यामध्ये ॲझोलाची वाढ होत नाही, म्हणून काळजी घ्यावी.ॲझोलाचे उत्पादन ॲझोला वनस्पतीचे पुनरुत्पादन हे लैंगिक व अलैंगिक अशा दोन्ही प्रकारे होत असल्यामुळे पूर्णपणे वाफा तयार केल्यानंतर १०-१५ दिवसांत ॲझोलाची पूर्ण वाढ होऊन वाफा पूर्णपणे भरला जातो. वाफा पूर्णपणे भरल्यानंतर ३००-३५० ग्रॅम प्रति चौरस मीटर प्रति दिवस याप्रमाणात ॲझोलाचे उत्पादन मिळते. यानुसार एका वाफ्यातून १.५ ते २ किलो ॲझोलाचे उत्पादन घेऊ शकतो.[२]

ॲझोला वाफ्याचे व्यवस्थापन[संपादन]

 • ॲझोलाची वाढ चांगली ठेवण्यासाठी दर आठ दिवसांनी एकदा १ ते १.५ किलो ताजे शेण, ५० ग्रॅम खनिज मिश्रण व ३० ग्रॅम सुपरफॉस्फेट पाण्यात एकजीव करून टाकत राहावे.
 • दर १५ दिवसांनी वाफ्यातील २५ टक्के पाणी बदलून स्वच्छ पाणी ओतावे. नंतरच वरीलप्रमाणे मिश्रण पाण्यात मिसळावे दर २ महिन्यांनंतर वाफ्यातील ५० टक्के माती बद्दलून नवीन चांगली काळी माती टाकावी.
 • दर सहा महिन्यानंतर ॲझोलाचा वाफा स्वच्छ करावा. याप्रमाणे काळजी घेतली तर ॲझोलाचे चांगले उत्पादन मिळेल.
 • याचबरोबर वाफ्यातील पाण्याची पातळी चार ते पाच इंच उंचीपर्यंत कायम ठेवावी.
 • ॲझोलाचे रोगराई, किड, मुंग्यावाळवी इत्यादींपासून संरक्षण करावे. परंतु रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास नवीन कल्चर वापरून वाफा तयार करावा.
 • वाफ्यातील ॲझोलाचे कल्चर दर सहा महिन्यातून बदलत राहावे.
 • त्याप्रमाणे वाफ्यातून ॲझोला दररोज काढणे आवश्यक आहे. अन्यथा एकावर एक असे थर तयार होऊन रोग व किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

अनुमान[संपादन]

 1. प्रतिगादी दोन वेळा पाणी देऊन आठवड्यात ॲझोला गादी पूर्ण भरते.
 2. ॲझोला काढल्यास दोन-तीन दिवसात परत उगवतो.

निरीक्षण[संपादन]

 1. ॲझोला सावलीत असताना पोपटी रंगाचा दिसतो व मोठा झाल्यावर हिरवा-करड्या रंगाचा दिसतो.

ॲझोलाचे फायदे[संपादन]

 1. पशुखाद्याच्या खर्चात १५ ते २० टक्क्याची बचत
 2. जनावरांत गुणवत्ता वृद्धी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आरोग्य सुधारून आयुष्य वाढते .
 3. ॲझोलाच्या वापरामुळे फॅट, दूध व वजन यांत वाढ
 4. पक्षी (बदक, इमू, लव्ही आदी) खाद्यात मिश्रणस्वरूपात ॲझोलाचा वापर केल्यास मांसल कोंबडयांच्या वजनात वाढ
 5. अंडी देण्याच्या प्रमाण वाढ, तसेच अंड्याच्या पृष्ठभाग चकचकीत होतो.
 6. ॲझोलाच्या वाफ्यातून काढण्यात येणारे पाणी नत्रयुक्त व खजिनयुक्त असल्याने पिकांसाठी, झाडांसाठी वापरात येते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ a b शेती व पशुपालन-विज्ञान आश्रम
 2. ^ http://learningwhiledoing.in/