विज्ञान आश्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Vigyan Ashram 04
WORKSHOP OF VIGYAN ASHRAM

विज्ञान आश्रम (English: Vigyan Ashram[१]) पुणे जिल्ह्यातील पाबळ गावातील एक शैक्षणिक संस्था आहे. डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग हे या संस्थेचे संस्थापक आहे.ते हिंदुस्थान लिव्हर या प्रसिद्ध कंपनीच्या ‘इंजिनिअरिंग सायन्स’ विभागाचे प्रमुख होते. शिक्षण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी १९८३च्या सुमारास विज्ञान आश्रम सुरू केला. अनेक मुले, त्यांनी शाळा सोडली असली तरी, जीवनात यशस्वी होतात. ती काम करत करतच शिकतात. याचाच अर्थ काम करत करत शिकणे ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. समाजातील जास्तीत जास्त मुले अशा प्रकारे शिकत असतील तर शिकण्याची हीच मुख्य पद्धत हवी, या विचारातून डॉक्टरांनी विज्ञान आश्रमाची स्थापना केली. त्यांनी ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्याशी चर्चा केली. भारतातील एक प्रातिनिधिक खेडे म्हणून पाबळ हे खेडे निवडले आणि येथे हा आश्रम सुरू झाला. पुढे इथेच खर्‍या शिक्षणाचा इतिहास घडला.आश्रमाच्या शिक्षण पद्धतीमुळे, रूढार्थाने हुशार नसलेली अनेक मुले उद्योजक बनतात.डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग नंतर विज्ञान आश्रम हे मीरा कलबाग(अम्मा) म्हणजेच त्यांच्या पत्नी यांनी संभाळल.पण १८ मार्च २०१६ ला त्याचं निधन झाले.आता पूर्ण विज्ञान आश्रम हे डॉ.योगेश कुलकर्णी हे पाहतात.योगेश कुलकर्णी हे विज्ञान आश्रम चे कार्यकारी संचालक आहेत[२]

Vigyan Ashram 03

‘शिकायचे ते हाताने काम करतच’ हे आश्रमाचे मुख्य ब्रीद आहे. येथील अभ्यासक्रमात शेती-पशुपालन, अन्नप्रक्रिया, प्रयोगशाळेतील चाच्ण्या आदींचा समावेश असलेला गृह व आरोग्यज्ञान विभाग, फॅब्रिकेशन, बांधकाम, सुतारकाम आदींचा समावेश असलेला अभियांत्रिकी विभाग, तर सौरऊर्जा, जैविक तंत्रज्ञान, आदींचा समावेश असलेले ऊर्जा-पर्यावरण असे वेगवेगळे विभाग आहेत. ‘विज्ञान आश्रमा’तील विद्यार्थी तंत्रज्ञानावर आधारलेले विविध प्रकल्प प्रत्यक्ष काम करत शिकतात. सोलर दिवे तयार करणे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांसारखी तंत्रे वापरून शेती उत्पादन घेणे, बांधकामाची नवीन तंत्रे वापरून शिकणे, खाद्य पदार्थांची निर्मिती करणे आदी बाबी ते काम करता करता शिकतात. शिक्षण म्हणजे व्यवसाय शिक्षण आहे. मात्र, एखादे काम करताना विद्यार्थ्यांना त्याच्या अनुषंगाने विविध विषयांतील संकल्पनांची ओळख करून देण्यावर तेथे भर दिला जातो. उदाहरणार्थ, इलेक्ट्रिकल उपकरणांची दुरुस्ती करताना भौतिकशास्त्रातील संकल्पना शिकता येतात. शेतीत पीक घेताना जीवशास्त्र, गणित आदी अनेक विषयांतील कल्पना सहजपणे शिकता येतात. काम करता करता संकल्पना स्पष्ट करून शिकवले, की ते विद्यार्थ्यांना कंटाळवाणे वाटत नाही. नेहमीच्या पुस्तककेंद्री शिक्षणात ज्यांना रुची नाही आणि त्यामुळे जे शैक्षणिक प्रगती करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना घेऊन ‘विज्ञान आश्रमा’ने ही संकल्पना सिद्ध केली आहे. तेथून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले शेकडोजण स्वतःचे व्यवसाय करत आहेत.

