लोणंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लोणंद महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील शहर आहे. खंडाळा तालुक्यातील हे शहर पुणे-मिरज रेल्वेमार्गावरील स्थानक असून येथून बारामतीस रेल्वेमार्ग जातो.

लोणंद शहरातील कांद्याची बाजारपेठ सर्वात मोठी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.मार्केट यार्ड हे मोठे आहे इथे कांद्याची खरेदी विक्री होते.तसेच धान्यांची खरेदी विक्री होते.त्याचप्रमाणे पाळीव प्राण्याचे व्यवहार देखील इथे होतात यामध्ये गाई, बैल, शेळी, मेंढी इत्यादीचा सामावेश होतो.प्रामुख्याने हे व्यवहार सकाळचे होतात.तसेच लोणंद शहरात अजून एक प्रसिद्ध मार्केट म्हणजे बांबू चे होय परंतु याचे व्यवहार फक्त आठवड्यातून एकदाच होतात.हा बाजार फक्त गुरुवारीच होतो.लोणंद शहरातील गुरुवारी भरणारा बाजार हा मोठा बाजार आहे.आसपासचे शेतकरी ह्या दिवशी भाजीपाला घेऊन ह्या दिवशी विकतात.त्यामुळे लोणंद शहर हे बाजारपेठसाठी महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाते.