Jump to content

लखुजी जाधव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लखुजीराव जाधव या पानावरून पुनर्निर्देशित)
लखुजी राजे जाधवराव यांचे समकालीन चित्र. चित्राखाली फारसी मध्ये "जादूनराय दख्खनी" असे लिहिले आहे.
लखुजी राजे जाधवराव यांचे समकालीन चित्र. चित्राखाली फारसी मध्ये "जादूनराय दख्खनी" असे लिहिले आहे.

राजे लखुजीराव जाधव (जन्म : अंदाजे इ.स. १५७०; - इ.स. १६२९)

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडच्या जाधवाचे घराणे प्राचीन आहे. शिवाजी महाराज यांच्या आधीच्या काळात विशिष्ट परिस्थितीत अहमदनगरची निजामशाही आणि बीजापूरचीआदिलशाही यांच्या आश्रयाने जी काही मराठी कुळे उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव, वेरुळचे भोसले, वाशीमचे उदाराम देशमुख, पोतले आणि फलटणचे नाईक निंबाळकर,सरनाईक पवार ही कुळे विख्यात होती. जाधव घराणे हे लखूजी जाधवरावांच्या यांच्यामुळे निजामशाहीतच्या आमदानीत पुढे आले. लखुजीने बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडची देशमुखी मिळवली होती. खिलजी (दिल्लीसुलता) राजांच्या राजवटीत यादव राज्य नष्ट झाले परंतु जाधव कुळात जन्मास आलेल्या कन्येच्या, जिजाबाई पोटी तीनशे वर्षांनी पुन्हा मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करणारा छत्रपती शिवाजी हा असामान्य पुरुष जन्मास आलला. शिवाजी राजाला जन्म देणारी जिजाबाई लखुजी जाधवरावांची कन्या होती.[ संदर्भ हवा ]

राजे लखुजीराव यांच्या जन्माची नोंद उपलब्ध नाही, परंतु त्यांचे मृत्युसमयी वय ८० होते,म्हणजे त्यांचा जन्म इ सन १५५० सालचा म्हणता येईल. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथील मराठा वतनदार होते. ते जिजाबाई यांचे वडील व शहाजीराजे भोसले यांचे सासरे होते. निजामशाहीत त्यांना इ सन १५७० साली पंचहजारी मनसबदारीचा हुद्दा होता. त्यानंतर निजामशहाला १२ वर्षांपासून दौलताबाद किल्ला जिंकता येत नव्हता तो राजे लखुजीराव जाधव यांनी इ सन १५७२ साली स्वपराक्रमाने मिळवून दिला, त्यावेळी निजामशहाने त्यांना १०,००० हजारी मनसब,९ सरकार ,२८ महाल व ५६ चावड्या ही जहागिरी वंशपरंपरागत करून दिली. पुढे इसवी सन १६०५मध्ये राजे लखुजीराव जाधव यांना निजामशाहीत १५ हजारी मनसबदारी व वजीरपद बहाल करण्यात आले.पुढे इ सन १६२१ साली राजे लखुजीराव जाधव हे मुघलाकडे गेल्यानंतर त्यांना २४००० जात व १५००० स्वार ही मनसबदारी, मीर-ए-समद हे पद, दक्षिणेत त्यांना स्वतःला तसेच त्यांचे पुत्र, नातू व सोयऱ्यांना वतन देऊन सन्मान केला गेला. इ सन १६१५-१६२९ या काळात राजे लखुजीराव जाधव व त्यांचे जावई शहाजी महाराज यांनी एकत्रित मराठा सत्ता बळकट करण्यासाठी प्रयत्न केले..यातच २५ जुलै १६२९ रोजी राजे लखुजीराव जाधव, त्यांचे दोन पुत्र राजे अचलोजीराव व राजे राघोजी, आणि नातू युवराज राजे यशवंतराव व (राजे दत्ताजीराव पुत्ररत्न) यांचा निजामशहाने असताना दौलताबादच्या दरबारात खून केला. त्यांची समाधी सिंदखेडराजा येथे आहे.[ संदर्भ हवा ]


विदर्भात सिंदखेड येथे त्यांचे वतन होते. सिंदखेडकर जाधवांचे घराणे ही मूळ देवगिरीच्या यादव राजवटीतील सरदाराची एक शाखा आहे. देवगिरी येथील यादवांच्या रायाचा अंत झाल्यावर यादवांची दैन्यावस्था झाली. उदरनिर्वाहासाठी ते सर्वत्र पसरले. मग त्यांचे सरदारही पुढे काही पिढ्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे स्थायिक झाले. सिंदखेडच्या जाधव घराण्यात लखूजी हा कर्तृत्वान आणि विख्यात पुरुष उदय पावला. यादवांचे राज्य नष्ट झाल्यानंतर लखुजी जाधव यांनीच जाधव घराण्याला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. लखुजींचे नाव लक्ष्मणसिंह असेही होते तथापि ते लखुजी याच नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे. लखुजीराव यांचे साथीदार आठरापागड जातीतून होते.त्यात अधिक पराक्रमी सैन्य "वंजारी" समाजातून होते. सध्या "कायंदे" आडनाव असलेल्या कुळातील बाळाजी कांदे हे लखुजीरावांचे अंगरक्षक होते आणि त्यांनी आपला प्राण सेवेत अर्पण केला.


पुत्र - १) राजे दत्ताजीराव २) राजे अचलोजीराव ३) राजे बहादुरजी ४) राजे राघोजी राव . कन्या- राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब.

वंशज शाखा = सिंदखेडराजा परिसरात देऊळगाव राजा,आडगाव राजा,किनगाव राजा,उमरद रुसुमचे (देशमुख) ,जवळखेडमेहुणा राजा या असून सिंदखेडराजा परिसराव्यतिरिक्त वंशजशाखा- करवंड ता. चिखली जि . बुलढाणा),शिंदे-पळसे(जि.नाशिक),वाशीम जिल्हा कोयाळी (जाधव )मोठेगांव,रिसोड,वाकद, भुईंज(जि. सातारा), जाधव-सरनोबत कोल्हापूर, करणखेड (ता चिखली जिल्हा बुलढाणा),वडाळी (ता. कन्नड,जि.औरंगाबाद), माळेगांव बुद्रुक (ता.बारामती जि.पुणे),मांडवे (सातारा),माहेगाव देशमुख (ता. कोपरगांव, जि. अहमदनगर ),सारवडी(जिल्हा जालना),वाघोली(जिल्हा पुणे,वाडी(जिल्हा नांदेड), अक्कलकोट(तालुका अक्कलकोट,जिल्हा सोलापूर) ,भूम(तालुका भूम,जिल्हा उस्मानाबाद),पाटेवाडी सदरील राजे लखुजीराव जाधवराव यांच्या चार पुत्रांच्या वंशजशाखा होत...

संदर्भ - राजेजाधवरावांची बखर (द बाकी महाजन संपादित), मूळ मोडी बखर, जहांगीर नामा, शहाजहान नामा, राजे जाधवराव घराण्याच्या वंशपरंपरागत वंशावळी,[ संदर्भ हवा ]

वंशज- राजे विजयसिंह जाधवराव ( देऊळगाव राजा ) , राजे अभयसिंह जाधवराव, राजे नरेश जाधवराव ( उमरद देशमुख ) , राजे समीर जाधवराव, राजे हर्षवर्धन जाधवराव ( नांदेड सिटी , पुणे)

!!! राजे लखुजीराव जाधवराव यांचे मुघलांविरुद्धची कामगिरी  !!!

   राजे लखुजीराव जाधवराव यांनी निजामशाही तर्फे इ सन १५९५ ते १६२१ या कालखंडात जवळपास सात लढे दिले आणि या सातही लढ्यात दिल्लीच्या मोगलांविरुद्ध मराठा बर्गियांचे प्रमुख या नात्याने मोठा पराक्रम गाजवला, म्हणुनच मोगलांना या काळात दक्षिणेत पाय रोवता आला नाही.. हा लढा दिल्लीचा बादशहा अकबर, बादशहा जहांगीर या दोघांच्या काळात घडून आला..

१) पहिला लढा :- इ सन १५९५ साली शहजादा मुरादने अहमदनगर किल्ल्यास वेढा दिला. त्यावेळी चांदबिबी ने अहमदनगरचे संरक्षण केले. या संघर्षात राजे लखुजीराव यानी चांदबिबीस दक्षिणी मराठा गटाचे नेतृत्व करताना मोलाची मदत केली.

२) दुसरा लढा :- मोगलांनी इ सन १६०० मध्ये अहमदनगर वर दुसरी स्वारी केली, यावेळी चांदबिबीने गोवळकोंडा, बीजापुरच्या फौजा, मलिक अंबर, लखुजीराव राजे, त्यांचे पुत्र व बंधु, मालोजीराजे, विठोजीराजे भोसले, बाबाजी काटे आदी मराठा सरदारांनी मोगलांशी समर्थपणे लढा दिला. परंतु निजामशाही वजीर हमीदखानाने चांदबिबीचा खुन केला. त्यामुळे निजामशाही राजधानी अहमदनगर मोगलांच्या ताब्यात गेली. या काळात वरील मंडळीनी निजामशहाच्या एका वारसास गादीवर बसवुन "परंडा " ही नवीन राजधानी स्थापित केली.