विज्ञान आश्रम मधील शिक्षण पद्धती[संपादन]

विज्ञान आश्रमात विविध प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. झारखंड, गुजरात, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ अशा अनेक राज्यांतून मुले-मुली येथे शिकण्यासाठी येतात. अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

विज्ञान आणि तंत्रज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचे काम आश्रम गेली ३१ वर्षाहून अधिक काळ करत आहे.”शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास “हे ध्येय डोळ्यसमोर ठेऊन जानेवारी १९८३ मध्ये डॉ.श्रीनाथ कलबाग यांनी विज्ञान आश्रमची स्थापना केली.पुण्यातील ‘भारतीय शिक्षण संस्थाचे’विज्ञान आश्रम हे केंद्र आहे.Dept.Of Science and Technology(DST),’Asha For Education’अश्या अनेक संस्थाच्या आर्थिक सहकार्याने ’विज्ञान आश्रम’ आपला कार्यक्रम राबवत आहे.

विज्ञान आश्रमातील शिक्षण पद्ध्तिचे वैशिष्ट्ये:-

 1. प्रात्याक्षिक अनुभवातून ज्ञान प्राप्त होते.
 2. दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी शैक्षणिक दृष्टीने प्रशिक्षणार्थी तयार होतो.
 3. समाजाला उपलब्ध करून दिलेल्या सेवांसाठी समाजाकडून मोबदला मिळतो.
 4. शिकत असताना प्रशिक्षणार्थी कौक्षल्याची प्रभुत्व पातळी गाठतो.

ग्रामीण विकासाठी तंत्रज्ञान नवीन तंत्रज्ञाण्याचा वापर करून प्रगती करणे शक्य आहे.नवीन तंत्रज्ञानाने आपण विकासाची गती वाढवू शकतो. हे तंत्रज्ञान अगदी गावागावापर्यंत पोहचवण्यासाठी त्यावर आधारित उद्योग सुरु व्हायला हवेत. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर व शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार करण्याचा विज्ञान आश्रमाचा प्रयत्न आहे.

विज्ञान आश्रम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अभ्य्साक्रम घेतले जाते.

 1. अनौपचारिक शिक्षण कार्यक्रम
 2. औंपचारिक शाळांसाठी कार्यक्रम
 3. तंत्रज्ञान विकसन विभाग

DBRT(Diploma in Basic Rural Technology)[संपादन]

अनौपचारिक शिक्षण कार्यक्रम (DBRT):- हा दोन वर्षाचा अभ्यासक्रम असून त्यातील एक वर्ष पाबळला निवासी कोर्स व पुढील एक वर्ष प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात उमेदवारी असते. किमान ८ वी उत्तीर्ण असलेल्या कुठलाही विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. हा ‘नॅशनल इन्स्टीटुट ऑफ ओपन स्कूलिंग‘, नवी दिल्ली यांची मान्यता प्राप्त डिप्लोमा कोर्स प्रत्येक वर्षी १० जुलै ते २५ जून (३०० दिवस) या कालावधीमध्ये दररोज ८ तास याप्रमाणे शिकविला जातो. यामध्ये सुरवातीस सर्व विद्यार्थ्यांचे चार गट करून प्रत्येक गटाला चारही विभागांचे प्रशिक्षण तीन-तीन महिन्याच्या कालावधीमध्ये दिले जाते.

अ)अभियांत्रिकी:-

थिअरी- मापन ,कार्य ,उर्जा,मजबुतीचे प्रकार या विषयाच्या संकल्पना,साधी मशीन ,वंगण मटेरीअल(लोखंड ,लाकूड,सिमेंट ,माती)सदिश आणि आदिश राशी,कार्यक्षमता. प्रकल्प-फोल्डीग चेअर बनविणे,खोल्याचे बांधकाम करणे ,घराचे छप्पर बसविणे ,कोंबड्यांचे पिंजरे तयार करणे ,शेतीची अवजारे तयार करणे ,पाण्याची टाकी बनवणे , हातगाडी बनवणे , स्वच्छतागृह बनवणे , पोल्ट्रीसाठी ब्रुडर तयार करणे , कार्यशाळेतील साहित्य तयार करणे.उदा. बेंच व्हाईस, पाईप व्हाईस, सी क्लाम्प, हॅक सॉ, पुलर इत्यार्दी.

ब) उर्जा आणि पर्यावरण:

थिअरी – वीज, इलेक्ट्रोनिक, कंडक्टर, सेमी कंडक्टर, ओहामचा नियम, पॉवर, सर्किट्स, सिंगल फेज व थ्री फेज वीज पुरवठा, आय.सी.इंजिन, सौर उर्जा, पाण्याचे पंप व त्याचे प्रकार, पंपाची निवड, सेफ्टीक टॅक व बयोगॉस संयंत्र, लेवलिंग,कॉटूर, भूजल, नकाशे यांचा अभ्यास.

प्रकल्प :- वेल्डिंग मशीन बनवणे, घराची लाईट फिटिंग, डी.सी.ट्यूब सर्किट, डिझेल इंजिन दुरुस्ती, मोटार स्टेटिंग किट बनवणे, बॅटरी चार्जर बनवणे, पिठाच्या गिरणीची कार्यक्षमता मोजणे, कांडी कोळसा बनवणे, मशीन दुरुस्ती, मोटार रिवायडिंग, डिझेलसाठी पर्यायी इंधनाचा शोध घेणे (उदा. एरंड तेल, करंजे तेल), घरगुती उपकरणे दुरुस्ती, (उदा. मिक्सर, फॅन, इस्त्री, कुलर, हिटर), पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करून एक बंधारा बांधणे, विहरीसाठी जागा निवडणे, निर्धूर चूल बनवणे.प्रकल्प माहिती:- कांडी कोळसा बनवणे[३]

साहित्य:- नैसर्गिक कचरा(उदा. पालापाचोळा,झाडांच्या काड्या) काडीपेटी,मोठा पिंप(पत्र्याचा) धान्याचा कोंडा,पाणी.

कृती:- सर्वात प्रथम कचरा गोळा करून त्याचे वजन करावे.तो सगळा कचरा एकत्र करून घेतलेल्या पिंपामधे टाकून त्याला आग लावावी.तो सगळा कचरा अशा प्रकारे जाळावा कि तो फक्त ५०% जाळला गेला पाहिजे.त्या ठिकाणी त्याचे निरीक्षण करून तो कचरा व्यव्स्थित जाळला कि नाही ते पाहणे.तो कचरा थंड झाल्यावर तो काढून घेणे.त्या आलेल्या राखेतून फक्त carbon dioxide गोळा करून त्या मधे सम प्रमाणत कोंडा घेऊन त्याचे मिश्रण तयार करून त्याचे योग्य आकारात कोळसा तयार करणे. फोटो:-

क) शेती आणि पशुपालन:-

थिअरी – वनस्पती, प्राणी, पक्षी, आहार, वेगवेगळी खाते, कीटक, मातीचे प्रकार, कृत्रिम रेतन, जमाखर्च, अंदाजपत्रक, जनावरांसाठी रोग प्रतिबंधक, कोंबड्यांचे रोग व उपचार, बलन्सशीट, कॅश फ्लो, नफा – तोटा यांची माहिती घेणे, सिंचान पद्धत.

प्रकल्प – नर्सरीत रोप तयार करून विक्री करणे, कोणत्याही एका पिकाचा आढावा घेणे, हायड्रोपोनिक, बायोगॅसची वेगवेगळ्या घटकापासून निर्मिती, पोल्ट्रीमध्ये एक बॅच वाढवणे, डेरीतील व्यवहार एक महिना सांभाळणे, ए.आय सेन्टरमध्ये एक महिना जनावरांचा अभ्यास करणे, कारखान्यातील उप-उत्पादक घटकांचा जनावरांसाठी खाद्य म्हणून उपयोग याचा अभ्यास करणे, किचन वेस्टपासुन जनावरांचे खाद्य बनविणे.

ड)गृह व आरोग्य:-

थिअरी-स्वछता,आरोग्य,रोग पसरण्याची कारणे,रोग प्रतिबंधक,बालकाची वाढ व त्याच्या गरजा ,संतुलित आहार दास व माश्या ,जीन्स व वंशपरंपरा ,आरोग्य साधना ,योगासने,आपले शरीर .प्रकल्प- शिवणकाम व विणकाम या विषयाची प्राथमिक माहिती ,मुलांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण करणे,पाणी शुद्ध करणे,रक्तगट व HB चेक करणे,शाळेतील विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणे,माती परीक्षण ,वेगवेगळे मसाले व चटण्या तयार करणे ,बेकरी पदार्थ तयार करणे,आवल्यापासून विविध पदार्थ तयार करणे ,वेगवेगळी लोणचे बनवणे.

