"साँगक्रन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०: ओळ १०:
अमेरिकेतल्या [[शिकागो]]त असलेले थाई उपासक थाई पद्धतीप्रमाणे हा नववर्षाचा उत्सव साजरा करतात.
अमेरिकेतल्या [[शिकागो]]त असलेले थाई उपासक थाई पद्धतीप्रमाणे हा नववर्षाचा उत्सव साजरा करतात.


==नवीन वर्ष परंपरा==
==थायलंडमधील साँगक्रन==
==इतरत्र साँगक्रन==
==इतर कॅलेंडरमध्ये==
==विवाद==
==थाई चांद्र कॅलेंडरमधील तारखा==
==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==
* [[बौद्ध सणांची यादी]]
* [[बौद्ध सणांची यादी]]

==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

२१:०९, १८ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

साँगक्रनमधील जलयुद्ध

साँगक्रन (थाई: เทศกาล สงกรานต์; इंग्रजी: Songkran) हा थाई नववर्ष महोत्सव आहे. थाई नववर्षाचा दिवस दरवर्षी १३ एप्रिलला असतो, परंतु सुट्टीचा काळ १४-१५ एप्रिल मध्येही असतो. "साँगक्रन" हा शब्द ‘संक्रांती’ या संस्कृत शब्दापासून आलेला आहे, ज्याचा शब्दशः अर्थ "ज्योतिषीय मार्ग", म्हणजे परिवर्तन किंवा बदल हा शब्द मकर संक्रांती पासून उधार घेतला आहे, जानेवारीमध्ये भारतात वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा केला जाणाऱ्या हिंदू कापणीचे नाव आहे. ह्या ज्योतिषीय तक्त्यावर मेषच्या उदयासोबत आणि बौद्ध / हिंदू सौर कालगणनेसोबत दक्षिण आणि आग्नेय आशियााच्या अनेक कॅलेंडरच्या नव्या वर्षासोबत मेळ खातो. हा बौद्ध सण थायलंड, म्यानमार, लाओस व इतर बौद्ध राष्ट्रांत साजरा केला जातो.

बौद्ध उपासक आणि उपासिका सकाळीच उठून नजिकच्या विहारात (बौद्ध मंदिरात) जातात. तेथे विहाराबाहेर हातात भिक्षापात्र घेऊन पुष्कळ भिक्खू-भिक्खुणी एका ओळीत उभ्या राहून चालत असतात. बौद्ध उपासक-उपासिका त्यांच्या समोर उभ्या राहून त्यांच्या या भिक्षापात्रात अन्न वाढतात. त्यानंतर मोठ्या शहरातील व वटधम्मराम विहारातील लोक पंचशील ग्रहण करतात, धम्म जाणतात व विहारास पैसे अर्पण करतात. लोकांना धम्मविषयी चर्चा व शिकवण ही भिक्खूंकडून दिली जाते. ती धम्मशिकवण दैनंदिन जीवनाशी निगडीत असते.

दुपारनंतर बुद्धमूर्ती व भिक्खू यांच्यावर उपासक गुलाब पाण्याचा वर्षाव करतात. आदर व्यक्त करण्याचा हा एक संकेत होय. ह्या बदल्यात भिक्खू त्यांना आशीर्वाद देतात. या दिवशी मुलेही पालकांप्रती आदर व्यक्त करतांना त्यांना छोटी भेट वस्तू देतात आणि प्रेम व आदरप दाखवण्यासाठी त्यांच्या अंगावर गुलाब पाणी शिंपडतात. पालक मुलांना आशीर्वाद देतात.

थायलंडमध्ये साँगक्रन दिनाच्या अगोदरच्या दिवशी थाई लोक त्यांची घरे, कपडे व गावातील रस्ते स्वच्छ करतात व अन्न तयार करून नंतर त्याचे भिक्खूंना दान करतात.

अमेरिकेतल्या शिकागोत असलेले थाई उपासक थाई पद्धतीप्रमाणे हा नववर्षाचा उत्सव साजरा करतात.

नवीन वर्ष परंपरा

थायलंडमधील साँगक्रन

इतरत्र साँगक्रन

इतर कॅलेंडरमध्ये

विवाद

थाई चांद्र कॅलेंडरमधील तारखा

हे सुद्धा पहा

संदर्भ