३) तिसरा लढा :- जहांगीर दिल्लीच्या गादीवर आल्यानंतर त्याने इ सन १६०६ साली दख्खनचा अधिकार खानेखानान यास दिला. मोगल सैन्य व दक्षिणेतील मराठा लखुजीराजे जाधवराव , विठोजीराजे भोसले, बाबाजी काटे, उदाराम देशमुख (ब्राह्मण)  आदी मराठा सैन्याच्या संघर्षात त्यांची जहागिरी असलेल्या बालाघाट, वऱ्हाड व खानदेश प्रांत ओसाड पडत असल्यामुळे मलिक अंबरने खानेखानानाशी मित्रत्वाने वागणे चालु केले.

४) चौथा लढा :- निजामशहाने मलिक अंबर व दक्षिणी मराठा सैन्याच्या मदतीने दक्षिणेतील मिळवलेले प्रांत पुन्हा मिळवण्यासाठी जहांगीरने इ सन १६०९ साली शहजादा परिवझ याच्यासोबत खानेखानान व बरीच सरदार मंडळी पाठवली, परंतु मलिक अंबरने मराठा बर्गियांचे प्रमुख लखुजीराजे जाधवराव, त्यांचे पुत्र व बंधु, विठोजीराजे भोसले, शहाजीराजे, बाबाजी काटे व उदाराम देशमुख आणि आदिलशाहीच्या मदतीने मोगलांचा पराभव करून अहमदनगर चा किल्ला, तसेच देवगिरीचा किल्ला जिंकून घेतला. यासमयी मराठ्यांच्या चपळ, काटक व जलद हालचाली करणाऱ्या घोडेस्वारांचा मुख्य उपयोग झाला. या विजयानंतर निजामशहाने राजधानी जुन्नर येथुन देवगिरी येथे स्थापीत केली..

        इ सन १६०९-१० साली दौलताबाद किल्ल्यावर शहाजी महाराज साहेब व राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा विवाह पार पडला. या समयी या दोन्ही घराण्यात कुठलेही वैमनस्य नव्हते.

५) पाचवा लढा :- जहांगिरने शहजादा परिवझ याच्यासोबत खानेखानान यास इ सन १६११ मध्ये मोठे सैन्य आणि युद्धसामग्री देऊन दख्खनमध्ये परत पाठवले. त्यांच्या मदतीस गुजराथमधील अब्दुलाखान, राजा रामदास, खान आलम, सैफखान, अलिमर्दान बहादुर जफरखान आदी सरदार व वऱ्हाड मधील राजा मानसिंह, खानजहां, अमीरुल उमरा आदी सरदार पाठवले या दोन्ही सैन्याने एकमेकांशी संपर्कात राहुन निजामशाही प्रांतावर आक्रमण करण्याचे आदेश दिले होते. परंतु अब्दुल्ला खानाने हा आदेश न मानता नासिक प्रांतातुन आपले सैन्य घुसवले. परंतु निजामशहाने व अंबरने बर्गियांचे प्रमुख लखुजीराजे जाधवराव, शहाजी महाराज साहेब, संभाजीराजे भोसले, खेलोजीराजे भोसले, बाबाजी काटे आणि आदिलशाही व कुतुबशाही या एकत्रित सैन्याने गनिमी कावा पद्धतीने मोगलांचा पराभव केला.. #वाकियत_यी_जहांगिरी_या_ग्रंथात_जहांगिरने_या_लढ्यास_बर्गियांचा_मराठ्यांचा_लढा_असेच_नाव_दिले_आहे#   

६) सहावा लढा :- इ सन १६१५ साली जहांगिरने दक्षिणेत शहजादा परिवझच्या अपयशानंतर शहजादा खुर्रम उर्फ शहाजहान यास निजामशाहीचा प्रांत हस्तगत करण्यासाठी संपूर्ण तयारीनिशी रवाना केले. या लढ्यात मलिक अंबर व मराठा सैन्यात वितुष्ट आल्यामुळे मलिक अंबरास  माघार घ्यावी लागली व मोगलांशी तडजोड करून दौलताबादच्या किल्ल्या व्यतिरिक्त निजामशाहीचा या भागातील सर्व प्रांत मोगलांना द्यावा लागला.

           इ सन १६१६ साली मलिक अंबरशी वितुष्ट आल्यामुळे निजामशाहीतील प्रतिभाशाली नेत्यांचा समुह, शाही व्यक्ती, तसेच मराठा बर्गियांचे प्रमुख राजे लखुजीराव जाधवराव, व त्यांचे पुत्र व बंधु, बाबाजी काटे देशमुख, तसेच आदम खान, याकुत खान आदी मंडळी शहनवाझ खानाकडे बाळापुर येथे येऊन भेटले. या समयी मोगल व अंबर यांच्यामध्ये लढाई झाली, त्यात मलिक अंबर ला दारुण पराभव पत्करावा लागला.. या लढाईस रोशनगावची लढाई म्हणतात..