IBT(Introduction To basic Technology)[संपादन]

२)औंपचारिक शाळांसाठी कार्यक्रम (IBT):-

कृतिशीलता ,उद्योजकता,सृजनात्मक शक्तीचा विकास,आत्मविश्वास यासारखे गुण विकसित होण्यासाठी शालेय स्तरांपासून विद्यार्थ्यांनी ‘उत्पादक कामात’सहभागी झाले पाहिजे शालेय अभ्यासक्रम व जीवनाश्यक गोष्टीचे नाते असते.हे सर्व सध्या करण्यासाठी विज्ञान आश्रमाने IBT सुरु केला आहे .८ वी ते १० चे विद्यार्थी ‘हाताने काम करत शिकणे’या तत्वावर शिकतात S.S.C. बोर्डाची मान्यता असल्यामुळे हे कोणत्याही शाळेमध्ये राबवता येते.आठवड्यातील एक दिवस ह्या विषयासाठी द्यावा लागतो .अभ्यासक्रमातील प्रत्याशिके ,नवीन लोकपयोगी सेवा,नवीन तंत्रज्ञान ,अभियांत्रिकी आरेखन प्रकप्ल ई.विषयांवर प्रशिक्षण घेतले जाते .

चित्रदालन[संपादन]

फॅब लॅब (Digital Fabrication Labrotary)[संपादन]

Fab Lab logo
assembling 3D printer
विज्ञान आश्रम fab lab कार्यशाळेतील मुली

डॉ. नील ग्रेसेंफेल्ड, (डायरेक्टर, बिट्स आणि अणूंचे केंद्र, एमआयटी (यूएसए)) यांनी फॅब लॅब तयार केले, ते विज्ञान आश्रम 'फॅब लॅब - 0' म्हणून वर्णन केले.डॉ. कलबाग आणि डॉ. नील ग्रेसनफल्ड यांच्यात २००२ मध्ये व्हीए-फेब प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली. ही खोली ४० चौ.फूट खोलीत सुरु झाली.ग्रामीण समस्यांचे निवारण करण्यासाठी फॅब लॅब वापरास मात करण्यासाठी व्हीएने मंद आणि स्थिर प्रगती केली. फॅब प्रयोगशाळेत विकसित केलेल्या काही यशस्वी प्रोजेक्ट खालीलप्रमाणे आहेत:

LED lighting solution

Egg incubator

Precision Agri control devices

Sanitary incinerator

फॅब लॅब मधील मशीन:

१) Laser Cutting

२) Vinyl cutting

3) CNC – PCB milling

४) Plasma metal cutting

५) Electronics and micro processers

६) 3D printing & scanning

७) Traditional fabrication tools

fab lab फॅब लॅब म्हणजे डिजिटल फॅब्रिकेशनची प्रयोगशाळा. या प्रयोगशाळेत बर्‍याच गोष्टी तयार करणे सहज शक्य होते. ३डी प्रिंटर, लेझर कटर, प्लाझ्मा कटर, धातू कापण्याचे यंत्र, प्लॅस्टिक कापणारा vinyl cutter अशा प्रकारची अद्ययावत यंत्रे येथे आहेत.

Fablab vigyan ashram

अगदी साध्या मूलभूत गोष्टीपासून ते विक्रीयोग्य गोष्टी बनवण्याचे काम येथे चालते. आधुनिक तंत्रज्ञान शाळेतील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी फॅब लॅबमध्ये कार्यशाळा आयोजित केल्या जातात. येथील DBRTच्या मुलांनी संवाद साधणारा एक घुमट बनवला आहे.

विज्ञान आश्रम संवादी घुमट

फॅब लॅब कॅम्प सहभाग: आम्ही नियमितपणे नवीन कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळा आणि लहान शिबिरे आयोजित करत आहोत. अशा शिबिरासाठी नावनोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. आम्ही शिबिरे आयोजित करतो.शाळेतील मुलांसाठी / नवशिक्यांसाठी आरड्यूएनआयओ आधारित प्रकल्प अभियंत्यांकरिता डिजिटल फॅब्रिकेशन टूल्सचा वापर FabEd: शाळेतील मुलांसाठी / नवशिक्यांसाठी काम करणा-या प्रकल्पांना सर्व कल्पना साधने जाणून घ्या.शेड्यूल जाणून घेण्यासाठी, कृपया vapabal@gmail.com वर ई-मेल पाठवा. विषय ओळीत 'फॅब शिंप' असा उल्लेख करा.[४]

फॅब लॅबचा वापर: आपल्याकडे आधीपासूनच डिजिटल साधनांचा पूर्व ज्ञान असल्यास कृपया आपल्या डिजिटल फाइलसह ये. नियोजित भेटीसाठी कृपया vapabal@gmail.com वर ई-मेल पाठवा. विषय ओळीत 'प्रयोग फॅब लॅब' असे उल्लेख केले.

