संयुक्त अरब अमिराती फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संयुक्त अरब अमिराती फुटबॉल संघ (अरबी: الامارات العربية المتحدة لكرة القدم‎; फिफा संकेत: UAE) हा पश्चिम आशियामधील संयुक्त अरब अमिराती देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला संयुक्त अरब अमिराती आजच्या घडीला फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ६९ व्या स्थानावर आहे. संयुक्त अरब अमिरातीने १९९० सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती. संयुक्त अरब अमिराती आजवर ९ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे व १९९६ साली त्याने उपविजेतेपद मिळवले होते.

बाह्य दुवे[संपादन]