किशोरी शहाणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किशोरी शहाणे
किशोरी शहाणे
जन्म किशोरी शहाणे
२३ एप्रिल, १९६८ (1968-04-23) (वय: ५६)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
पती
दीपक बलराज वीज (ल. १९९१)
अपत्ये बॉबी वीज

किशोरी शहाणे - विज ( २३ एप्रिल १९६८) या शास्त्रीय आणि लोकनृत्य नृत्यांगना, चित्रपट अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्या आहेत. त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटांतून तसेच दूरचित्रवाणी मालिकांमध्ये भूमिका केलेल्या आहेत.

कारकीर्द[संपादन]

नववीत असताना त्यांना 'दुर्गा झाली गौरी' या नृत्य नाटिकेत काम करण्याची संधी मिळाली. अकरावीत असताना लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या समवेत भूमिका असलेल्या 'प्रेम करूया खुल्लम खुल्ला' या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. पदवीधर होईपर्यंत त्यांनी सुमारे वीस चित्रपटात भूमिका केल्या होत्या.

मिठीबाई महाविद्यालय, मुंबई येथे शिकत असताना किशोरी शहाणे यांची ‘मिस मिठीबाई’ म्हणून निवड झाली होती. ‘माहेरची साडी’ आणि ‘वाजवा रे वाजवा’ या मराठी चित्रपटातील भूमिकांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. मोरूची मावशी या मराठी नाटकातील आणि आधे अधुरे या हिंदी नाटकातील भूमिकांमुळे त्यांची नाट्य अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण झाली. ‘एक डाव धोबी पछाड’ आणि ‘नवरा माझा नवसाचा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. ‘प्यार मे ट्विस्ट’ या हृदय शेट्टी दिग्दर्शित , ‘रेड:द डार्क साईड’ या विक्रम भट दिग्दर्शित हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत.

दीपक बलराज वीज या हिंदी चित्रपट निर्मात्याच्या हप्ता बंद, बॉम्ब ब्लास्ट या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. हप्ता बंद या १९९१ सालच्या चित्रपटाच्या दरम्यान त्यांची दीपक वीज यांच्याशी जवळीक निर्माण होऊन त्यांचा विवाह झाला.[१] त्यानंतर त्यांनी हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्याबरोबरच हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करणे सुरूच ठेवले. ‘घर एक मंदिर’, ‘ जस्सी जैसी कोई नही’, आणि ‘सिंदूर’ या हिंदी  मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

त्या शास्त्रीय आणि लोकनृत्य नृत्यांगना असून त्यांनी भारतात तसेच परदेशात नृत्याचे कार्यक्रम सादर केले आहेत.

मिसेस ग्लॅड रॅग्ज सौंदर्य स्पर्धेत २००३ साली त्या उपविजेत्या ठरल्या. चित्रपट निर्माती, दिग्दर्शिका म्हणून त्यांनी बनवलेल्या  ‘मोहटयाची रेणुका’ या चित्रपटाला महाराष्ट्र सरकराचा सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार २००७ मध्ये मिळाला. त्यांचा पुढच्या ‘मालिक एक’ या साईबाबांच्या जीवनावरील चित्रपटात जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत होते.

‘ऐका दाजिबा’ या मराठी चित्रपटाची निर्मितीसुद्धा त्यांनी केली.

सध्या त्या ‘शक्ती अस्तित्व के एहसास की’ या कलर्स वाहिनीवरील मालिकेत त्या भूमिका करत आहेत.

२०१९ साली कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ मराठी रियालिटी शोमधील सहभागामुळे त्या पुन्हा प्रकाशझोतात आल्या.[२]

हिंदी चित्रपट[संपादन]

 • शिर्डी साईबाबा
 • हप्ता बंद
 • प्यार का देवता
 • कर्मा
 • बॉम्ब ब्लास्ट
 • मुंबई गॉडफादर
 • प्यार मे ट्विस्ट
 • शादी से पहले
 • गुड बॉय, बॅड बॉय  
 • मिलेंगे मिलेंगे
 • फिअर
 • रेड: द डार्क साईड
 • सुपरस्टार
 • शागीर्द
 • अनुराधा
 • मोहेनजोदारो
 • सिमरन
 • पी. एम. नरेंद्र मोदी
 • ब्लॅंक

मराठी चित्रपट[संपादन]

दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

मराठी नाटके[संपादन]

 • मोरूची मावशी
 • दुर्गा झाली गौरी
 • भ्रमाचा भोपळा
 • मी तुझ्या पाठीशी आहे

हिंदी नाटके[संपादन]

आधे अधुरे

बेनी अँड बबलू

दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ author/online-lokmat. "हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत किशोरी शहाणे यांचे पती, पहा त्यांचे फोटो". Lokmat. 2019-11-09 रोजी पाहिले.
 2. ^ मुंबई, कोमल आचरेकर, एबीपी माझा. "Bigg Boss Marathi 2 : शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता". marathi.abplive.com (इंग्रजी भाषेत). 2019-11-09 रोजी पाहिले.