फॅब लॅबला भेट : पूर्व परवानगीने फॅब लॅब ला भेट देण्यास आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासह सुविधा आणि चालू प्रकल्प दर्शविण्यास सक्षम आहोत.ग्रामीण भागात काम करणारी ही संस्था लोकांच्या गरजा लक्षात घेऊन काम करते. विज्ञान आश्रमची Fab lab ही सध्या सौर उर्जा, शेतीचे आधुनिकीकरण, कृत्रिम electronic हात यांवर काम करत आहे.

Fab Academy:विज्ञान आश्रम हे Fab Academy चे केंद्र आहे.आपण डिजिटल फॅब्रिकेशनवर प्रशिक्षणास हातभार लावू शकता आणि फॅब अकादमीतून डिप्लोमा मिळवू शकता. हे 24*7 आहे-6 महिने पूर्णवेळचे कोर्स. पाबळ येथे Fab Academy विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा VA निवासी सुविधा पुरवते.[५]

DIC(Design Innovation Centre)[संपादन]

पुणे विद्यापीठाचे ‘डिझाईन इनोव्हेशन सेंटर’ भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने विद्यापीठात होणा-या संशोधनाचा थेट समाजाच्या गरजा भागवण्यासाठी वापर व्हावा यासाठी विद्यापीठामध्ये “नाविन्यपूर्ण डिझाईन सेंटर” उभारणीसाठीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये देशभरात २० नवीन ‘Design Innovation Center(DIC)’ सुरु करण्यात येत आहेत. त्यातील एक DIC हे पुणे विद्यापीठात सुरु होत आहे. या ‘नाविन्यपूर्ण डिझाईन केंद्राची उपकेंद्रे नाशिक, अहमदनगर व पाबळ येथील ‘विज्ञान आश्रम’ ही असणार आहेत.विद्यापीठातील विविध संशोधन शाखांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनाचे काम हे सतत चालू असते. पदवी, पदव्युत्यर, पी.एच.डी., इ. अभ्यासक्रमात संशोधन हा महत्वाचा भाग असतोच. विद्यार्थ्या कडून अनेक नवीन कल्पना व प्रकल्प अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केले जातात. मात्र बऱ्याच वेळा त्यांचा उपयोग शैक्षणिक पूर्ततेच्या पलीकडे जात नाही.प्रकल्प अहवाल व सादरीकरण या पलिकडे हे संशोधन पोहचत नाही. समाजाच्या गरजांवर आधारित नाविन्यपूर्ण संशोधन विद्यापीठामध्ये व्हावे हा या DIC चा उद्देश आहे.

‘DIC’ ची कार्यपद्धती :

डिझाईन करणे ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी उपभोक्ता (वस्तू वापरणारा) असतो. विद्यार्थ्यांनी लोकांकडून गरजा समजून घेणे, त्यांच्या अनुभवातून शिकणे, त्या माहितीच्या आधारे गरजा नक्की करून ठोस डिझाईन उद्दिष्टे ठेवणे. मग कल्पना विस्फोटासारख्या (Brain Storming) सारख्या साधनांचा वापर करून नवीन उत्तरे शोधणे, शोधलेली उत्तरे विविध साधनांचा (उदा. 3D प्रिंटर, फॅब लॅब)वापर करून प्रत्यक्षात आणणे अपेक्षित असते. शेवटचा टप्पा म्हणजे बनवलेली वस्तू/प्रक्रिया ही प्रत्यक्ष वापर करून त्यावर उपभोक्त्याच्या प्रतिक्रिया घेणे हे होय.