      जहांगिरने आपल्या आत्मचरित्रात, "मराठा मोठे काटक व शुर होते, तसेच मोठे धैर्यवान, तसेच दक्षिण प्रांताचे वाघाचे केंद्र होते. " असे मराठ्यांबाबत लिहुन ठेवले आहे... यावरुनच इरफान हबीब या इतिहासकाराने लिहुन ठेवले आहे, " मोगलांचा दक्षिणेतील विजयरथ हा मराठ्यांनी च रोखला असुन मराठ्यांनी आपली ताकद उत्तरोत्तर वाढवतच नेली. "

७) सातवा लढा :- इ सन १६१७-२० :- जहांगिरने शहजादा खुर्रम यास निजामशाही जिंकण्यासाठी इ सन १६१७ साली दुसऱ्यांदा दक्षिणेत पाठवले, परंतु राजे लखुजीराव जाधवराव, त्यांचे पुत्र दत्ताजीराजे, अचलोजीराजे, बहादुरजीराजे, राघोजी राजे, नातु यशवंतराजे व बंधु भुतजीराजे, तसेच शहाजी महाराज साहेब व त्यांचे बंधू शरीफजीराजे, संभाजीराजे , खेलोजीराजे व त्यांचे बंधु मंडळ यांच्या सहकार्याने मलिक अंबर याने इ सन १६१६ च्या कराराने मोगलांना दिलेला मुलुख इ सन १६१७-२० या काळात परत मिळवला. या काळात सदरील मराठ्यांच्या पराक्रमामुळे शहजादा खुर्रम उर्फ शहाजहान यास एकही विजय मिळवता आलेला नाही. #या_काळात_मलिक_अंबरने_सदरील_समस्त_मराठा_मंडळीच्या_मदतीने_मोगलांना_अहमदनगर__वऱ्हाड_खानदेश_बुर्हाणपुर प्रांतातुन हाकलून दिले, #तसेच_मराठ्यांनी_आपले_सैन्य_नर्मदा_पार_करून_मांडु_भोवतील_प्रांतावर_आक्रमण_केले"#. #यासमयी_मराठ्यांचे_साठहजार_घोडेस्वार_सामिल_होते#

८) राजे लखुजीराव जाधवराव हे निजामशाहीत "मीर- ए - झमान म्हणजेच वजीर पदावर असल्याची नोंद इंग्रजकालीन व मुगल कागदपत्रात मिळते.

९) इ सन १५९५- १६२१ या काळात साली राजे लखुजीराव जाधवराव यांची ताकद वाढतच गेली..यामुळे मलिक अंबर त्यांचा द्वेष करत असे. यांच्या मधील वितुष्ट वाढतच गेले आणि इ सन १६२१ साली राजे लखुजीराव जाधवराव यानी मलिक अंबर यास तलावात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न अयशस्वी झाला... हा प्रयत्न यशस्वी झाला असता तर याच काळात निजामशाहीत दक्षिणी मराठा जाधवराव व राजे भोसले यांचेच प्राबल्य राहिले असते...

१०) राजे लखुजीराव जाधवराव याना दखनी जदुराय हा किताब पहिल्यापासूनच होता आणि त्यांनी सलग २६ वर्ष मोगलांविरुद्ध प्रखर लढा दिला... या लढ्यात प्रामुख्याने राजे जाधवराव, राजे भोसले, काटे देशमुख, हंबीरराव, धारराव, आदी मराठा घराणे सामिल होते..  या सात लढ्यामुळेच शिवपुर्वकाळात मोगल दक्षिण जिंकु शकले नाहीत... या काळात मराठा बर्गियांचे प्रमुख म्हणून राजे लखुजीराव जाधवराव यांची भूमिका महत्वाची होती... शहाजी महाराज साहेब व राजे लखुजीराव जाधवराव हे एकमेकांशी काटे देशमुख यांच्याद्वारे संपर्कात राहत असत व सर्व रणनिती आखत असत. या दोघांनी या काळात मराठा  एकत्रीकरण व मराठा सत्ता उत्थापनाचे महत्त्वाचे कार्य केले... म्हणुनच मराठा सत्तेचे एक चाक म्हणजे राजे लखुजीराव जाधवराव यांची हत्या निजामशहाने म्हणजे एका मुस्लिम शासकाने घडवून आणली आणि त्याचवेळी शहाजी महाराज साहेब यांच्या विरोधात देखील शिवनेरीवर फौजा पाठविण्यात आल्या होत्या....

#राजे_लखुजीराव_जाधवराव

संदर्भ

[संपादन]