साँगक्रन
साँगक्रन | |
---|---|
नववर्षाच्या उत्सवाचे राजरीकरण, रोट नाम दाम हुआ, हा पारंपारिक मार्ग आहे जो वृद्धजनांसह साजरा करतात. बहुतेक थाई लोक त्यांच्या वडिलधाऱ्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात. | |
अधिकृत नाव | साँगक्रन सण |
इतर नावे | थाई नववर्ष |
साजरा करणारे | थाई आणि मलेशियातील सिअमेसे[१] |
महत्त्व | थायलंडच्या नवीन वर्षाची सुरुवात |
सुरुवात | १३ एप्रिल |
समाप्त | १५ एप्रिल |
दिनांक | १३ एप्रिल |
वारंवारता | वार्षिक |
साँगक्रन (थाई: เทศกาล สงกรานต์; इंग्रजी: Songkran) हा थाई नववर्ष महोत्सव आहे. थाई नववर्षाचा दिवस दरवर्षी १३ एप्रिलला असतो, परंतु सुट्टीचा काळ १४-१५ एप्रिल मध्येही असतो. "साँगक्रन" हा शब्द ‘संक्रांत’ या संस्कृत शब्दापासून आलेला आहे, ज्याचा शब्दशः अर्थ "ज्योतिषीय मार्ग", म्हणजे परिवर्तन किंवा बदल हा शब्द मकर संक्रांत पासून उधार घेतला आहे, जानेवारीमध्ये भारतात वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा केला जाणाऱ्या हिंदू कापणीचे नाव आहे. ह्या ज्योतिषीय तक्त्यावर मेषच्या उदयासोबत आणि बौद्ध / हिंदू सौर कालगणनेसोबत दक्षिण आणि आग्नेय आशियााच्या अनेक कॅलेंडरच्या नव्या वर्षासोबत मेळ खातो. हा बौद्ध सण थायलंड, म्यानमार, लाओस व इतर बौद्ध राष्ट्रांत साजरा केला जातो.
थायलंडमध्ये साँगक्रन सणाच्या अगोदरच्या दिवशी थाई लोक त्यांची घरे, कपडे व गावातील रस्ते स्वच्छ करतात व अन्न तयार करून नंतर त्याचे भिक्खूंना दान करतात.
नववर्ष परंपरा
[संपादन]साँगक्रन उत्सव प्रतीकात्मक परंपरांसोबत समृद्ध आहे. सकाळपासून हा उत्सव सुरू होतो. साँगक्रनला बौद्ध उपासक आणि उपासिका सकाळीच उठून नजिकच्या विहारात (बौद्ध मंदिरात) जातात. तेथे विहाराबाहेर हातात भिक्षापात्र घेऊन पुष्कळ भिक्खू-भिक्खुणी एका ओळीत उभ्या राहून चालत असतात. बौद्ध उपासक-उपासिका त्यांच्या समोर उभ्या राहून त्यांच्या या भिक्षापात्रात अन्न वाढतात. त्यानंतर मोठ्या शहरातील व वटधम्मराम विहारातील लोक पंचशील ग्रहण करतात, धम्म जाणतात व विहारास पैसे अर्पण करतात. लोकांना धम्मविषयी चर्चा व शिकवण ही भिक्खूंकडून दिली जाते. ती धम्मशिकवण दैनंदिन जीवनाशी निगडीत असते.
दुपारनंतर बुद्धमूर्ती व भिक्खू यांच्यावर उपासक गुलाब पाण्याचा वर्षाव करतात. आदर व्यक्त करण्याचा हा एक संकेत होय. ह्या बदल्यात भिक्खू त्यांना आशीर्वाद देतात. या दिवशी मुलेही पालकांप्रती आदर व्यक्त करतांना त्यांना छोटी भेट वस्तू देतात आणि प्रेम व आदरप दाखवण्यासाठी त्यांच्या अंगावर गुलाब पाणी शिंपडतात. पालक मुलांना आशीर्वाद देतात.
हा सुट्टीचा दिवस जल उत्सवासाठी प्रसिद्ध आहे जो मुख्यतः तरुण लोकांद्वारे साजरा केला जातो. मुख्य रस्त्यांची वाहतूक बंद करून ते पाणी मारामारीसाठी ऍरेना (arenas)[मराठी शब्द सुचवा] म्हणून वापरले जातात. तरुण आणि वृद्ध एकमेकांवर पाणी शिंपडून या परंपरेत भाग घेतात. पारंपारिक परेड[मराठी शब्द सुचवा] आयोजित केली जाते आणि काही ठिकाणी "मिस साँगक्रन" ताज प्राप्त केला जातो. यावेळी स्पर्धकांनी पारंपारिक थाई पोशाख परिधान केलेले असतात.
थायलंडमधील साँगक्रन
[संपादन]इतरत्र साँगक्रन
[संपादन]अमेरिकेतल्या शिकागोत असलेले थाई उपासक थाई पद्धतीप्रमाणे हा नववर्षाचा उत्सव साजरा करतात.
इतर कॅलेंडरमध्ये
[संपादन]विवाद
[संपादन]थाई चांद्र कॅलेंडरमधील तारखा
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ Adnan Jahaya (2005). "Songkran Masih Jadi Teras Tradisi Masyarakat Siam di Perlis". Perlis Public Library Body (Malay भाषेत). 27 January 2017 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
• "Celebrating Songkran in Kelantan". Tourism Malaysia. 12 April 2006. 27 January 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 January 2017 रोजी पाहिले. Unknown parameter|deadurl=
ignored (सहाय्य)
• "The Opening Ceremony of Terengganu Songkran Festival 2015". Ministry of Foreign Affairs, Thailand. 12 May 2015. 2018-01-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 January 2017 रोजी पाहिले.
• "Songkran jadi produk pelancongan Perak" (Malay भाषेत). Astro Awani. 14 April 2015. 27 January 2017 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
• Nazmil Nasiruddin (15 May 2015). "Uniknya Pesta Songkran" (Malay भाषेत). Utusan Malaysia. 2018-01-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 January 2017 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
• Edmund Lee (13 April 2016). "Revellers with water pistols celebrate Songkran festival". The Sun. 27 January 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 January 2017 रोजी पाहिले. Unknown parameter|deadurl=
ignored (सहाय्य)
• "Malaysian PM Hopes Songkran Will Bring Ray Of New Hope For Siamese Community". Bernama. 27 January 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 January 2017 रोजी पाहिले. Unknown parameter|deadurl=
ignored (सहाय्य)
बाह्य दुवे
[संपादन]- E-books
- Phraya Anuman Ratchathon (Yong Sathiankoset). (1954). "Amusements During Songkran Festival". Archived 2017-03-29 at the Wayback Machine. Journal of the Siam Society (volume 42, part 1). pages 39–43.