DIC-Asset-Logo

डिझाईनची ही प्रक्रिया केवळ यंत्रे किंवा वस्तू निर्मितीपुरती मर्यादित नसून सर्वच क्षेत्रात लागू आहे. पुणे विद्यापीठ पर्यावरण व जल व्यवस्थापन, पिक वाढीच्या आधुनिक पद्धती, संगणकीय डिझाईन, इलेक्ट्रॉनिक्स सेन्सर, औषध निर्मिती या विषयात डिझाईनचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करत आहे.या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पात्रता हि अतिशय लवचिक असून वरील क्षेत्रातील समस्यांवर उत्तर शोधणारे प्रकल्प करण्याची आवड व इच्छाशक्ती ही मुख्य पात्रता आहे. या अभ्यासक्रमाचे स्वरूप हे आंतरशाखीय (Interdisciplinary )असूनइतर विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे अभ्यासक्रम करता येणार आहे.[६]विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून प्रकल्पावर काम करत डिझाईनची सर्व तत्वे शिकायची आहेत. सैद्धांतिक भाग हा प्रकल्पाला पूरक असणार असून इंटरनेट, व्हिडीओ इ., माध्यमातून नेहमीच्या प्रचलित महाविद्यालयीन कोर्सेस पेक्षा हा अभ्यासक्रम वेगळा असणार आहे. एखाद्या गावाच्या पाण्याचे ऑडीट करणे, नवीन पद्धतीने पिक घेणे, कचरा व्यवस्थापनाची नवीन कल्पना राबवणे, बचत गटांच्या उत्पादनांचे विविध डिझाईन करून देणे, विविध प्रक्रिया स्वयंचलित करणे, कारागिरांचे श्रम कमी करणे इ. विविध प्रकारचे प्रकल्प राबवून अनुभवातून शिकण्याची हि संधी असणार आहे.या सर्व कोर्सेसला ३० श्रेयांक (CREDITS) आहेत व राष्ट्रीय कौशल्य आराखड्या (National Skill Qualification Framework- NSQF) प्रमाणे Level-5 म्हणून मान्यता मिळाली आहे.हे सर्व प्रकल्प करताना व नवीन डिझाईन विकसित करताना उद्योगातील अभियंते व उद्योजगांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा अनुभव विद्यार्थ्याला मिळणार आहे.

DIC मधील सुविधा पुणे विद्यापीठ , विज्ञान आश्रम पाबळ तसेच नाशिक व अहमदनगर येथील विद्यापीठाची उपकेंद्रे या ठिकाणी मुलभूत कार्यशाळा व प्रकल्प करण्यासाठीच्या अत्याधुनिक सुविधा असणार आहे. नवीन कल्पनेवर काम कारु इच्छिणा-या कोणालाही या सेवा वापरता येतील व आपल्या कल्पनेला मूर्त रूप देता येणार आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक प्रकल्पांना प्रत्यक्षकार्यान्वित करण्यासाठी DIC तील सुविधांचालाभ घेऊ शकतील.

सुपर २०

सुपर २० हा कोर्स मुलींसाठी आहे.यामध्ये संगणक वर्ग होतात.संगणक मध्ये पूर्ण advance Technology शिकवल्या जातात.त्यात (gmail ,blog,MS-Office,poster designing,3d designs,Photoshop,video Editing) या सर्व गोष्टी शिकवल्या जातात.विज्ञान आश्रम मध्ये शिकता शिकता कमवा हि योजना आहे त्यामुळे शिकता शिकता त्यांनाही कामे दिली जातात.त्याच बरोबर Communication and Soft Skill हे हि शिकवले जाते.soil health च data entry काम असेल ,विकिपीडियावर नवीन लेख लिहणे असेल,आहे त्या लेखामध्ये भर घालणे अशी हि कामे दिली जातात.पुस्तक स्कॅन करून ती ocr करण असेल हे हि काम करतात.

हे सुद्धा पहा[संपादन]

फॅब लॅब चे विद्यार्थी

https://vadic.wordpress.com/

महिन्याचे रिपोर्ट[संपादन]

 1. जानेवारी २०१७
 2. फेब्रुवारी २०१७
 3. मार्च २०१७
 4. एप्रिल २०१७
 5. मे २०१७
 6. जुन २०१७
 7. जुलै २०१७
 8. ऑगस्ट २०१७
 9. सप्टेंबर २०१७
 10. ऑक्टोबर २०१७
 11. नोव्हेंबर २०१७
 12. डिसेंबर २०१७

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "Vigyan Ashram". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-09.
 2. ^ "Vigyan Ashram". vigyanashram.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-04 रोजी पाहिले.
 3. ^ "ऊर्जा आणि पर्यावरण|विज्ञान आश्रम". vigyanashram.com. २०१७-१०-०२ रोजी पाहिले.
 4. ^ "Vigyan Ashram". vigyanashram.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-04 रोजी पाहिले.
 5. ^ "Vigyan Ashram". archive.fabacademy.org. 2018-07-04 रोजी पाहिले.
 6. ^ "Product Design". Vigyan Ashram, Pabal (इंग्रजी भाषेत). 2017-08-20. 2018-07-04 रोजी पाहिले.