भुईंज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृष्णा नदीच्या काठावर वसलेले निसर्गाच्या सानिध्यात भुईंज हे गाव वसलेले आहे. सप्त ऋषीपैकी आद्य ऋषी ऋषी श्रेष्ठ भृभृगु ऋषी जे ब्रह्म्चे मानस पुत्र मानले जातात. त्यांनी या भुईंज या गावी वास्तव्य केले होते .यावरूनच या गावाला भुईंज असे नाव मिळाले .साधरण दहा ते पंधरा हजार लोकसंख्या असलेले गाव भृगु ऋषी व आई महाल्क्ष्मी या दोन ठिकाणासाठी प्रसिद्ध आहे .काही वर्षांपूर्वी नारायणपूरचे अण्णा महाराज व ग्रामस्थांच्या प्रयत्नातून भृगु ऋषी मठाचा जीर्णोद्धार झाला .रथसप्तमीला भृगु ऋषी समाधी उत्सव साजरा केला जातो. नवरात्री मध्ये महालक्ष्मी यात्रा ९ दिवस भरवली जाते .भुईंज गावातील मठाच्या जवळील माती नारायणपूर येथील दत्त मंदिरात भस्माच्या स्वरूपात वापरली जाते.

हवामान[संपादन]

हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.