Jump to content

बुएनोस आइरेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्यूनॉस आयरिज़ या पानावरून पुनर्निर्देशित)
बुएनोस आइरेस
Buenos Aires
आर्जेन्टिना देशाची राजधानी


ध्वज
चिन्ह
बुएनोस आइरेस is located in आर्जेन्टिना
बुएनोस आइरेस
बुएनोस आइरेस
बुएनोस आइरेसचे आर्जेन्टिनामधील स्थान

गुणक: 34°36′12″S 58°22′54″W / 34.60333°S 58.38167°W / -34.60333; -58.38167

देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
स्थापना वर्ष इ.स. १५३६
क्षेत्रफळ २०३ चौ. किमी (७८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८२ फूट (२५ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २८,९०,१५१
  - घनता १५,००५ /चौ. किमी (३८,८६० /चौ. मैल)
  - महानगर १,२८,०१,३६४
प्रमाणवेळ यूटीसी−०३:००
buenosaires.gob.ar


बुएनोस आइरेसचे स्वायत्त शहर (स्पॅनिश: Ciudad Autónoma de Buenos Aires; अर्थ: सुंदर हवामान) ही आर्जेन्टिना देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.सुमारे १.२८ कोटी महानगरी लोकसंख्या असलेले बुएनोस आइरेस साओ पाउलो खालोखाल दक्षिण अमेरिका खंडामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. बुएनोस आइरेस आर्जेन्टिनाच्या पूर्व भागात उरुग्वे देशाच्या सीमेजवळ व अटलांटिक महासागराजवळ रियो देला प्लाता नावाच्या खाडीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे.

बुएनोस आइरेस आर्जेन्टिनामधील एक स्वायत्त शहर असून ते बुएनोस आइरेस प्रांतामध्ये समाविष्ट केले जात नाही. १८८० साली त्याला इतर प्रांतांपासून वेगळे करण्यात आले व १९९४ साली स्वायत्त दर्जा मंजूर करण्यात आला. लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या बुएनोस आइरेसची लोकसंख्या २०१० सालच्या गणनेनुसार सुमारे २९ लाख होती. मेक्सिको सिटी व साओ पाउलो ह्यांच्यासह ते लॅटिन अमेरिकेमधील एक जागतिक शहर मानले जाते. येथील युरोपीय शैलीचे स्थापत्य, उच्च सांस्कृतिक वारसा इत्यादींमुळे त्याला लॅटिन अमेरिकेमधील पॅरिस असा खिताब मिळाला आहे. व्हॅटिकनचा विद्यमान पोप फ्रान्सिस ह्याचे बुएनोस आइरेस हे जन्मस्थान आहे.

मिनिस्त्रो पिस्तारिनी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा आर्जेन्टिनामधील सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ बुएनोस आइरेसच्या २२ किमी नैऋत्येस आहे. एरोलिनिआस आर्जेन्तिनास ह्या आर्जेन्टिनाच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय बुएनोस आइरेसमध्येच स्थित आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: