Jump to content

"पृथ्वीराज चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५३: ओळ ५३:
* दि. ३० एप्रिल इ.स. २०११ रोजी विधानपरिषदेचे सदस्‍य म्‍हणून शपथ.
* दि. ३० एप्रिल इ.स. २०११ रोजी विधानपरिषदेचे सदस्‍य म्‍हणून शपथ.
* राज्‍यसभा सदस्‍यत्‍वाचा दि. ६ मे इ.स. २०११ रोजी राजीनामा.
* राज्‍यसभा सदस्‍यत्‍वाचा दि. ६ मे इ.स. २०११ रोजी राजीनामा.
* २६ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

२३:३६, ३१ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

पृथ्वीराज चव्हाण
चित्र:पृथ्वीराज चव्हाण.jpg

कार्यकाळ
११ नोव्हेंबर, २०१० – २६ सप्टेंबर, २०१४
राज्यपाल के. शंकरनारायणन
मागील अशोक चव्हाण
पुढील देवेंद्र फडणवीस
मतदारसंघ कराड दक्षिण

जन्म १७ मार्च, १९४६ (1946-03-17) (वय: ७८)
इंदूर, मध्य प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष काँग्रेस
पत्नी सत्त्वशीला चव्हाण
निवास सातारा, मुंबई
गुरुकुल एम.एस.
धर्म हिंदू

पृथ्वीराज चव्हाण (मार्च १७, इ.स. १९४६ - हयात) हे भारताच्या काँग्रेस पक्षामधील एक राजकारणी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. १० नोव्हेंबर, इ.स. २०१० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली. महाराष्ट्राचे २२ वे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी मोठा राजकीय वारसा आहे. त्यांनी ११ नोव्हेंबर, इ.स. २०१० रोजी पदाची शपथ घेतली. २०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीपूर्वी चव्हाण ह्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.

जीवन

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदूरमध्ये मराठी कुटुंबात झाला. त्यांचे आईवडीलही राजकारणात होते. त्यांचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई चव्हाण हे दोघेही काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू पृथ्वीराज यांना लहानपणापासूनच मिळालेले. त्यांचं सातवीपर्यंतचं शिक्षण क-हाडच्या नगरपालिका शाळेत तर त्यापुढील शिक्षण दिल्लीत झालं. चव्हाणांनी बिट्स पिलानी येथून त्यांनी बी.ई. (ऑनर्स) ही पदवी मिळवली आणि त्यानंतर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून एम.एस. ही पदवी मिळवली. अमेरिकेत काही काळ काम केल्यानंतर ते भारतात परतले. त्यानंतर एअरोनॉटिकल क्षेत्रात त्यांनी काही काळ नोकरीही केली. राजीव गांधींच्या आग्रहाखातर पृथ्वीराज यांनी सक्रिय़ राजकारणात प्रवेश केला. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार समर्थपणे सांभाळला. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार पाहिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती होती. काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय करारांमध्ये त्यांनी याकाळात महत्त्वाची भूमिका बजावली. विविध कार्यक्रम तसंच शिष्टमंडळाचे सदस्य असलेल्या चव्हाण यांनी अमेरिका , फ्रान्स , जपान , जर्मनी , चीन , इटली , नेदरलँण्ड , पोर्तुगाल , स्वित्झर्लंड यासह अनेक देशांचे दौरे केले आहेत.

राजकीय कारकीर्द

  • इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ : सदस्‍य, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची इलेक्‍ट्रॉनिकी, अणुऊर्जा सल्‍लागार समिती
  • इ.स. १९९२-९३ : सदस्‍य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन समिती.
  • इ.स. १९९४-९५ : सदस्‍य, वित्‍त आणि नियोजन, ग्रामीण आणि नागरी विकास स्‍थायी समिती.
  • इ.स. १९९५-९६ : सदस्‍य, सार्वजनिक उपक्रम समिती, सदस्‍य, दुय्यम विधि-विधान विशेष आमंत्रित कामकाज सल्‍लागार समिती.
  • इ.स. १९९६-९७ : सदस्‍य, ११ व्‍या लोकसभेचे उपमुख्‍य प्रतोद, लोकसभा काँग्रेस संसदीय पक्षाचे सदस्‍य, वित्‍त मंत्रालयाची सल्‍लागार समिती.
  • इ.स. १९९६-९८ : काँग्रेस संसदीय पक्षाचे सचिव,
  • इ.स. १९९८-इ.स. २००० : सदस्‍य, सार्वजनिक लेखा समिती
  • इ.स. २०००-इ.स. २००१ : प्रवक्‍ता, अखिल भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस.
  • एप्रिल इ.स. २००२ : राज्‍यसभेवर निवड.
  • एप्रिल इ.स. २००८ : राज्‍यसभेवर फेरनिवड, राज्‍यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्‍ती वेतन (अतिरिक्‍त कार्यभार).
  • इ.स. २००४-इ.स. २००९ व मे २००९ ते नोव्‍हेंबर इ.स. २०१० पर्यंत पंतप्रधान कार्यालयाचे राज्‍यमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्‍वतंत्र कार्यभार), भू-विज्ञान, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्‍ती वेतन खात्‍यांचे राज्‍यमंत्री. हरियाणा आणि जम्‍मू-काश्‍मीर राज्‍याचे प्रभारी.
  • महाराष्‍ट्राचे २६ वे मुख्‍यमंत्री म्‍हणून दि. ११ नोव्‍हेंबर इ.स. २०१० रोजी शपथविधी.
  • दि. २८ एप्रिल इ.स. २०११ रोजी महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर बिनविरोध निवड.
  • दि. ३० एप्रिल इ.स. २०११ रोजी विधानपरिषदेचे सदस्‍य म्‍हणून शपथ.
  • राज्‍यसभा सदस्‍यत्‍वाचा दि. ६ मे इ.स. २०११ रोजी राजीनामा.
  • २६ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

बाह्य दुवे


मागील:
अशोक चव्हाण
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नोव्हेंबर ११, इ.स. २०१०२६ सप्टेंबर, २०१४
पुढील:
देवेंद्र गंगाधर फडणवीस